konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • चिपळूणमध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
chiplun-balanatya-training-camp-akhil-bharatiya-natya-parishad

चिपळूणमध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या वतीने यावर्षी बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिराचे हे सलग तिसरे वर्ष आहे. दि. १७ ते २६ एप्रिल या कालावधीत हे प्रशिक्षण शिबिर होणार असून, त्यानंतर दि. २७ एप्रिल रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांच्या बालनाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

अखिल भारतीय नाट्य परिषद शाखेचे दोन वर्षांपूर्वी पुनर्जीवन झाल्यानंतर शाखेच्या वतीने विविध सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळाली आहे.

बालनाट्य शिबिर, कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांची कार्यशाळा, महिलांच्या गायनाचा ‘स्वर तरंग’, ‘आनंदयात्री पुल’ अशा एक-दोन नव्हे तर एकूण २८ कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर दरवर्षी बालनाट्य शिबिर आयोजित करण्याची परंपराही जपली जात आहे.
या शिबिराच्या पहिल्या वर्षी सुरेश गायधनी, तर दुसऱ्या वर्षी अभिजीत झुंजारराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. यंदा पुण्यातील प्रा. रश्मी नंदकुमार देव या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.

प्रा. रश्मी देव या एमईएसओ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, पुणे येथे नाट्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एम.ए. फिलॉसॉफी, एम.ए. इंडोलॉजी, एम.ए. नाट्यशास्त्र, तसेच हेरिटेज मॅनेजमेंट डिप्लोमा आणि सर्टिफाइड योगा इन्स्ट्रक्टर अशी शैक्षणिक पात्रता प्राप्त केली आहे.
त्या गेली २० वर्षे मराठी प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमी, तसेच मीडिया क्षेत्रात अभिनेत्री, दिग्दर्शिका, माहितीपट निर्माती आणि प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. देशाची कला, इतिहास आणि संस्कृती लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘गाभारा’ या संस्थेची स्थापना केली आहे. त्यांनी अनेक व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांत भूमिका साकारल्या असून, ३५ हून अधिक माहितीपटांची संकल्पना, दिग्दर्शन आणि संकलन केले आहे.

शिबिरातून तयार करण्यात आलेले बालनाट्य इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सादर करण्यात येणार आहे. वय वर्षे ७ ते १७ या वयोगटातील विद्यार्थी या शिबिरात सहभागी होऊ शकतात.

अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या खजिनदार ॲड. विभावरी रजपूत (७७९६७२९५८७), दिलीप आंब्रे ( 8291089302) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केले आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे