konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • चिपळूण-दिवा दरम्यान उन्हाळी विशेष मेमू गाड्या; १ मेपासून सेवा सुरू
Image

चिपळूण-दिवा दरम्यान उन्हाळी विशेष मेमू गाड्या; १ मेपासून सेवा सुरू

चिपळूण : उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या प्रवासी गर्दीला दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे चिपळूण ते दिवा दरम्यान विशेष मेमू अनारक्षित गाड्या चालविण्यात येणार आहेत. या विशेष गाड्या १ मे २०२६ ते ७ जून २०२६ या कालावधीत दर शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी धावतील.

गाडी क्रमांक ०११६० चिपळूण-दिवा मेमू विशेष दुपारी ३.३० वाजता चिपळूण येथून सुटून त्याच दिवशी रात्री ११.१० वाजता दिवा येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११५९ दिवा-चिपळूण मेमू विशेष रात्री ११.२५ वाजता दिवा येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता चिपळूण येथे पोहोचेल.

या गाड्यांना अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे-वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा, सोमटणे, पनवेल, कळंबोली, तळोजा पांचनंद आणि निळजे या स्थानकांवर थांबा असेल.

Releated Posts

दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या २३ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू

चंद्रशेखर जोशी दापोली : डोंबिवली येथून पर्यटनासाठी आलेल्या एका २३ वर्षीय पर्यटकाचा अचानक मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

पांगरी येथे मोटारसायकलचा भीषण अपघात; हातखंबा येथील तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

देवरूख : देवरूख-रत्नागिरी मार्गावरील पांगरी येथील वळणाजवळ रविवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

दीड वर्ष टपाल न वाटणारा वेळणेश्वरचा पोस्टमन बडतर्फ; घरातून दोन पोती टपाल जप्त

गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर येथे गेली दीड वर्षे नागरिकांचे टपाल वितरित न करणाऱ्या पोस्टमन करण थोरात याला बडतर्फ…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील निष्काळजीपणा उघड; मृतदेह तीन तास अंधारात

खेड : तालुक्यातील कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासनिक निष्क्रियतेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित…

ByByEditorial अप्रैल 26, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या २३ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू
पांगरी येथे मोटारसायकलचा भीषण अपघात; हातखंबा येथील तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
आडिवरे येथे महिलेवरील अत्याचारप्रकरणी शिक्षक अटकेत
दीड वर्ष टपाल न वाटणारा वेळणेश्वरचा पोस्टमन बडतर्फ; घरातून दोन पोती टपाल जप्त
कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील निष्काळजीपणा उघड; मृतदेह तीन तास अंधारात
सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श : आरटीओ अधिकारी पराग मातोंडकरांनी स्वतःच्या खर्चाने केले रुग्णवाहिकेचे रजिस्ट्रेशन
पावसाआधी रस्ते पूर्ण करा, अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ ! संजय गवस यांचा थेट इशारा
दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले !
टीमवर्क आणि देशभक्तीच यशाची गुरुकिल्ली : डॉ. अनिल काकोडकर