konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • २१ कोटींच्या निधीतून तीन पूल; चिपळूण–संगमेश्वरच्या विकासाला गती
२१ कोटींच्या निधीतून तीन पूल; चिपळूण–संगमेश्वरच्या विकासाला गती

२१ कोटींच्या निधीतून तीन पूल; चिपळूण–संगमेश्वरच्या विकासाला गती

चिपळूण : चिपळूण–संगमेश्वर मतदार संघातील दळणवळणाच्या समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, केंद्रीय मार्ग निधी (CRF) अंतर्गत तीन पुलांच्या बांधकामासाठी एकूण २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिळाल्याचे सांगितले जात आहे.

संगमेश्वर तालुक्यातील कासार कोळवण येथील रा.मा. १६६ वांझोळे–कासार कोळवण–बोंड्ये ते रा.मा. १७४ या मार्गावरील बावनदीवरील पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पुलाच्या बांधकामासाठी ६.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे या भागातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

त्याचप्रमाणे संगमेश्वर तालुक्यातील कारभाटले येथील प्र.जि.मा. ४६ ते हेदली-अणदेरी-कारभाटले प्र.जि.मा. ४७ या मार्गावर कि.मी. ०/९०० येथे शास्त्री नदीवर ७२ मीटर लांबीच्या पुलाच्या बांधकामासाठी ६.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पुलामुळे परिसरातील गावांमधील अंतर कमी होऊन नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.

तसेच चिपळूण तालुक्यातील दळवटणे येथील खांदाट–दळवटणे–मोरवणे मार्गावरील प्र.जि.मा. २७ कि.मी. १/०० येथील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामामुळे स्थानिकांसाठी सुरक्षित आणि अखंड वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे.

या तिन्ही कामांसाठी स्थानिक नागरिकांनी केलेल्या मागण्यांचा विचार करून आमदार Shekhar Nikam यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच अधिवेशनात वेळोवेळी प्रश्न उपस्थित करून या कामांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याचे दिसून येत आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे