konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • वणव्यात होरपळून ७० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू, चिपळूण तालुक्यातील गाणे-खडपोली परिसरातील घटना; चार-पाच दिवसांपासून होत्या बेपत्ता
वणव्यात होरपळून ७० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

वणव्यात होरपळून ७० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू, चिपळूण तालुक्यातील गाणे-खडपोली परिसरातील घटना; चार-पाच दिवसांपासून होत्या बेपत्ता

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : तालुक्यातील गाणे-खडपोली परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली आहे. जंगलात लागलेल्या वणव्यात होरपळून तारामती तुकाराम वाघे (वय ७०) यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तारामती वाघे या मागील चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्या काही अंशी मानसिक आजाराने त्रस्त होत्या. त्यामुळे त्या अनेकदा घरातून निघून जात असत आणि काही वेळाने पुन्हा घरी परतत असत. यामुळे सुरुवातीला कुटुंबीयांनाही त्या पुन्हा परत येतील, अशी अपेक्षा होती.

दरम्यान, गाणे परिसरातील जंगलात चार दिवसांपूर्वी मोठा वनवा लागला होता. त्यानंतर एका व्यक्तीने जंगलातून लाकडाची फाटी आणण्यासाठी जंगलात गेल्यानंतर त्याला जळालेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळील साडीवरून तो मृतदेह तारामती वाघे यांचाच असल्याची ओळख पटली.
या घटनेची माहिती तत्काळ अलोरे-शिरगाव पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

प्राथमिक माहितीनुसार, जंगलात लागलेल्या वणव्याच्या तीव्रतेमुळे तारामती वाघे या होरपळून मृत्यूमुखी पडल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

या घटनेमुळे जंगल परिसरात लागणाऱ्या वणव्यांच्या वाढत्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत वणव्यांच्या घटना वाढत असल्याने जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासन आणि स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे