konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • दापोलीत महिला प्रवाशांशी असभ्य वर्तन; एस.टी. कर्मचाऱ्याचे निलंबन
Image

दापोलीत महिला प्रवाशांशी असभ्य वर्तन; एस.टी. कर्मचाऱ्याचे निलंबन

दापोली : महिला प्रवाशांशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी एस.टी.च्या वाहक-कम-चालक कर्मचाऱ्याविरोधात अखेर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी एस.टी. प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्याच्या निलंबनाचे लेखी आदेश जारी केले.

या प्रकरणी दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी शुक्रवारी दुपारी दापोली आगार व्यवस्थापक राजेंद्र उबाळे यांची भेट घेत महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. संबंधित कर्मचाऱ्याच्या वर्तनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.

“आमच्या आया-बहिणींची अब्रू इतकी स्वस्त नाही. संबंधित विकृत मनोवृत्तीच्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू,” असा इशारा ऋषिकेश गुजर यांनी दिला होता.

यानंतर प्रशासनाने तत्काळ दखल घेत संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची कारवाई केली. या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे