konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • बालभवन इब्रामपुरच्या गुणदर्शन कार्यक्रमात बालकलाकारांचा रंगला सुरेल जल्लोष !
Image

बालभवन इब्रामपुरच्या गुणदर्शन कार्यक्रमात बालकलाकारांचा रंगला सुरेल जल्लोष !

दोडामार्ग : भूषण सावंत : इब्रामपुर येथील बालभवन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी शिबिराच्या गुणदर्शन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालकलाकारांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकत संपूर्ण वातावरण कला, संगीत आणि उत्साहाने भारावून गेले.

या कार्यक्रमासाठी इब्रापूर गावचे सरपंच अशोक धाऊसकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर बालभवन पणजीचे रिसोर्स पर्सन कमलाकांत गवस, ग्रामपंचायत सदस्य स्मिता गवस, उर्मिला परब, अजित शेटकर आणि गोविंद सावंत हे सन्मानित पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालभवन केंद्राच्या केंद्रप्रमुख रूपा नाईक होत्या.

यावेळी विद्यार्थ्यांनी संवादिनी वादन, तबला वादन, नृत्य, गायन अशा विविध कलाविष्कारांचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांकडून भरभरून दाद मिळवली. छोट्या कलाकारांचा आत्मविश्वास, कलागुण आणि सादरीकरणातील सफाई पाहून उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी प्रांजल नाईक आणि नित्या गवस यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्ण शैलीत केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी रूपा नाईक यांनी उपस्थित मान्यवर, पालक आणि ग्रामस्थांचे आभार मानले.

यावेळी बालभवन केंद्राचे शिक्षक पुनेश राणे, रामा गवस, अशोक केणी, समीक्षा गवस आणि रितिक शेटये उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि कलाप्रेमींनी उपस्थित राहून बालकलाकारांना उत्स्फूर्त प्रोत्साहन दिले.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे