konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • चिपळूण पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी देण्याची ग्वाही: सिद्धेश कदम , नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी घेतली मुंबईत भेट
चिपळूण पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी देण्याची ग्वाही: सिद्धेश कदम

चिपळूण पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी देण्याची ग्वाही: सिद्धेश कदम , नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी घेतली मुंबईत भेट

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : चिपळूण नगर पालिकेचे नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांनी गुरुवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेशदादा रामदास कदम यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी चिपळूण नगर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्यक निधी मंजूर करावा, अशी मागणी नगराध्यक्ष सकपाळ यांनी लेखी पत्राद्वारे केली. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही सिद्धेशदादा कदम यांनी दिली.

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी १६ इलेक्ट्रिक कचरा वाहने खरेदीसाठी निधी मिळावा, अशी मागणी केली. तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत विविध विकास कामांसाठी निधी देण्याबाबतही त्यांनी निवेदन सादर केले.

चिपळूण नगर परिषदेचा वाढता विस्तार आणि वाढत्या कचऱ्याच्या प्रमाणामुळे सध्या उपलब्ध सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे नगराध्यक्षांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

विशेषतः शिवाजी नगर येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रावर सुक्या कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, मात्र त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याची बाब त्यांनी मांडली.
यासाठी दररोज ५ टन क्षमतेचा गॅसिफिकेशन प्लांट उभारण्याचा प्रस्ताव नगर पालिकेकडून तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी दिनांक १२ जून २०२५ रोजी दरपत्रक मागविण्याची सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या तीन दरपत्रकांपैकी सर्वांत कमी दरानुसार रु. ४,९९,५५,३५७/- इतके अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या कामाच्या तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे कार्यालयाकडे सादर करण्यात आला असल्याचेही नगराध्यक्षांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर ५ टन प्रतिदिन क्षमतेचा गॅसिफिकेशन प्लांट उभारण्यासाठी सुमारे ४ कोटी ९९ लाख ५५ हजार ३५७ रुपये निधी मंजूर करून द्यावा, अशी नम्र विनंती नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांनी केली.

यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेशदादा कदम यांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, “चिपळूण नगर पालिकेच्या विकासासाठी आम्ही ठामपणे पाठीशी आहोत. आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील,” अशी ग्वाही दिली.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे