प्रतिनिधी : कोकणधारा
चिपळूण : दी चिपळूण अर्बन को-ऑप. बँक लि., चिपळूण यांच्या प्रधान कार्यालय व मुख्य शाखेच्या नव्या इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा बुधवार दि. १९ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन उद्योग मंत्री (महाराष्ट्र राज्य) तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून खासदार मा. नारायण राणे प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. तसेच माजी मंत्री आ. भास्करराव जाधव, आमदार शेखर निकम, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे आणि चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
चिपळूण अर्बन को-ऑप. बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल, उपाध्यक्ष धनंजय खातू, मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार सूर्यवंशी, तसेच संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
बँकेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनानिमित्त सर्व सभासद, खातेदार व हितचिंतकांना उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.
याच निमित्ताने गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छाही बँकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत.















