मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वाची बैठक; बेटी बचाओ अभियानासह अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा
मुंबई | महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कुटुंब सल्ला केंद्रांचे प्रलंबित प्रश्न, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा आढावा, चेंबूर येथील अहिल्या भवन, दि चिल्ड्रेन एड सोसायटी, तसेच राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य निवडी संदर्भात महत्त्वाची चर्चा झाली. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानावर भर बैठकीत सांगण्यात आले की या अभियानाअंतर्गत आरोग्य शिबिरे, पथनाट्य, मुलींच्या जन्माचे स्वागत अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. हे उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक प्रभावीपणे राबवावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. कुटुंब सल्ला केंद्रांचे वन स्टॉप सेंटरमध्ये विलिनीकरण सध्या कार्यरत असलेली ४४ कुटुंब सल्ला केंद्रे ही वन स्टॉप सेंटरमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर केंद्रातील केस वर्कर आणि समुपदेशकांना वन स्टॉप सेंटरमध्येच समुपदेशक पदावर नियुक्त करण्याची सूचना देण्यात आली. संस्थांना निधी आणि पदभरतीची गरज विभागाच्या विविध योजना ७९ संस्थांमार्फत राबवल्या जात असून या संस्थांना आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पदभरती करावी, असेही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले. चेंबूर येथील अहिल्या भवनावर तातडीची कार्यवाही बैठकीत चेंबूर येथील अहिल्या भवनाच्या उभारणीबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. अधिकारी उपस्थित या बैठकीस विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त श्रीमती नयना गुंडे, सहसचिव वि.रा. ठाकूर, सहआयुक्त राहुल मोरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.