konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • देशी दारू व बिअरची वाहतूक; २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त
दापोलीत विनापरवाना दारू वाहतूक उघड; २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

देशी दारू व बिअरची वाहतूक; २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

दापोली: विनापरवाना देशी दारू व बिअरची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाविरोधात दापोली पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल केला. या कारवाईत देशी दारू, बिअरचे बॉक्स तसेच वाहन असा एकूण २ लाख ३० हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास दापोली बसस्थानकाजवळील चौकात वाहतूक कोंडी झाल्याने पोलिस पथक वाहतुकीचे नियमन करत होते. यावेळी मारुती इको (क्र. एमएच ०८ आर ८६३६) हे वाहन संशयास्पदरीत्या जाताना दिसले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारू व बिअरचे बॉक्स आढळून आले.

चालक ऋतिक संतोष लांबे याच्याकडे मद्य बाळगण्याचा किंवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वाहन पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

तपासणीदरम्यान २६,८८० रुपये किमतीच्या जीएम संत्रा देशी दारूच्या १८० मिलीच्या ३३६ बाटल्या, ८,००० रुपये किमतीच्या ९० मिलीच्या २०० बाटल्या, ७,२०० रुपये किमतीचे टुबोर्ग बिअरचे ४८ टीन, ९,६०० रुपये किमतीच्या ६५० मिलीच्या टुबोर्ग बिअरच्या ४८ बाटल्या, ७,०२० रुपये किमतीच्या किंगफिशर बिअरच्या ३६ बाटल्या, ३,६०० रुपये किमतीचे किंगफिशर बिअरचे २४ टीन, ६,४८० रुपये किमतीचे लंडन पिल्सनर बिअरचे ४८ टीन, ११,८८० रुपये किमतीच्या लंडन पिल्सनर बिअरच्या ७२ बाटल्या तसेच सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण २ लाख ३० हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास दापोली पोलिस करत आहेत.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे