konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • पत्रकार मारहाणीचा चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
पत्रकार मारहाणीचा चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

पत्रकार मारहाणीचा चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाका येथे पत्रकारांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी, चिपळूण यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे सदर प्रकरणातील सर्व दोषींवर सखोल, निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दि. २५ मार्च २०२५ रोजी घडलेल्या या प्रकारामुळे चिपळूणसारख्या सुसंस्कृत शहरात अशा घटना घडणे अत्यंत अशोभनीय असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पत्रकारांवरील मारहाणीच्या घटनेबाबत गुन्हा दाखल झाल्याचेही यात नमूद करण्यात आले असून, या प्रकरणातील दोषींना योग्य ती शिक्षा व्हावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन (आबू) चंद्रकांत ठसाळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. भविष्यात चिपळूणमध्ये अशा प्रकारच्या घटना घडण्याचे धाडस कोणालाही होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर आणि कायदेशीर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

या वेळी शौकतभाई मुकादम, जयद्रथ खताते, दशरथ दाभोळकर, योगेश पवार, मनोज जाधव, सचिन साडविलकर आदी उपस्थित होते.

पत्रकारांवरील या घटनेनंतर विविध सामाजिक, राजकीय आणि पत्रकार संघटनांकडून निषेध व्यक्त केला जात असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे