konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • चिपळूणमध्ये भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन
Image

चिपळूणमध्ये भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथे जय हिंद क्रीडा मंडळाच्या वतीने संस्थेच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवार, २३ एप्रिल रोजी भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गोवळकोट येथे प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा होत असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही स्पर्धा रात्री ९ वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगण, शिंदेवाडी (गोवळकोट) येथे रंगणार आहे. जिल्ह्यातील विविध नामांकित नृत्यसंघ या स्पर्धेत सहभागी होणार असून, पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात सादर होणारे जोशपूर्ण पालखी नृत्य, आकर्षक वेशभूषा आणि सादरीकरणातील समन्वय प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे.

पालखी नृत्य ही आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख जपणारी लोककला असून, या स्पर्धेद्वारे या कलेचा व्यापक प्रचार-प्रसार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि युवकांमध्ये पारंपरिक कलेविषयी आवड निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

जय हिंद क्रीडा मंडळ गेली अनेक वर्षे सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असून, या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांचा सन्मान करून त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

या अनोख्या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी, कला रसिकांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. गोवळकोटमध्ये प्रथमच होणारी ही पालखी नृत्य स्पर्धा उत्साह, परंपरा आणि कलात्मकतेचा संगम ठरणार आहे.

Releated Posts

परंपरेचा वारसा, स्त्रीकर्तृत्वाचा गौरव!

भोरगाव लेवा पाटीदार पंचायतच्या वतीने ‘नवदुर्गा सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात; विविध क्षेत्रांतील नऊ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान अंबरनाथ…

ByByEditorial नवम्बर 23, 2026

देवगडच्या समुद्रात मध्यरात्री थरार! तासभर पाठलाग करून कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर जप्त

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या परराज्यातील नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे.…

ByByEditorial नवम्बर 23, 2026

रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा राज्यव्यापी बंद!

मुंबई-पुण्यात संमिश्र प्रतिसाद; कोल्हापुरात हजारो रिक्षाचालक सहभागी, ठाण्यात सेवा सुरळीत मुंबई : अॅपआधारित रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेमुळे पारंपरिक…

ByBycare.eviano@gmail.com नवम्बर 23, 2026

अलिबागमध्ये नार्वेकर बंधूंची जमीन खरेदी; आदिवासींची घरे पाडल्याचा आरोप!

संजय राऊतांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; म्हात्रोळीतील कातकरी कुटुंबांच्या विस्थापनाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग…

ByBycare.eviano@gmail.com नवम्बर 23, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

परंपरेचा वारसा, स्त्रीकर्तृत्वाचा गौरव!
देवगडच्या समुद्रात मध्यरात्री थरार! तासभर पाठलाग करून कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर जप्त
रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा राज्यव्यापी बंद!
अलिबागमध्ये नार्वेकर बंधूंची जमीन खरेदी; आदिवासींची घरे पाडल्याचा आरोप!
अखिलेश यादव यांचे फेसबुक पेज दीड तास गायब!
शिरसाटांच्या गौप्यस्फोटावर शिंदेंची सावध प्रतिक्रिया!
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक बदल होणार?
रोहित पवारांच्या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा!
एनव्हिडियाच्या नेतृत्वात पुन्हा जेनसन हुआंग!