konkandhara.com

राजकारण

अमेरिकन खासदारांनी जाहीर केला जेफ्री एप्स्टीनचा “बर्थडे बुक”, ट्रम्प- क्लिंटनचे संदिग्ध संदेश

नवी दिल्ली : अमेरिकन खासदारांनी दिवंगत वित्ततज्ञ आणि दोषी ठरलेल्या लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टीनच्या 2003 मधील “बर्थडे बुक”ची प्रत जाहीर केली आहे. या 238 पानांच्या पुस्तकात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कथित संदेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हाइट हाऊसने हा दावा फेटाळत सांगितले की तो संदेश खोटा असून ट्रम्प यांनी त्यावर स्वाक्षरी केलेली नाही. हे पुस्तक एप्स्टीनच्या 50व्या वाढदिवसानिमित्त त्याची माजी मैत्रीण आणि सह-सहकारी गिसलेन मॅक्सवेल हिने तयार केले होते. यात ट्रम्प व्यतिरिक्त माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, ब्रिटिश राजघराण्याशी संबंधित व्यक्ती, नामवंत व्यावसायिक आणि मॉडेल्सचे संदर्भ आहेत. बिल क्लिंटन यांच्या वतीने सांगण्यात आले की ते एप्स्टीनला ओळखत होते, मात्र त्याच्या गुन्ह्यांबाबत त्यांना काही माहिती नव्हती. त्याचप्रमाणे ब्रिटिश राजकारणी लॉर्ड पीटर मँडेलसन यांचाही संदेश या पुस्तकात आहे. प्रिन्स अँड्र्यूचाही उल्लेख करण्यात आला असून एका महिलेने स्वतः ट्रम्प, क्लिंटन आणि अँड्र्यू यांना एप्स्टीनमार्फत भेटल्याचा दावा केला आहे. या खुलाशांमुळे अमेरिकन राजकारणात पारदर्शकतेची मागणी अधिक तीव्र झाली आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी या प्रकरणाला “फेक” ठरवले असून संबंधित वृत्तपत्राविरोधात 10 अब्ज डॉलर्सची मानहानीची खटला दाखल केला आहे.

अमेरिकन खासदारांनी जाहीर केला जेफ्री एप्स्टीनचा “बर्थडे बुक”, ट्रम्प- क्लिंटनचे संदिग्ध संदेश Read More »

संजय राऊतांचा कृपाल तुमाने यांच्यावर पलटवार : “तुमचं नशीब फुटलंय, ते आधी बघा”शिवसेना आमदारांचे पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा कृपाल तुमाने; संजय राऊत म्हणाले – “शिवसेना निष्ठावंतांची आहे

मुंबई | शिवसेना शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी दावा केला होता की उद्धव ठाकरे यांचे दोन आमदार सोडले तर सर्व आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत आणि दसऱ्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश होईल. या विधानावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार पलटवार करत तुमाने यांना खोचक टोला लगावला आहे. राऊतांचा हल्लाबोल संजय राऊत म्हणाले,“हे कोण बोलतंय? ज्यांचा आम्ही लोकसभेला दारूण पराभव केला. तुम्ही या लोकांना का महत्व देता? ही त्यांची निराशा आहे. आज शिवसेनेत जे आमदार, खासदार आहेत ते शुद्ध आणि निष्ठावंत आहेत. जे पैशाला विकले, ईडी-सीबीआयच्या धमक्यांना घाबरून गेले ते गेले. आता उरलेले हे खरी शिवसेना आहे. त्यांच्यावर बोलणं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान आहे.” “तुमचं नशीब फुटलंय” राऊत पुढे म्हणाले की,“ज्यांनी हे भाष्य केले ते पूर्वी शिवसेनेचे खासदार होते. आमच्याकडून निवडून आल्यानंतर त्यांचा स्वतःच्या मतदारसंघात पराभव झाला. मग त्यांना मागच्या दाराने विधान परिषदेत आणलं. आता ते शिवसेना फुटणार असल्याचं सांगत आहेत. तुमचं नशीब फुटलंय, ते आधी बघा.” राऊत यांनी असंही म्हटलं की भविष्यात शिंदे गटाचा पक्ष भाजपमध्ये विलीन होणार आहे आणि त्याबाबत चर्चा सुरू आहे.

संजय राऊतांचा कृपाल तुमाने यांच्यावर पलटवार : “तुमचं नशीब फुटलंय, ते आधी बघा”शिवसेना आमदारांचे पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा कृपाल तुमाने; संजय राऊत म्हणाले – “शिवसेना निष्ठावंतांची आहे Read More »

Washington: ट्रंपच्या डिनरमध्ये हाय-प्रोफाइल अधिकाऱ्यांची धक्कादायक भांडणाची वेळUS Treasury Secretary स्कॉट बेसेंट आणि FHFA डायरेक्टर बिल पल्टे यांच्यातील वाद हातघाईपर्यंत; क्लब को-फाउंडरने परिस्थिती सावरली

वॉशिंगटन | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या उपस्थितीत झालेल्या एका खास डिनर पार्टीत मोठा गोंधळ उडाला. ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट आणि फेडरल हाऊसिंग फायनान्स एजन्सी (FHFA) चे डायरेक्टर बिल पल्टे यांच्यातील जुना वाद एवढा चिघळला की, थेट हातघाईवर येण्याची वेळ आली. कसा उफाळला वाद? सीएनएनच्या माहितीनुसार, बेसेंट यांनी पल्टेवर आरोप केला की ते ट्रंपकडे त्यांच्या विरोधात वैयक्तिक तक्रारी करत आहेत. यावरून दोघांमध्ये वाद रंगला आणि बेसेंट यांनी पल्टेला शिवीगाळ केली. एवढंच नाही तर त्यांनी धमकी दिली –“किंवा तो इथून निघून जावं, नाहीतर मी बाहेर पडतो. बाहेर चल, नाहीतर तोंडावर मुक्का मारेन.” ही झटापट 3 ऑगस्ट 2025 रोजी वॉशिंगटन डीसीमधील एका खास क्लबमध्ये झाली. परिस्थिती ताणली गेली तेव्हा क्लबचे को-फाउंडर पुढे आले आणि दोन्ही अधिकाऱ्यांना शांत केलं. जुनी वैरभावना हा वाद अचानक उफाळलेला नसून त्यामागे अनेक महिन्यांपासून चालत आलेला सत्ता संघर्ष आहे. बेसेंट, पल्टे आणि कॉमर्स सेक्रेटरी हॉवर्ड लुटनिक यांच्यातील गटबाजी सर्वपरिचित आहे. लुटनिक पल्टेचे जवळचे मानले जातात. अलीकडेच ट्रंप यांनी सार्वजनिक कार्यक्रमात बेसेंट आणि लुटनिक दोघांची स्तुती केली होती, पण त्यांच्यातील अंतर (political gap) सर्वांनाच माहिती आहे. पल्टेचा कद वाढत चालला गेल्या काही आठवड्यांत पल्टेचे ट्रंप प्रशासनात वजन वाढले आहे. कारण, त्यांनी फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नर लिसा कुक यांच्यावर मॉर्गेज फ्रॉडचा आरोप केला होता. या आरोपांनंतर ट्रंप यांनी कुक यांना पदावरून हटवलं. त्यानंतर कुक यांनी प्रशासनाविरोधात न्यायालयीन लढाई सुरू केली आहे. यामुळे पल्टेचं महत्त्व ट्रंपजवळ आणखीन वाढलं, आणि याच पार्श्वभूमीवर बेसेंट–पल्टे वाद पुन्हा पेटल्याचं मानलं जात आहे. बेसेंटचे आधीचे वाद हे पहिल्यांदाच नाही. स्कॉट बेसेंट यांचा स्वभाव आक्रमक असल्याचं मानलं जातं. यापूर्वी त्यांनी व्हाईट हाऊसचे माजी सल्लागार एलन मस्क यांच्यासोबतही आयआरएस प्रमुखाच्या नियुक्तीवरून तीव्र वाद घातला होता. रविवारी ते ट्रंपसोबत US Open मध्ये दिसले, पण त्यांना ट्रंपपासून काही सीट्स दूर बसवण्यात आलं होतं.

Washington: ट्रंपच्या डिनरमध्ये हाय-प्रोफाइल अधिकाऱ्यांची धक्कादायक भांडणाची वेळUS Treasury Secretary स्कॉट बेसेंट आणि FHFA डायरेक्टर बिल पल्टे यांच्यातील वाद हातघाईपर्यंत; क्लब को-फाउंडरने परिस्थिती सावरली Read More »

बिहार निवडणुकीत जागावाटपावरून काँग्रेस-आरजेडीमध्ये पेच; काँग्रेसला फक्त ५० जागा?

नवी दिल्ली | बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यांच्यात जागावाटपावरून पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसने सुमारे ६० जागांची मागणी केली आहे, मात्र आरजेडी फक्त ५० जागांवरच तडजोडीला तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्लीमध्ये काँग्रेसची महत्त्वाची बैठक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी दिल्लीमध्ये बिहार काँग्रेसचे प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आरजेडीसोबतच्या जागावाटपावरील चर्चेसह पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. तसेच राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली नुकतीच पार पडलेली ‘वोटर अधिकार यात्रा’ याचे पुनरावलोकनही होणार आहे. आरजेडी का कमी जागा देत आहे? मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ७० जागांवर लढून केवळ १९ जागा जिंकल्या होत्या. यावेळी विरोधी आघाडीत वीआयपी, जेएमएम आणि पशुपति पारस गट यांचा समावेश झाल्यामुळे काँग्रेसवर कमी जागांवर लढण्याचा दबाव आहे. त्याचबरोबर सीपीआय-एमएलने ३० जागांची मागणी केली आहे, जे मागील वेळेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आरजेडी स्वतः १४० जागा लढण्याच्या तयारीत असून उर्वरित मित्रपक्षांना जागा वाटण्याची योजना आखत आहे. काँग्रेसचा हक्क मजबूत जागांवर? काँग्रेस काही जागा सोडण्यास तयार आहे, मात्र त्याबदल्यात विरोधी समीकरणात प्रभावी ठरतील अशा मजबूत जागा मिळाव्यात, अशी तिची मागणी आहे. मात्र आरजेडीने अद्याप ती मागणी मान्य केलेली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या वाट्याला अखेरीस फक्त ५० जागा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बिहार निवडणुकीत जागावाटपावरून काँग्रेस-आरजेडीमध्ये पेच; काँग्रेसला फक्त ५० जागा? Read More »

पटना तख्त श्री हरमंदिर साहिबला आरडीएक्सने उडवण्याची धमकी; परिसरात हाई अलर्ट

पटना | बिहारची राजधानी पटना येथील तख्त श्री हरमंदिर साहिब गुरुद्वाराला आरडीएक्सने उडवण्याची धमकी मिळाल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला. जीमेलवर आलेल्या या धमकीनंतर त्वरित प्रशासनाला माहिती देण्यात आली आणि संपूर्ण परिसरात हाई अलर्ट जारी करण्यात आला. धमकीनंतर प्रशासन सतर्क धमकीची माहिती मिळाल्यानंतर प्रबंधन समितीने जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि चौक पोलीस ठाण्याला कळवले. तत्काळ बम निरोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि गुरुद्वाराच्या प्रत्येक कोपऱ्याची तपासणी केली. ई-मेलमध्ये काय लिहिलं होतं? प्रबंधन समितीचे सदस्य जगजीत सिंह यांनी सांगितले की, मेलमध्ये लिहिलं होतं – “आपल्या गुरु लंगर कक्षात चार RDX आधारित IEDs ठेवण्यात आले आहेत. विस्फोटापूर्वी व्हीआयपी आणि कर्मचारी तातडीने बाहेर निघून जा.” या संदेशानंतर गुरुद्वारा परिसरात क्षणात खळबळ उडाली. तपासात काहीही संशयास्पद सापडले नाही बम निरोधक पथकाने संपूर्ण तपास केला, मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही. प्राथमिक तपासातून हे मेल एखाद्या शरारती व्यक्तीकडून पाठवले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिस आता या ई-मेलचा स्त्रोत आणि प्रेषकाचा शोध घेत आहेत.

पटना तख्त श्री हरमंदिर साहिबला आरडीएक्सने उडवण्याची धमकी; परिसरात हाई अलर्ट Read More »

देशाला आज मिळणार नवा उपराष्ट्रपती; सी. पी. राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत

नवी दिल्ली | देशात आज (मंगळवार) 15व्या उपराष्ट्रपती पदासाठी मतदान पार पडणार असून याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार आहे. म्हणजेच संध्याकाळपर्यंत देशाला नवा उपराष्ट्रपती कोण होणार हे स्पष्ट होईल. पद रिक्त कसं झालं? माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ऑगस्ट 2022 मध्ये पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2027 पर्यंत राहणार होता. मात्र 21 जुलै रोजी त्यांनी आरोग्य कारणांमुळे राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले आणि नव्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. उमेदवार कोण? या निवडणुकीत एनडीएकडून सी. पी. राधाकृष्णन मैदानात आहेत, तर विरोधी INDIA आघाडीकडून जस्टिस बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नंबर गेम कोणाच्या बाजूने? एकूण 782 प्रतिनिधी मतदान करणार आहेत. त्यापैकी सुमारे 420 पेक्षा जास्त मते एनडीएच्या बाजूने असल्याचा अंदाज आहे, तर INDIA ब्लॉककडे जवळपास 312 मते आहेत. दरम्यान, काही पक्षांनी मतदानात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने 48 मते दोन्ही गटांना मिळणार नाहीत. शर्यत रोचक का आहे? बहुमत एनडीएकडे असलं तरी निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राधाकृष्णन आणि सुदर्शन रेड्डी यांच्या कार्यक्षेत्रात काही साम्य असलं, तरी अनेक मुद्द्यांवर दोघेही परस्परविरोधी आहेत. त्यामुळे या निवडणुकीला राजकीय वर्तुळात वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

देशाला आज मिळणार नवा उपराष्ट्रपती; सी. पी. राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत Read More »

देशाच्या १७व्या उपराष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात; मोदींनी टाकला पहिला मत

नवी दिल्ली | देशाच्या १७व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज संसद भवनात मतदान प्रक्रिया सुरू झाली. सकाळी १० वाजता मतदानास प्रारंभ झाला असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. मंगळवार उशिरापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोदींनी टाकला पहिला मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान करून या निवडणुकीची सुरुवात केली. मतदानानंतर ते हिमाचल आणि पंजाबमधील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजग विरुद्ध विरोधक या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय जनतांत्रिक आघाडीचे (राजग) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा थेट सामना विरोधकांचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्याशी होत आहे. मतदान प्रक्रिया आणि सदस्यसंख्या मतदान संसद भवनातील एफ-१०१ वसुधा कक्षात पार पडत आहे. या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्य सहभागी होतात. राज्यसभेतील २३३ निवडून आलेले सदस्य (सध्या ५ जागा रिक्त) १२ मनोनीत सदस्य लोकसभेतील ५४३ निवडून आलेले सदस्य (सध्या १ जागा रिक्त) एकूण ७८८ सदस्यांपैकी सध्या ७८१ सदस्य मतदानासाठी पात्र आहेत.

देशाच्या १७व्या उपराष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात; मोदींनी टाकला पहिला मत Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘फिनिक्स विशेष सन्मान’ पुरस्काराने गौरव

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज मराठी पत्रकार संघाकडून ‘फिनिक्स विशेष सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबईत आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले. राज्याच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मराठी पत्रकार संघाकडून देण्यात येणारा हा पुरस्कार राज्यातील कार्यक्षमता, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन प्रदान केला जातो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘फिनिक्स विशेष सन्मान’ पुरस्काराने गौरव Read More »

जेएनपीएत देशातील सर्वांत मोठं कंटेनर टर्मिनल सुरू; महाराष्ट्र समुद्री महासत्ता बनेल : फडणवीसपीएसए इंडियाच्या सहकार्याने उभारलेलं प्रकल्प; वार्षिक हाताळणी क्षमता दुप्पट होऊन 4.8 दशलक्ष टीईयू

अलिबाग : महाराष्ट्र समुद्री क्षेत्रात मोठी झेप घेत आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPA) येथे देशातील सर्वांत मोठ्या कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, वाढवण बंदर कार्यान्वित झाल्यावर जेएनपीए जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये स्थान मिळवेल. पुढील शंभर वर्षांसाठी महाराष्ट्र समुद्री महासत्ता म्हणून उदयास येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्घाटन सोहळा गुरुवार, 4 सप्टेंबर रोजी झालेल्या या उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ. महेश बालदी, आ. प्रशांत ठाकूर, पराग शहा आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती लावली. तसेच, भारत आणि सिंगापूर दरम्यान नवीन करारनाम्यांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. अत्याधुनिक टर्मिनलची वैशिष्ट्ये पीएसए इंटरनॅशनलद्वारे चालवलं जाणारं हे टर्मिनल 100% अक्षय ऊर्जेवर कार्यरत आहे. हे समर्पित फ्रेट कॉरिडॉर (DFC) अनुरूप असलेलं भारतातील पहिलं कंटेनर टर्मिनल आहे. फेज-2 विस्तारामुळे क्षमता 2.4 दशलक्ष टीईयू वरून दुप्पट होऊन 4.8 दशलक्ष टीईयू झाली आहे. घाटाची लांबी 2000 मीटरपर्यंत वाढली असून, 24 घाट क्रेन आणि 72 रबर-टायर्ड गॅन्ट्री क्रेन (RTG) यांचा समावेश आहे. हे टर्मिनल रस्ते व रेल्वेद्वारे 63 हून अधिक इनलँड कंटेनर डेपो (ICD) शी जोडले गेले आहे, ज्यामुळे हे देशातील सर्वात व्यापक मल्टीमॉडल नेटवर्क ठरलं आहे. उद्योगक्षेत्रातील अपेक्षा उद्योग तज्ञांनी या प्रकल्पाला “गेम-चेंजर” म्हटलं आहे. अत्याधुनिक उपकरणे आणि मजबूत पायाभूत सुविधा यामुळे पीएसए मुंबई भारताच्या सागरी विकासाचा प्रमुख चालक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. Quote “वाढवण बंदर कार्यान्वित झाल्यावर जेएनपीए जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये स्थान मिळवेल. पुढील शंभर वर्षांसाठी महाराष्ट्र समुद्री महासत्ता म्हणून उदयास येईल.”– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जेएनपीएत देशातील सर्वांत मोठं कंटेनर टर्मिनल सुरू; महाराष्ट्र समुद्री महासत्ता बनेल : फडणवीसपीएसए इंडियाच्या सहकार्याने उभारलेलं प्रकल्प; वार्षिक हाताळणी क्षमता दुप्पट होऊन 4.8 दशलक्ष टीईयू Read More »

KDMC News : 27 गावांच्या भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह – सुप्रीम कोर्टात याचिका, निवडणुका लांबणीवर?७ ऑक्टोबरला सुनावणी; सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचा ठाम पवित्रा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रातील 27 गावांना महापालिकेतून वगळण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या गावांना स्वतंत्र महापालिका मिळावी यासाठी सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे केडीएमसीच्या आगामी निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुनावणीची तारीख ७ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. काय आहे याचिका? समितीच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेत पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत : 27 पैकी 18 गावे वगळण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती; ती रद्द करावी या 27 गावांमध्ये निवडणूक घेऊ नये प्रकरणावर तातडीने सुनावणी घेऊन निर्णय द्यावा 3,500 पेक्षा जास्त हरकती केडीएमसी निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर, फक्त या 27 गावांतूनच तब्बल 3,500 हरकती दाखल झाल्या आहेत. बहुतांश हरकतींमधून गावकऱ्यांनी महापालिकेतून वेगळे होण्याची मागणी नोंदवली आहे. 42 वर्षांचा संघर्ष समितीचे सहसचिव सुमित वझे यांनी सांगितले की, “आम्ही गेल्या 42 वर्षांपासून 27 गावांच्या विकासासाठी लढा देत आहोत. केडीएमसी ही गावांच्या विकासाला खीळ घालणारी ‘दरोडेखोर’ महापालिका आहे. कै. दि. बा. पाटील आणि रतन म्हात्रे यांनी या वेगळेपणासाठी संघर्ष केला. आता भिवंडीचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्या पुढाकाराने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.” पुढे काय? या प्रकरणातील सुप्रीम कोर्टाचा निर्णय 27 गावांच्या राजकीय आणि प्रशासकीय भवितव्याचा मार्ग निश्चित करेल. दरम्यान, निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आहे.

KDMC News : 27 गावांच्या भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह – सुप्रीम कोर्टात याचिका, निवडणुका लांबणीवर?७ ऑक्टोबरला सुनावणी; सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचा ठाम पवित्रा Read More »