konkandhara.com

राजकारण

रायगड | जिल्हा परिषदेसाठी शेकाप सज्ज; जयंत पाटील यांचा कार्यकर्त्यांना निर्धाराचा संदेश

अलिबाग :रायगड जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे लढणार असल्याचं शेकाप नेते जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. “शेकापने ज्यांना मोठं केलं त्यांनी गद्दारी केली. पण त्या गद्दारांना शून्य करण्याची ताकद आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे,” असा हल्लाबोल करत त्यांनी जिल्ह्यात पुन्हा लाल बावटा फडकवण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना दिलं. चेंढरे येथे शेकापची बैठक चेंढरे येथील पीएनपी नाट्यगृहात शेकापची रायगड जिल्हा चिटणीस मंडळ व नवनिर्वाचित पदाधिकारी यांची बैठक झाली. यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्थानिक पातळीवरील निवडणुकीत कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रस्तरावर पोहोचण्यावर भर द्यावा, असं सांगितलं. “मनात चीड ठेवून सज्ज व्हा” “शेकापची साडेचार लाख मते आहेत, हे निवडणुकांमध्ये सिद्ध झालं आहे. आता जिल्हा परिषदेवर आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी जिद्दीने आणि मनात चीड ठेवून काम करा,” असं पाटील म्हणाले

रायगड | जिल्हा परिषदेसाठी शेकाप सज्ज; जयंत पाटील यांचा कार्यकर्त्यांना निर्धाराचा संदेश Read More »

अजित पवारांचा फोन, IPS अंजना कृष्णांची ठाम भूमिका, आणि मिटकरींचा बॉम्ब!

पूजा खेडकर प्रकरणानंतर अंजना कृष्णांच्या नेमणुकीवरही संशय? मुंबई :सोलापूरच्या कुर्डू गावातील अवैध मुरूम उत्खनन प्रकरणातून राज्यात मोठा वादंग उफाळलाय. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महिला पोलीस अधिकारी IPS अंजना कृष्णा यांना व्हिडिओ कॉलवरून दम दिल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उलट अंजना कृष्णांच्याच नेमणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून नवा स्फोटक मुद्दा उचलला आहे. “पूजा खेडकरप्रमाणेच घोळ” – मिटकरी अकोल्यात बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “अंजना कृष्णा या मग्रूर अधिकारी आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नाही असं म्हणणं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. पूजा खेडकर प्रकरणात जसा गोंधळ झाला, तसाच गोंधळ अंजना कृष्णांच्या UPSC निवड प्रक्रियेत झाला असावा, अशी आमची शंका आहे. त्यामुळे याची चौकशी झालीच पाहिजे.” IPS अंजना कृष्णा कोण? मूळ केरळमधील त्रिवेंद्रमच्या UPSC 2023 मध्ये 355 वा क्रमांक, IPS केडर सुरुवातीला केरळमध्ये एसीपी पदावर काम सध्या सोलापूर ग्रामीण पोलिसात नियुक्ती प्रोबेशन काळातच करमाळा व माढा येथे अवैध व्यवसायाविरोधात मोठी कारवाई नुकत्याच मुरूम उपसा प्रकरणात ठाम भूमिका घेतल्याने चर्चेत पवारांच्या दबावाखाली कारवाई? मिटकरींच्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटलाय. अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले, तर दुसरीकडे IPS अंजना कृष्णांच्या नेमणुकीवरच प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेसने बचावात्मक भूमिका घेतल्याचं स्पष्ट होतंय.

अजित पवारांचा फोन, IPS अंजना कृष्णांची ठाम भूमिका, आणि मिटकरींचा बॉम्ब! Read More »

एका तासात दोन जीआर! सरकारच्या घाईगडबडीवर भुजबळांचा स्फोटक सवाल

मुंबई :मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांवर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. एका तासाच्या आत दोन वेगवेगळे जीआर काढले गेल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. पहिल्या जीआरमध्ये “मराठा समाजातील पात्र व्यक्ती” असा उल्लेख होता. मात्र मनोज जरांगेंच्या आक्षेपानंतर हा शब्द वगळून तात्काळ दुसरा जीआर काढला गेला. “जर चुकीचं होत असेल तर मी कसा काय गप्प राहू? मी माझं मत मांडणार,” असा इशारा भुजबळांनी दिला. शब्दांची हेराफेरी की धोरणात्मक गोंधळ? भुजबळांनी सरकारवर शब्दांची हेराफेरी करून आंदोलन शमवण्याचा आरोप केला. ते म्हणाले, “सरसकट हा शब्द काढून जीआरमध्ये शब्दांशी खेळ केला गेला. पण यामुळे ओबीसींच्या हक्कावर गदा येणार आहे. मराठा समाज ही रुलिंग कम्युनिटी आहे. कोर्टानेही स्पष्ट केलंय की ते सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत.” ओबीसींचा वाटा कमी होणार? भुजबळांच्या मते, आधीच ओबीसी समाजाला मिळणाऱ्या आरक्षणातला मोठा हिस्सा मराठा समाजाकडे जाण्याचा धोका आहे. “एका घरात दहा लोक आहेत, त्यांना बाहेर काढलं नाही; पण आणखी दहा बसवले, तर धक्का बसणारच,” असं त्यांनी स्पष्ट केलं. दिशाभूल केल्याचा थेट आरोप भुजबळांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीचा उल्लेख करत, “सरसकट शब्द काढून हैदराबाद गॅझेट लागू करण्याचं ठरवलंय असं सांगण्यात आलं. पण माझ्याकडे दाखले आहेत की कुणबी आणि मराठा या वेगळ्या जात आहेत. जीआर माझ्या सल्ल्याने काढला अशी दिशाभूल करू नका,” असा थेट निशाणा सरकारवर साधला. सरकार दबावाखाली? “एका तासात दोन जीआर निघाले, सचिवांच्या सह्या आहेत. हा बदल दबावाखाली झाला की प्रेमाखाली? सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे,” असा खोचक सवाल भुजबळांनी उपस्थित केला.

एका तासात दोन जीआर! सरकारच्या घाईगडबडीवर भुजबळांचा स्फोटक सवाल Read More »

गरीब मराठ्यांची लढाई आम्हीच लढतोय; कुणाच्याही खोडीला काही होणार नाही” – मनोज जरांगे पाटील

छत्रपती संभाजीनगर | मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, मराठा समाज आरक्षणात जाणारच आणि यावर आता कुठलाही संभ्रम नाही. “कुणाच्या खोडीला काही होणार नाही. सरकारने काढलेला जीआर योग्य असून, त्यात जर त्रुटी असतील तर दुरुस्त केल्या जातील,” असं ठाम विधान त्यांनी केलं. सध्या उपचार घेत असताना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला. 🔹 “मुलं मुंबईतून जिवंत करून आली” जरांगे म्हणाले –“जर आमचा सरकारवर, फडणवीसांवर राग असता, तर आमची मुलं निब्बर बनियानवर असती. पण त्यांनी मुंबईत जिवंत परत येऊन दाखवलं.” 🔹 जीआर मान्य, पण त्रुटी दुरुस्त “जीआरमध्ये काही त्रुटी आहेत, पण त्या दुरुस्त करू. सुधारित जीआर लवकरच निघेल.” “प्रक्रिया, टाइम बॉंड आणि सुरुवातीची तारीख याबाबत मुख्यमंत्री व विखे पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे.” “आम्ही सरसकट आरक्षण नको म्हणत नाही, पण गरीब मराठे थेट आरक्षणात जातील.” 🔹 संजय राऊत व इतरांना प्रत्युत्तर “हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हाताळलं, दुसऱ्या कुणी नाही.” “उपोषण आम्ही करायचं आणि श्रेय दुसऱ्यांनी घ्यायचं? हे आम्ही मान्य करणार नाही.” “संजय राऊत फार बोलत आहेत, एवढं बार जाऊ द्या.” 🔹 भुजबळांवर खोचक टोला “आम्ही ओबीसींमध्ये गेलो नाही, तर ते आमच्यात आले आहेत. भुजबळांना माहिती होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळणारच. त्यांनी अनेक पक्ष हाताळलेत, त्यामुळे जीआर त्यांना नीट कळतो. पण मराठा समाजाला ‘घुसखोर’ म्हणणं योग्य नाही. हे अधिकृत आहे,” असा टोला जरांगेंनी लगावला. 🔹 “मंडल आयोगावर चॅलेंज करू” “भुजबळ कोर्टात गेले तरी काही होणार नाही. हैद्राबाद गॅझेट हा सरकारी दस्तऐवज आहे.” “जर कोर्टात प्रश्न निर्माण झाले तर मी मंडल आयोगालाच चॅलेंज करेन.” 👉 एकंदर जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाच्या ठाम भूमिकेची पुनरावृत्ती केली आणि विरोधकांना थेट इशारा दिला –“गरीब मराठ्यांची लढाई आम्हीच लढतोय. यात कुणाच्याही खोडीला काही होणार नाही.

गरीब मराठ्यांची लढाई आम्हीच लढतोय; कुणाच्याही खोडीला काही होणार नाही” – मनोज जरांगे पाटील Read More »

काँग्रेसकडे फक्त १६ आमदार, पण सरकारला घाम फोडू शकतो – विश्वजित कदमांचा इशारा

सांगली | काँग्रेस पक्ष आज संघर्षाच्या काळातून जात असला तरी आमच्यात अद्याप ताकद आहे. राज्यातील जनतेशी अन्याय झाला, चुकीचे निर्णय झाले, तर पुढच्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांचा घाम काढण्याची ताकद आमच्यात आहे, असा इशारा काँग्रेस आमदार व माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिला. कडेगाव तालुक्यातील वांगी येथे स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज (बंटी) पाटील, विजय वडेट्टीवार व खासदार विशाल पाटील उपस्थित होते. “फक्त १६ आमदार आहोत, पण…” “आज काँग्रेसचे केवळ १६ आमदार असले तरी पक्षाच्या विचारांवर उभे राहून लढणारी ताकद आमच्यात आहे. सत्ताधाऱ्यांनी जनतेविरुद्ध पावले उचलली, तर काँग्रेस शांत बसणार नाही,” असे विश्वजित कदम म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “मी पतंगराव कदम यांचा मुलगा आहे. बंटी पाटील आमचा वाघ आहे. विजय वडेट्टीवार विदर्भाचे वाघ आहेत. खासदार विशाल पाटील दिल्लीमध्ये काँग्रेसच्या विचारांसाठी लढत आहेत.” “1980 मध्ये कार्यकर्त्यांनी दगडे झेलली” कदम यांनी आठवण करून दिली की,“1980-85 च्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी पतंगराव कदम यांच्यासाठी दगडे झेलली आहेत. त्याग करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठीच मी पुढे काम करणार आहे. आपला पक्ष सत्तेत नसल्यामुळे कामे होत नाहीत, ही कार्यकर्त्यांची नाराजी खरी आहे. पण आजही काँग्रेस कार्यकर्त्यांची ताकद अबाधित आहे.” विशाल पाटील तिकीट वाद कदम म्हणाले की,“विशाल पाटील यांना तिकीट नाकारल्याने आम्ही उठाव केला. त्या वेळी सांगलीने माझं वेगळं रूप पाहिलं. आमच्यातील एकोपा आणि लढण्याची वृत्ती अजूनही कायम आहे.” 👉 काँग्रेस राज्यात आज चौथ्या क्रमांकावर असली, तरी “सरकारला घाम फोडण्याची ताकद आमच्यात आहे” हा विश्वजित कदमांचा दावा पक्ष कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणारा ठरतोय.

काँग्रेसकडे फक्त १६ आमदार, पण सरकारला घाम फोडू शकतो – विश्वजित कदमांचा इशारा Read More »

वडवली ग्रामपंचायतीस नवे भवन – ग्रामविकासासाठी भक्कम पायरी

मौजे वडवली (ता. श्रीवर्धन) येथे ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण ग्रामविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला मंडळ आणि तरुण मंडळाची मोठी उपस्थिती लाभली. 🟠 ग्रामविकासासाठी नवीन पर्व या नव्या ग्रामपंचायत भवनामुळे स्थानिक प्रशासनाचे कामकाज अधिक सुसूत्र व पारदर्शक होणार असून, गावकऱ्यांना विविध सेवा एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होणार आहेत. “ग्रामपंचायत ही ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू आहे. या इमारतीतून गावाच्या प्रगतीसाठी नवे दरवाजे उघडतील,” असे प्रतिपादन मंत्री आदिती तटकरे यांनी केले. 🟠 स्थानिकांचा उत्स्फूर्त सहभाग कार्यक्रमावेळी वडवलीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामविकासाबद्दलची बांधिलकी व्यक्त केली. महिला मंडळ व तरुण मंडळाच्या सक्रिय सहभागामुळे लोकार्पण सोहळ्याला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. 🟠 निष्कर्ष वडवली ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण हा केवळ एका इमारतीचा शुभारंभ नसून, गावाच्या सर्वांगीण विकासासाठीची भक्कम पायरी असल्याचे ग्रामस्थांनी व्यक्त केले.

वडवली ग्रामपंचायतीस नवे भवन – ग्रामविकासासाठी भक्कम पायरी Read More »

‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक

कोकणात कामानिमित्त बाहेरगावी जाऊन पुन्हा गावी परतणाऱ्या नागरिकांना दीर्घकाळापासून ‘चाकरमानी’ म्हणून संबोधले जाते. मात्र हा शब्द आता कालबाह्य असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत – “सरकारी कागदपत्रांमध्ये ‘चाकरमानी’ हा शब्द वापरू नका, त्याऐवजी ‘कोकणवासीय’ असा उल्लेख करा.” 🟠 परिपत्रकाची तयारी मंत्रालयातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, पुढील काही दिवसांत शासन परिपत्रक जारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासकीय पत्रव्यवहार, आकडेवारी आणि योजना अहवालांमध्ये ‘चाकरमानी’ हा शब्द औपचारिकरीत्या हटवला जाणार आहे. 🟠 भाषिक संवेदनशीलता की राजकीय डावपेच? ‘चाकरमानी’ हा शब्द सामाजिक–भावनिक पातळीवर नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. कोकणात कामासाठी मुंबई–पुणे आदी भागात स्थलांतर करणाऱ्या लोकांचा सन्मानपूर्वक उल्लेख व्हावा, अशी मागणी गेल्या काही वर्षांत वाढली होती.राजकीय पातळीवर मात्र या निर्णयाकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील मतदारांपर्यंत ‘भावनिक सुसंवाद’ साधण्याचा प्रयत्न असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. 🟠 स्थानिकांचा प्रतिसाद रत्नागिरीतील एका स्थानिकाने प्रतिक्रिया देताना सांगितले – “आम्ही नोकरीसाठी बाहेर गेलो, पण मुळं आमची कोकणातलीच आहेत. ‘चाकरमानी’ म्हटल्यावर कमीपणाची भावना यायची. आता ‘कोकणवासीय’ हा शब्द आम्हाला अधिक योग्य आणि सन्मानजनक वाटतो.” 🟠 निष्कर्ष हा बदल केवळ भाषिक आहे की त्यामागे खोलवर राजकीय गणिते आहेत, हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र कोकणाशी घट्ट नाळ जोडलेल्या लाखो स्थलांतरितांसाठी शासनाचा हा निर्णय भावनिक दिलासा देणारा ठरेल, यात शंका नाही.

‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक Read More »

पाकिस्तानच्या ‘युद्धाळ’ भाषणांवर भारताचा इशारा – “चुकीची हालचाल केल्यास परिणाम वेदनादायक असतील

भारताने पाकिस्तानने केलेल्या ‘nuclear sabre-rattling’ आणि जलधिकार वादग्रस्त भाषणांवर MEA प्रवक्त्याने कडक इशारा दिला — “No misadventure without painful consequences.” जाणून घ्या तपशील. भारताने पाकिस्तानने केलेल्या ‘nuclear sabre-rattling’ आणि जलधिकार वादग्रस्त भाषणांवर MEA प्रवक्त्याने कडक इशारा दिला — “No misadventure without painful consequences.” जाणून घ्या तपशील. नवी दिल्ली –पाकिस्तानच्या नेत्यांनी अलीकडेच केलेल्या धमक्या आणि युद्धजन्य विधानांवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.MEA प्रवक्ते रणधीर जयसवाल यांनी गुरुवारी स्पष्ट इशारा दिला – “Pakistan would be well-advised to temper its rhetoric as any misadventure will have painful consequences.” अ‍ॅसिम मुनीर यांचा ‘न्यूक्लियर’ इशाराअमेरिकेतील एका कार्यक्रमात पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल अ‍ॅसिम मुनीर यांनी म्हटले होते – “If threatened with an existential threat… we’ll take half the world down with us.” या विधानाला भारताने “nuclear sabre-rattling” असे संबोधून, “ही पाकिस्तानची जुनी सवय” असल्याचे म्हटले. तसेच, आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे ‘जबाबदार आण्विक राष्ट्राच्या’ विरुद्ध उदाहरण म्हणून पाहावे, असे आवाहन केले. ‘स्वतःच्या अपयशावर पडदा’ MEA प्रवक्त्यांनी ठामपणे सांगितले की, पाकिस्तानचे नेतृत्व अंतर्गत आर्थिक व राजकीय अपयश झाकण्यासाठी ‘anti-India rhetoric’ वापरत आहे.यातून भारताची प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न होत असला, तरी “भारत अशा उचकावणाऱ्या भाषणांना न जुमानता, आपल्या सीमांचे रक्षण करण्यास तत्पर आहे” असा संदेश त्यांनी दिला. जलविषयक वादही तापला या पार्श्वभूमीवर Indus Waters Treaty संदर्भातील न्यायालयीन वादाचाही उल्लेख झाला.भारताने Court of Arbitration चा निर्णय मान्य न करण्याचा निर्णय कायम ठेवला असून, यामुळे दोन्ही देशांमध्ये जलधिकार प्रश्न अधिक तापला आहे.तथापि, India-US संबंधांवर याचा परिणाम होणार नसल्याचे MEAने स्पष्ट केले. भारताचा ठाम संदेश पाकिस्तानकडून येणाऱ्या आक्रमक आणि धोकादायक विधानांवर भारताने दिलेले हे स्पष्ट उत्तर म्हणजे केवळ तात्कालिक प्रतिक्रिया नसून, आगामी काळातील राजनैतिक भूमिकेचे संकेत आहेत.भारताने हेही दाखवून दिले आहे की, शब्दांच्या युद्धापेक्षा प्रत्यक्ष कृतीत तो अधिक सक्षम आहे.

पाकिस्तानच्या ‘युद्धाळ’ भाषणांवर भारताचा इशारा – “चुकीची हालचाल केल्यास परिणाम वेदनादायक असतील Read More »

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार महादेवपूरा – बेंगलुरूतील ‘वोट चोरी’ वादाच्या केंद्रस्थानी असलेला मतदारसंघ

बेंगलुरू, ११ ऑगस्ट २०२५: कर्नाटकातील बेंगलुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील महादेवपूरा विधानसभा मतदारसंघ सध्या ‘वोट चोरी’च्या कथित आरोपांमुळे चर्चेत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ७ ऑगस्ट २०२५ रोजी पत्रकार परिषदेत दावा केला की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महादेवपूरामध्ये १,००,२५० बनावट मते टाकण्यात आली, ज्यामुळे भारतीय जनता पक्षाला (भाजप) हा मतदारसंघ जिंकण्यास मदत झाली. निवडणूक आयोगाच्या (EC) आकडेवारीवर आधारित या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या महादेवपूराच्या निवडणूक इतिहासावर आणि मतदारसंख्येच्या वाढीवर एक नजर टाकूया. महादेवपूराची मतदारसंख्या आणि वाढ महादेवपूरा विधानसभा मतदारसंघ २००८ च्या मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेत तयार झाला. २००८ च्या विधानसभा निवडणुकीत येथील मतदारसंख्या २.७५ लाख होती, जी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ६.६ लाखांवर पोहोचली, म्हणजेच १४० टक्क्यांनी वाढ झाली. बेंगलुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील इतर सात विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे. उदाहरणार्थ, सर्वज्ञाननगर मतदारसंघात २००८ ते २०२४ या कालावधीत मतदारसंख्या ३.०५ लाखांवरून ३.८६ लाखांवर (२६.५ टक्के वाढ), शांतीनगरमध्ये २५.२ टक्के, सी.व्ही. रमण नगरमध्ये २३.१ टक्के, शिवाजीनगरमध्ये १९.८ टक्के, राजाजीनगरमध्ये १३.७ टक्के, चामराजपेटमध्ये १२.६ टक्के आणि गांधीनगरमध्ये केवळ ३ टक्के वाढ झाली. ही अभूतपूर्व वाढ महादेवपूराच्या वेगवान शहरीकरणाशी जोडली जाते. २००० च्या दशकात आयटी क्षेत्राच्या वाढीमुळे बेंगलुरूच्या मध्यवर्ती भागात जमिनींचा तुटवडा निर्माण झाला, त्यामुळे महादेवपूरात शेतीच्या जमिनींवर मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली. गेल्या दोन दशकांत हा भाग नवीन स्थलांतरितांसाठी परवडणाऱ्या घरांचा आणि सोईसुविधांचा केंद्र बनला आहे, ज्यामुळे मतदारसंख्येत वाढ झाली. मतदान टक्केवारी आणि निवडणूक निकाल महादेवपूरा मतदारसंघाने २००८ पासून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये सातत्याने बेंगलुरू सेंट्रलमधील इतर मतदारसंघांपेक्षा जास्त मतदान टक्केवारी नोंदवली आहे. २००८ ते २०१८ या कालावधीत विधानसभा निवडणुकांमध्ये महादेवपूरामध्ये सर्वाधिक मतदान टक्केवारी होती, जी २०१३ मध्ये ६१.६ टक्क्यांवर पोहोचली. तथापि, २०२३ मध्ये येथील मतदान टक्केवारी ५५ टक्क्यांवर घसरली, आणि हा मतदारसंघ चौथ्या क्रमांकावर आला. लोकसभा निवडणुकांमध्ये, २०१४ मध्ये महादेवपूरामध्ये ५८ टक्के मतदानासह दुसऱ्या क्रमांकाची टक्केवारी होती, परंतु २०२४ मध्ये ती ५४ टक्क्यांवर येऊन सहाव्या क्रमांकावर गेली. तरीही, मोठ्या मतदारसंख्येमुळे महादेवपूरामध्ये प्रत्यक्ष मतदारांची संख्या नेहमीच सर्वाधिक राहिली आहे. बेंगलुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघात २००९ पासून भाजपाचे पी.सी. मोहन यांनी सलग चार वेळा विजय मिळवला आहे. महादेवपूरा विधानसभा मतदारसंघातही २००९ ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाने आघाडी घेतली. २००९ मध्ये बेंगलुरू सेंट्रलमधील आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघांत भाजपाने, दोन मतदारसंघांत काँग्रेसने आणि एका मतदारसंघात जनता दल (सेक्युलर) ने आघाडी घेतली. २०१४ मध्येही भाजपाने पाच आणि काँग्रेसने तीन जागांवर आघाडी घेतली. २०१९ आणि २०२४ मध्ये दोन्ही पक्षांनी प्रत्येकी चार जागांवर आघाडी मिळवली. विशेष म्हणजे, महादेवपूरा हा एकमेव मतदारसंघ आहे, जिथे २००९ ते २०२४ या कालावधीत भाजपाची मतांची टक्केवारी सातत्याने वाढत गेली – २००९ मध्ये ४५.६ टक्क्यांवरून २०२४ मध्ये ६४.७ टक्क्यांपर्यंत. राहुल गांधी यांचे ‘वोट चोरी’चे आरोप राहुल गांधी यांनी ७ ऑगस्ट २०२५ रोजी पत्रकार परिषदेत दावा केला की, महादेवपूरामध्ये ६.५ लाख मतांपैकी १,००,२५० मते बनावट होती. त्यांनी पाच प्रकारच्या गैरप्रकारांचा उल्लेख केला: ११,९६५ डुप्लिकेट मते, ४०,००९ बनावट किंवा अवैध पत्ते, १०,४५२ एकाच पत्त्यावर मोठ्या संख्येने मतदार, ४,१३२ अवैध छायाचित्रे आणि ३३,६९२ फॉर्म ६ चा गैरवापर. त्यांनी शकुन राणी नावाच्या ७० वर्षीय महिलेचे उदाहरण दिले, जी कथितरित्या दोनदा नवीन मतदार म्हणून नोंदली गेली आणि दोनदा मतदान केले. तसेच, गुरकीरत सिंग दंगल नावाच्या मतदाराने चार मतदान केंद्रांवर मतदान केल्याचा दावा केला. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, बेंगलुरू सेंट्रलमध्ये काँग्रेसने सातपैकी सहा विधानसभा मतदारसंघांत आघाडी घेतली होती, परंतु महादेवपूरामध्ये भाजपाने १,१४,०४६ मतांनी विजय मिळवला, ज्यामुळे एकूण निकाल बदलला. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर डिजिटल मतदार याद्या आणि सीसीटीव्ही फुटेज न देण्याचा आरोप केला, ज्यामुळे गैरप्रकार लपवले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाचा प्रतिसाद कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना “खोटे आणि दिशाभूल करणारे” म्हटले आहे. त्यांनी ७ ऑगस्ट २०२५ रोजी पत्र लिहून गांधी यांना नियम २० (३) (ब) अंतर्गत शपथपत्रासह बनावट मतदारांची नावे सादर करण्यास सांगितले. प्राथमिक तपासात शकुन राणी यांनी फक्त एकदाच मतदान केल्याचे आढळले आहे, आणि त्यांनी सादर केलेले कागदपत्र मतदान अधिकाऱ्याने जारी केलेले नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया पारदर्शक आहे आणि सर्व पक्षांना ड्राफ्ट आणि अंतिम मतदार याद्या पुरवल्या गेल्या होत्या. पुढे काय? या वादाने निवडणूक आयोग आणि काँग्रेसमधील तणाव वाढवला आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीने ११ ऑगस्ट रोजी संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत निषेध कूच आयोजित केला आहे, आणि १७ ऑगस्टपासून बिहारमध्ये दोन आठवड्यांची जनजागृती यात्रा सुरू होणार आहे. काँग्रेसने ऑनलाइन मोहीम सुरू केली असून, डिजिटल मतदार याद्या जाहीर करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, निवडणूक आयोगाने गांधी यांना पुरावे सादर करण्यास किंवा माफी मागण्यास सांगितले आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई होऊ शकते. निष्कर्ष महादेवपूराची वाढती मतदारसंख्या आणि निवडणूक निकाल यामुळे हा मतदारसंघ कायमच चर्चेत राहिला आहे. राहुल गांधी यांचे आरोप आणि निवडणूक आयोगाचा प्रतिसाद यामुळे हा वाद अधिक तीव्र झाला आहे. या प्रकरणात ठोस पुरावे आणि कायदेशीर प्रक्रिया यावरच पुढील दिशा ठरेल.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार महादेवपूरा – बेंगलुरूतील ‘वोट चोरी’ वादाच्या केंद्रस्थानी असलेला मतदारसंघ Read More »