konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • श्री दत्त मंदिर लकरकोट बांदा आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Image

श्री दत्त मंदिर लकरकोट बांदा आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बांदा : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात.समाजात मानवतेची भावना जपणारे असे उपक्रम सातत्याने राबविले गेले पाहिजेत, असे प्रतिपादन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले.श्री दत्त मंदिर लकरकोट बांदा व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्री दत्त मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास प्रचंड उष्मा असूनही रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ४० हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन तोरसे (पेडणे) गावच्या माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ.प्रार्थना मोटे,उद्योजक प्रभाकर मोटे,बांदा सरपंच प्रियांका नाईक,उपसरपंच रत्नाकर आगलावे,तोरसे जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य रमेश सावळ,दत्तप्रसाद कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुशांत पांगम,उपाध्यक्ष रामचंद्र उर्फ भाऊ वाळके,बांबोळी रक्तपेढीचे डॉ.पास्कल तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने संपन्न झाले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो,असे सांगितले.तरुणांनी रक्तदानास पुढाकार घ्यावा,महिलांनीही निर्भयपणे सहभाग घ्यावा,असे आवाहनही करण्यात आले.शिबिर यशस्वी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राकेश केसरकर,सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे निलेश मोरजकर,अक्षय मयेकर,राजेश विरनोडकर,दर्पण आळवे,शुभम साळगावकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.रक्तदात्यांची नोंदणी,मार्गदर्शन,व्यवस्था आणि नियोजन यासाठी स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका बजावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पिळणकर यांनी केले,तर आभार रामचंद्र उर्फ भाऊ वाळके यांनी मानले.विशेष म्हणजे या शिबिरात महिलांनी देखील उत्स्फूर्त रक्तदान करून सामाजिक जाणीवेचा आदर्श घालून दिला.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे