konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘कोडबिट्स ४.०’ राष्ट्रीय हॅकथॉन संपन्न
घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘कोडबिट्स ४.०’ राष्ट्रीय हॅकथॉन संपन्न

घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘कोडबिट्स ४.०’ राष्ट्रीय हॅकथॉन संपन्न

प्रतिनिधी : कोकणधारा

लवेल : येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे संगणक विज्ञान व अभियांत्रिकी (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग) आणि संगणक अभियांत्रिकी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले राष्ट्रीय स्तरावरील २४ तासांचे हॅकथॉन ‘कोडबिट्स ४.०’ ११ व १२ मार्च २०२६ रोजी उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून एकूण ४८ विद्यार्थी संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून आपल्या तांत्रिक कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

या हॅकथॉनमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सामाजिक व औद्योगिक समस्यांवर आधारित समस्या विधान देण्यात आली होती. हेल्थकेअर तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान, शिक्षणातील डिजिटल उपाय आणि पर्यावरण संरक्षण या महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांनी २४ तास अखंडित परिश्रम घेत नाविन्यपूर्ण तांत्रिक उपाय विकसित केले. या प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना आयडिया जनरेशन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, मशीन लर्निंग मॉडेल डिझाईन तसेच मोबाइल व वेब अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट या विविध क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली.

हॅकथॉनदरम्यान सहभागी संघांनी अत्यंत नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त प्रकल्प सादर केले. या प्रकल्पांचे मूल्यमापन तज्ज्ञ परीक्षक नंदिनी सिंग आणि कैलास शर्मा यांनी केले. प्रकल्पांची तांत्रिक गुणवत्ता, नवोपक्रमशीलता, प्रत्यक्ष वापरयोग्यता तसेच सादरीकरण कौशल्य या निकषांवर प्रकल्पांचे परीक्षण करण्यात आले. सदर स्पर्धेत इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नवी मुंबई या कॉलेजच्या “लॉस्ट फ्रॉम लाईट” या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या “इटरेटिव्ह बाईट्स” या संघाने मिळवला. तर तृतीय क्रमांक फादर रॉड्रिग्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या “अँटी प्लेसमेंट” या संघाने पटकावला. विजेत्या संघांना उपप्राचार्य डॉ.सचिन पाटील, एआयएमएल विभागप्रमुख प्रा.सचिन लाटकर, संगणक विभागप्रमुख प्रा. ज्योती खालकर आणि परीक्षक कु.नंदिनी सिंग व श्री.कैलास शर्मा यांच्या हस्ते अनुक्रमे २५,००० रुपये, २०,००० रुपये आणि १५,००० रुपये अशी रोख पारितोषिके आणि प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

या हॅकथॉनमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समस्यांवर तांत्रिक उपाय शोधण्याची संधी मिळाली असून त्यांच्या सर्जनशीलता, नवोपक्रमशील विचारसरणी, समस्या सोडवण्याची क्षमता आणि टीमवर्क कौशल्य विकसित होण्यास मोठी मदत झाली. २४ तासांच्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत सातत्याने काम करून अनेक उपयुक्त व नाविन्यपूर्ण कल्पना साकार केल्या. या राष्ट्रीय स्तरावरील हॅकथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील विभागप्रमुख, समन्वयक डॉ. अरुण ढंग , प्रा. श्रद्धा गोपाळ, इतर प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. ‘कोडबिट्स 4.0’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, नवोपक्रम आणि तांत्रिक कौशल्यांचा विकास होण्यास चालना मिळाली असून भविष्यातही अशा तांत्रिक स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान