konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • चिपळूण जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद; ३ कोटी ८५ लाखांहून अधिक वसुली
चिपळूण जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद; ३ कोटी ८५ लाखांहून अधिक वसुली

चिपळूण जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद; ३ कोटी ८५ लाखांहून अधिक वसुली

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : येथील जिल्हा न्यायालयात शनिवार, दि. १४ मार्च रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लोकअदालतीत प्रलंबित व वादपूर्व अशा विविध प्रकरणांचा निकाल लागून एकूण ३ कोटी ८५ लाखांहून अधिक रक्कमेची तडजोड व वसुली करण्यात आली.

या लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायालय व तालुका विधी सेवा समितीकडील ७४० प्रलंबित प्रकरणे तसेच १ हजार ३१२ वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी ७४० प्रलंबित प्रकरणांपैकी १०७ प्रकरणे निकाली निघाली असून, दिवाणी व फौजदारी प्रकरणांमध्ये एकूण ३ कोटी ५० लाख १० हजार ५२१ रुपयांची तडजोड झाली. तसेच वादपूर्व प्रकरणांपैकी ५० प्रकरणे निकाली निघून ३५ लाख ११ हजार ८ रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली. त्यामुळे पक्षकारांचा वेळ व खर्च वाचला.
विशेष म्हणजे, चिपळूण जिल्हा न्यायालयाने गेल्या अडीच वर्षांत सलग ११ राष्ट्रीय लोकअदालतींमधून तब्बल २४ कोटीहून अधिक रक्कमेची वसुली केली असून ही बाब उल्लेखनीय ठरली आहे.
ही लोकअदालत जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये विविध बँका, पतसंस्था, महावितरण, इतर वित्तीय संस्था, नुकसान भरपाई अर्ज, कौटुंबिक हिंसाचार व पोटगीसंबंधित प्रकरणांचा समावेश होता. लोकअदालतीसाठी न्यायाधीश व वकीलांचे तीन पॅनेल कार्यरत होते.

या प्रक्रियेत जिल्हा न्यायालय-१ चिपळूणच्या जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे, दिवाणी न्यायाधीश के. ए. पोवार, सह दिवाणी न्यायाधीश वाय. सी. पाटील तसेच पॅनल विधीज्ञ एन. एस. सावंत, एन. जी. लाड आणि सौ. एन. यू. पवार यांनी कामकाज पाहिले.

लोकअदालतीत पक्षकार व वकीलवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच चिपळूण वकील संघ, जेष्ठ विधीज्ञ, सरकारी वकील, पोलीस कर्मचारी व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. याबद्दल तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा डॉ. अनिता नेवसे यांनी सर्वांचे आभार मानले.

Releated Posts

स्वप्ना यादव यांचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने सन्मान, कोल्हापूरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव; सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

प्रतिनिधी : कोकणधारा कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. आयोजित सहकारी पतसंस्थांचा महिला मेळावा शुक्रवारी (ता.…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ खेर्डी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

“रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेससीसीटीव्ही, अधिक आसन क्षमता; प्रवास होणार आरामदायी”

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यभरातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

मोठ्या गाजावाजात सुरू झालेली मुंबई विजयदुर्ग रो रो बोट सेवा बंद

प्रतिनिधी : कोकणधारा कोकणासाठी मोठ्या आशेचा किरण ठरलेली मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा आता अचानक ठप्प झाली आहे.गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर…

ByByEditorial अप्रैल 5, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

चिपळूणच्या स्वप्ना यादव यांना कोल्हापूरमध्ये ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार; सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव.
खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश; स्थानिक राजकारणात खळबळ
रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस; अधिक सुविधा, आरामदायी प्रवास
मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा बंद; कमी प्रतिसाद आणि महागडे दर कारणीभूत
sangmeshwar-student-harassment-case-accused-arrested-devrukh
chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी