konkandhara.com

बातम्या

कोकणात नवरात्रोत्सवाची पारंपरिक धूम : रोहा तालुक्यात महिलांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम

कोकणात सध्या नवरात्रोत्सवाची पारंपरिक धूम पाहायला मिळत आहे. रोहा तालुक्यातील वर्से गावात काळभैरव ग्रामस्थ मंडळाने नव्याने बांधलेल्या जरीमरी मंदिरात नवरात्रोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडले. या कार्यक्रमात महिलांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नऊ दिवस विविध मनोरंजक स्पर्धा व सांस्कृतिक उपक्रम ठेवले होते. त्यात विशेष आकर्षण ठरली पाककला स्पर्धा. या स्पर्धेतून गावातील महिलांची कला आणि परंपरा पुढे आली. या पाककला स्पर्धेत विजेतेपद पटकावून ‘शोध सुगरणीचा’ हा मान राणी म्हात्रे यांना मिळाला. मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात ग्रामस्थ, महिला व तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. वर्से गावातील ग्रामस्थांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे गावातील महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते आणि नवरात्रोत्सवाचा आनंद अधिकच वाढतो. पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा हा उत्सव महिलांच्या सहभागामुळे अधिक रंगतदार झाला आहे.

कोकणात नवरात्रोत्सवाची पारंपरिक धूम : रोहा तालुक्यात महिलांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम Read More »

रत्नागिरीत आईनेच आठ महिन्यांच्या मुलीची हत्या; पोलिस तपास सुरू

रत्नागिरी, कारवांचीवाडी पारसनगर येथे एका आईने आपल्या आठ महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतक बालिकेचे नाव हुरेन आसिफ नाईक असून, तिचा मृतदेह रात्री उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. ही घटना रत्नागिरी तालुक्यासह शहरात खळबळ उडवणारी ठरली आहे. घटनेच्या तपशीलानुसार, रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथील या तरुणीचा विवाह चिपळूणजवळील गावातील तरुणाशी झाला होता. या दाम्पत्याला आधीच चार वर्षांची एक मुलगी आहे. पती कामानिमित्त परदेशात असल्याने महिला आपल्या माहेरी, कारवांचीवाडी येथे राहत होती. महिलेवर मानसिक आजाराचे उपचार सुरू असल्याचे समोर आले आहे. बुधवारी सायंकाळी तिची बहीण बाहेर गेली असताना, आरोपीने आठ महिन्यांच्या हुरेनच्या तोंडात ओढणीचा बोळा कोंबल्याने बाळाचा गुदमरण झाला. ही घटना शेजाऱ्यांना उघडकीस आली आणि त्यांनी तातडीने बाळाला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. ग्रामीण पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून, तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आईने असे कृत्य का केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.

रत्नागिरीत आईनेच आठ महिन्यांच्या मुलीची हत्या; पोलिस तपास सुरू Read More »

दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय: अडाणीविरोधातील गॅग ऑर्डर रद्द, पत्रकारितेच्या स्वातंत्र्यास दिलासा

प्रस्तावना भारतामध्ये पत्रकारितेचा क्षेत्र सतत चर्चेत राहतो. लोकशाहीच्या दृष्टीने मीडिया ही एक महत्वाची चौकशी करणारी संस्था आहे. पत्रकारांकडून आलेल्या चौकशीवर आधारित लेख आणि रिपोर्ट्स सरकार किंवा मोठ्या कॉर्पोरेट समूहांविरोधात आलोचनेच्या रूपात येतात. अशाच पार्श्वभूमीवर दिल्लीच्या रोहिणी जिल्हा न्यायालयाने अडाणी एंटरप्रायझेस लिमिटेड (Adani Enterprises Limited – AEL) विरुद्ध पत्रकारांना लादलेल्या तात्पुरत्या बंदी (गॅग ऑर्डर) रद्द केली आहे. हा निर्णय मीडिया स्वातंत्र्यासाठी मोठा टप्पा मानला जातो. यामुळे पत्रकारांना स्वतंत्रपणे लेखन करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, लोकशाहीत पब्लिक वॉचडॉगची भूमिका अधिक बळकट झाली आहे. प्रकरणाची पार्श्वभूमी अडाणी ग्रुप हा भारतातील एक प्रमुख व्यावसायिक समूह आहे. गेल्या काही वर्षांत या समूहावर अनेक गंभीर आरोप केले गेले आहेत – सरकारी पाठबळ, आर्थिक घोटाळे, शेअर बाजारात हस्तक्षेप आणि पायाभूत सुविधा प्रकल्पात नियमबाह्य लाभ यांचा समावेश आहे. या आरोपांवर आधारित काही पत्रकार आणि मीडिया हाऊसने लेख, रिपोर्ट्स आणि सोशल मीडिया पोस्ट्स प्रकाशित केल्या. त्यावर अडाणी एंटरप्रायझेसने दिल्ली रोहिणी कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला. न्यायालयाने ex-parte (एकपक्षीय) आदेश दिला आणि पत्रकारांना अडाणीविरोधी लेख, रिपोर्ट्स किंवा व्हिडिओ प्रकाशित करण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली. या निर्णयाविरोधात पत्रकारांनी अपील केली आणि जिल्हा न्यायाधीश आशिष अग्रवाल यांनी हा आदेश रद्द केला. न्यायालयाचा निर्णय न्यायालयाने स्पष्ट केले की: न्यायालयाने या निर्णयात पत्रकारितेच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण केले आहे आणि सार्वजनिक हितासाठी केलेल्या पत्रकारितेला मान्यता दिली आहे. मीडिया स्वातंत्र्यावर परिणाम गॅग ऑर्डर हा ex-parte आदेश होता, म्हणजेच पत्रकारांना नोटीस न देता तो लादला गेला. न्यायालयाने स्पष्ट केले की अशा प्रकारचे आदेश टिकाव धरू शकत नाहीत. यामुळे भविष्यात कोणत्याही कॉर्पोरेट किंवा प्रभावशाली संस्थेला पत्रकारांना गप्प बसवण्यासाठी सहजपणे आदेश मिळवणे कठीण होईल. न्यायालयाच्या निर्णयामुळे पत्रकारांना स्वतंत्रपणे चौकशी आधारित लेख, रिपोर्ट्स आणि विश्लेषणे प्रकाशित करण्याचा मार्ग मोकळा झाला. हे पत्रकारितेच्या व्यावसायिक स्वातंत्र्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. मानहानीच्या आरोपाखाली पत्रकारितेवर बंदी घालण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो. हा निर्णय स्पष्ट करतो की सार्वजनिक हितासाठी केलेली पत्रकारिता सुरक्षित आहे. ऑनलाइन प्लेटफॉर्मवर काही लेख, पोस्ट्स, व्हिडिओ हटवण्यात आले होते. आदेश रद्द झाल्यामुळे ते पुन्हा प्रकाशित होऊ शकतात, आणि पत्रकारांना डिजिटल मीडिया स्पेसमधील स्वातंत्र्य मिळते. या निर्णयाने लोकशाहीला स्पष्ट संदेश दिला – सत्ता किंवा संपत्ती कितीही मोठी असली तरी पत्रकारितेला गप्प बसवता येणार नाही. व्यापक परिणाम मीडिया हाऊससाठी दिलासा: मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांविरुद्ध लेखन करताना निर्माण होणारी भीती कमी होईल. न्यायव्यवस्थेची भूमिका: न्यायालयाने पुन्हा एकदा दाखवले की ते लोकशाहीच्या संस्थांचा रक्षण करते. आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम: भारतात मीडिया स्वातंत्र्यावर वारंवार प्रश्न उपस्थित होतात, या निर्णयामुळे जागतिक स्तरावर सकारात्मक संदेश मिळाला आहे. पुढील वाटचाल अडाणी ग्रुप आणि पत्रकारांमधील हा वाद इथेच थांबणार नाही. मानहानीचा दावा अद्याप सुरू राहणार आहे. मात्र, पत्रकारांना आपला पक्ष मांडण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी प्रकाशित केलेली माहिती तथ्याधारित, तपासलेली आणि कायदेशीर चौकटीत असेल तर त्यांना संरक्षण मिळेल. निष्कर्ष दिल्ली कोर्टाचा हा निर्णय मीडिया स्वातंत्र्यासाठी टर्निंग पॉइंट आहे. पत्रकारांना गप्प बसवण्यासाठी मिळवलेले ex-parte आदेश टिकाव धरू शकत नाही हे स्पष्ट झाले आहे. पत्रकारितेचे काम म्हणजे सत्तेला प्रश्न विचारणे, चौकशी करणे आणि जनतेला सत्य माहिती देणे. या प्रक्रियेत अडथळे आणण्याचा कोणताही प्रयत्न न्यायालयाच्या नजरेतून सुटणार नाही, हे या निर्णयाने दाखवून दिले आहे.

दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय: अडाणीविरोधातील गॅग ऑर्डर रद्द, पत्रकारितेच्या स्वातंत्र्यास दिलासा Read More »

गणेशोत्सवासाठी एसटीचा नवा विक्रम : ५.९६ लाख कोकणवासीयांचा सुरक्षित प्रवास, २३.७७ कोटींचं उत्पन्न

यंदाच्या गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून तब्बल ५ लाख ९६ हजारांहून अधिक प्रवाशांनी एसटीद्वारे सुखरूप प्रवास केला. या विशेष सेवेतून एसटीला २३ कोटी ७७ लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी ५ हजार जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली होती. या बसेसनी १५,३८८ फेऱ्या पूर्ण केल्या. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “गणेशोत्सवासाठी आप-आपल्या गावी पोहोचलेल्या लाखो कोकणवासीयांचा सुखरूप प्रवास शक्य करून दाखवणारे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि मार्गदर्शन करणारे अधिकारी खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत.” एसटी महामंडळाने या प्रवाशांची अपघात विरहित सुरक्षित वाहतूक करून नवा इतिहास रचला आहे.

गणेशोत्सवासाठी एसटीचा नवा विक्रम : ५.९६ लाख कोकणवासीयांचा सुरक्षित प्रवास, २३.७७ कोटींचं उत्पन्न Read More »

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता विजयी, राष्ट्रवादीचा पाठिंबा निर्णायक

पाली (10 सप्टेंबर) – अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पराग मेहता विजयी झाले आहेत. 15 पैकी 9 मते मिळवत त्यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार कल्याणी दबके यांचा पराभव केला. तर एक मत तटस्थ राहिले. सुरुवातीला तिरंगी लढतीचे चित्र होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नलिनी म्हात्रे यांनी आपला अर्ज मागे घेत मेहता यांना पाठिंबा दिला. अखेरच्या क्षणी झालेल्या या राजकीय हालचालींमुळे भाजप-राष्ट्रवादी आघाडीला बळ मिळाले. निवडणुकीच्या निकालानंतर ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत मोठा जल्लोष साजरा झाला. या विजयानंतर भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीला महत्त्वाचा राजकीय टप्पा गाठता आला असून आगामी काळात पाली नगरपंचायतीचे राजकारण याच निकालाच्या छायेत ठरणार आहे. खासदार धैर्यशील पाटील यांनी पालीच्या शाश्वत विकासाची ग्वाही दिली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे, भाजप नेते वैकुंठ पाटील, प्रकाशभाऊ देसाई यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते .

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता विजयी, राष्ट्रवादीचा पाठिंबा निर्णायक Read More »

म्हसळा नगराध्यक्षपदी फरीन बशारत, उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे – अधिकृत घोषणा

म्हसळा : म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी नगराध्यक्षपदी नगरसेविका फरीन अ. अजीज बशारत तर उपनगराध्यक्षपदी नगरसेवक अनिकेत पानसरे यांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसची म्हसळा नगरपंचायतीत एकहाती सत्ता असून मावळते नगराध्यक्ष संजय कर्णिक आणि उपनगराध्यक्ष संजय दिवेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत दोघांचेही अर्ज एकमेव दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार नगराध्यक्षपदी फरीन बशारत आणि उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे यांना संधी देण्यात आली. या निवडीच्या वेळी शहराध्यक्ष रियाज घराडे, मावळते नगराध्यक्ष संजय कर्णिक, माजी उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, तसेच नगरसेवक-नगरसेविका आणि पदाधिकारी उपस्थित होते.

म्हसळा नगराध्यक्षपदी फरीन बशारत, उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे – अधिकृत घोषणा Read More »

कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा

कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे. याबाबत पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले असून 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान राज्य सरकारतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. कोल्हापूरच्या शाही दसऱ्याचं वैशिष्ट्यमैसूरच्या शाही दसऱ्याप्रमाणेच कोल्हापूरचा शाही दसरा हा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. संस्थानकाळापासून चालत आलेल्या या परंपरेत राजेशाही थाट कमी झाला असला तरी उत्साह आणि परंपरा आजही तितक्याच जोमात टिकून आहेत. जुना राजवाडा ते दसरा चौक या मार्गावर निघणारा छबिना, त्यातील लवाजमा आणि करवीरकरांची प्रचंड गर्दी हे या सोहळ्याचे खास आकर्षण आहे. पूर्वी हा सोहळा टेंबलाईवाडीच्या माळावर साजरा होत असे. नंतर तो दसरा चौकात होऊ लागला. शाहू महाराजांच्या काळात हा चौक गावाबाहेर होता. भवानी मंडपातून निघणारा लवाजमा, मार्गावरील प्रचंड गर्दी आणि दसरा चौकातील सोने लुटण्याचा सोहळा यामुळे हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला. राजेशाही परंपरेचं आजही पालनआजही दसऱ्याच्या आधीपासूनच दसरा चौकात शाही थाटाची तयारी सुरू होते. लाल-पांढरे शामियाने, जरी पटका, दगडी कमान, पानांची सजावट आणि सोने लुटण्याची खास व्यवस्था अशा परंपरांनी हा सोहळा अधिकच भव्य बनतो. सीमोल्लंघनाचा हा सोहळा दरवर्षी कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवतो.

कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा Read More »

रत्नागिरीत बांबू परिषद आणि शेतकरी मेळावा; १०,००० हेक्टरवर बांबू लागवडीचा संकल्प

रत्नागिरी | आज रत्नागिरीतील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात बांबू परिषद व शेतकरी मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. या वेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, “बांबू ही फक्त एक पिकाची संकल्पना नसून, उत्पन्न वाढवण्याचा आणि नवे उद्योग निर्माण करण्याचा क्रांतिकारी मार्ग आहे.” 👉 येत्या १७ सप्टेंबरला राज्य सरकार महाराष्ट्राची पहिली बांबू पॉलिसी जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.👉 योग्य नियोजन व शेतकऱ्यांच्या सहभागाने बांबू लागवडीतून प्रत्येक शेतकऱ्याला दरमहा ₹३०,००० ते ₹४०,००० अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.👉 रत्नागिरी जिल्ह्यात किमान १०,००० हेक्टरवर बांबू लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे.👉 बांबूपासून फर्निचर, ज्वेलरी, कापड, शूज, मेथेनॉल अशा विविध उद्योगांना चालना मिळू शकते.👉 विमानतळ टर्मिनल बिल्डिंगमधील ५०% फर्निचर बांबूपासून तयार करण्यात येणार आहे, हे कोकणासाठी अभिमानाचे पाऊल असल्याचेही सामंत यांनी सांगितले. “ही परिषद फक्त चर्चा नसून, शेतकऱ्यांच्या आयुष्याला नवा आर्थिक आधार देणारी चळवळ आहे. रत्नागिरी महाराष्ट्रातील सर्वात मोठा बांबू लागवड करणारा जिल्हा बनणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी मंडळाध्यक्ष पाशाभाई पटेल, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, अधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बंधू-भगिनी उपस्थित होते.

रत्नागिरीत बांबू परिषद आणि शेतकरी मेळावा; १०,००० हेक्टरवर बांबू लागवडीचा संकल्प Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून जम्मू-काश्मीर पूरग्रस्तांसाठी मदत ट्रक रवाना

मुंबई | जम्मू-काश्मीरमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्रातून मोठी पुढाकार घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून भाजपा महाराष्ट्र प्रदेशतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला झेंडा दाखवून रवाना केले. पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य, कपडे आणि आवश्यक सामग्री असलेला हा मदत ट्रक जम्मू-काश्मीरकडे रवाना झाला असून, यामुळे तेथील पुनर्वसन प्रक्रियेला मोठा हातभार लागणार आहे. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून जम्मू-काश्मीर पूरग्रस्तांसाठी मदत ट्रक रवाना Read More »

नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता वितरित; 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1892 कोटी जमा

मुंबई | राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता वितरित करण्यात आला. या अंतर्गत 91 लाख 65 हजार 156 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1892.61 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घेतलेल्या या निर्णयासोबतच मंत्रिमंडळ बैठकीत आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 🟢 शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत उपसा जलसिंचन योजनांना पुढील दोन वर्षांसाठी वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वीजदर सवलत योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. 🟢 पायाभूत सुविधा विकासासाठी कर्ज नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेत हुडकोकडून दोन हजार कोटींचे कर्ज घेण्यात येणार आहे. यामधून छत्रपती संभाजीनगरला 822 कोटी, नागपूरला 268 कोटी, तर मीरा-भाईंदरला 116 कोटींचा निधी मिळणार आहे. 🟢 लघुपाटबंधारे योजनांची दुरुस्ती अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडी लघुपाटबंधारे योजनांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी घोंगासाठी 4 कोटी 76 लाख, तर कानडीसाठी 4 कोटी 92 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 🟢 इंटेलिजन्स ब्युरोसाठी जमीन केंद्र सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरोला आसुडगाव–पनवेल येथील जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता वितरित; 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1892 कोटी जमा Read More »