konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • धक्कादायक! चिपळूण पालिकेच्या जागेतील खोक्यांचा गैरवापर उघड; मटका-जुगार, मद्यविक्रीने खळबळ
Image

धक्कादायक! चिपळूण पालिकेच्या जागेतील खोक्यांचा गैरवापर उघड; मटका-जुगार, मद्यविक्रीने खळबळ

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथील तालीम हॉलमध्ये संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करताना शहरातील पालिकेच्या मोकळ्या जागेत भुईभाड्याने दिलेल्या खोक्यांचा विषय गाजला.
या चर्चेतून धक्कादायक माहिती समोर आली. अपंगांसाठी दिलेल्या गाड्यांमध्ये खाद्यपदार्थांची विक्री सुरू असल्याचे आढळले. पोटभाडेकरु ठेवता येत नसताना देखील पोटभाडेकरू नेमण्यात आल्याचे स्पष्ट झाले. एका खोक्यात चक्क मद्यविक्री सुरू असल्याचे, तर दुसऱ्या खोक्यात मटका आणि जुगार सुरू असल्याची बाब प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली. ही माहिती सभागृहात मांडताच सर्व सदस्य अक्षरशः आवाक झाले.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत मार्कंडी, भाजी मंडई परिसरातील परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. नगर पालिकेच्या मोकळ्या जागांमध्ये काही खोकेधारकांना परवानगी देण्यात आली असली, तरी त्यापैकी काहींनी खोके पोटभाड्याने देऊन नियमबाह्य वापर सुरू ठेवल्याचा मुद्दा पुढे आला.
मागील सभेत अशा खोक्यांची संख्या आणि त्यांची स्थिती याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार नगर पालिकेचे मालमत्ता विभाग प्रमुख श्री. शेडगे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीवर आधारित अहवाल सादर केला. या अहवालानुसार शहरात एकूण 45 खोकेधारक असून 2017पासून सुमारे 6 लाख 81 हजार रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले. काही ठिकाणी नगरपालिकेने दिलेल्या परवानगीपेक्षा कितीतरी पटीने मोठे खोके उभारण्यात आल्याचेही स्पष्ट झाले.
सभेत शशिकांत मोदी यांनी या खोकेधारकांमध्ये स्थानिक व बाहेरील धारक कोण आहेत, याची स्वतंत्र यादी तयार करण्याची मागणी केली. बाहेरील धारकांवर कारवाई करून संबंधित खोके ताब्यात घ्यावेत, असे त्यांनी सुचविले.
रसिका देवळेकर यांनी प्रशासनाच्या अहवालातील धक्कादायक बाबी समोर आणत विजय सागवेकर यांच्या नावावर असलेल्या एका खोक्यात मटका आणि जुगार सुरू असल्याचे सांगितले. तसेच एका खोक्यात मद्यविक्री सुरू असल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
अपंगांसाठी देण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पोटभाडेकरू नेमून काहींनी खाद्यपदार्थांची विक्री सुरू केल्याचेही स्पष्ट झाले.
फैसल कासकर यांनी पोटभाडेकरू नेमता येत नसताना अशाप्रकारे गाड्या भाड्याने देण्यात येत असतील, तर सभागृहाने यावर योग्य भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. शिवणकामासाठी दिलेल्या गाड्यांमध्ये चिकन सेंटर चालवले जात असल्यास, तसेच खोक्यांचा आकार वाढवला जात असल्यास ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
विकी नरळकर व शशिकांत मोदी यांनी शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत खोकेधारक असल्याचे सांगत त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली.
यावर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी प्रशासनाला संबंधितांना आठ दिवसांची नोटीस देण्याचे निर्देश दिले. थकबाकी जमा करण्यास सांगावे, तसेच चुकीच्या पद्धतीने वापर होत असल्यास संबंधित खोके ताब्यात घ्यावेत, अशी स्पष्ट सूचना त्यांनी केली.
सभेत उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, अंकुश आवले, साजिद सरगुरोह, आरोग्य सभापती शुभम भिसे, बांधकाम सभापती कपिल शिर्के, पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, अंजली कदम, प्रमोद बुरटे, उदय जुवळे, राष्ट्रवादीचे योगेश पवार, वैशाली निमकर आदी नगरसेवकांनी चर्चेत सहभाग घेतला.
उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबकर, संतोष शिंदे, सुजित जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नगर परिषदेच्या जागांवर दिलेल्या खोक्यांच्या वापराबाबत उघड झालेल्या अनियमिततेमुळे प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढला असून पुढील आठवड्यात प्रत्यक्षात कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चौकट

मार्कंडीतील शिवराय पुतळ्याजवळील होर्डिंग हटवणार
मार्कंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळासमोर उभारण्यात आलेल्या भल्या मोठ्या जाहिरात होर्डिंगचा मुद्दा नगर परिषद सभेत पुन्हा गाजला. नगरसेवक विकी नारळकर यांनी ‌‘महाराजांच्या पुतळ्यापेक्षा उंच जाहिरात नको‌’ अशी मागणी करत हा विषय उपस्थित केला. यावर सभागृहाने सर्वानुमते निर्णय घेत संबंधित होर्डिंग हटवण्याचा ठराव मंजूर केला.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे