konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • आंजर्ले-मुर्डीत रस्ते दुरुस्तीसाठी ८ मे रोजी जनआंदोलन; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ग्रामस्थ आक्रमक
Image

आंजर्ले-मुर्डीत रस्ते दुरुस्तीसाठी ८ मे रोजी जनआंदोलन; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ग्रामस्थ आक्रमक


दापोली: प्रतिनिधी,
आंजर्ले आणि मुर्डी गावातील रस्त्यांची महावितरणच्या कामामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दाद देत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या शुक्रवार, दिनांक ८ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून आंजर्ले खाडी पूल ते वाकडा आंबा परिसरात हे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे


रस्त्यांची चाळण आणि प्रशासनाची उदासीनता
मिळालेल्या माहितीनुसार, आंजर्ले आणि मुर्डी गावांमध्ये महावितरणमार्फत भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले होते. मात्र, हे काम झाल्यानंतर रस्त्यांची डागडुजी न केल्याने रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग (दापोली) आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे ग्रामस्थांनी अनेकदा लेखी तक्रारी केल्या, तसेच तोंडी पाठपुरावाही केला. मात्र, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
आंदोलनाचा इशारा
प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे ग्रामस्थांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे. दररोजच्या प्रवासात होणारा त्रास आणि संभाव्य अपघात लक्षात घेता, ‘आता नाही तर कधीच नाही’ असा पवित्रा घेत ग्रामस्थांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, दापोली यांना देण्यात आले आहे.


आंदोलनाचे तपशील:
दिनांक: ८ मे २०२६ (शुक्रवार)
वेळ: सकाळी ९:०० वाजल्यापासून
ठिकाण: आंजर्ले खाडी पूल ते वाकडा आंबा
“आम्ही वारंवार विनंती करूनही आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. जोपर्यंत रस्ते दुरुस्तीचे ठोस आश्वासन आणि काम सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी भावना अंजली आणि मुरली येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या आंदोलनात भास्कर जोशी, मंगेश महाडिक, शशी पेंडसे, भालचंद्र कोकणे, स्वानंद जोशी, श्रावण दांडेकर, व तसेच दोन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

Releated Posts

परंपरेचा वारसा, स्त्रीकर्तृत्वाचा गौरव!

भोरगाव लेवा पाटीदार पंचायतच्या वतीने ‘नवदुर्गा सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात; विविध क्षेत्रांतील नऊ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान अंबरनाथ…

ByByEditorial नवम्बर 23, 2026

देवगडच्या समुद्रात मध्यरात्री थरार! तासभर पाठलाग करून कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर जप्त

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या परराज्यातील नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे.…

ByByEditorial नवम्बर 23, 2026

रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा राज्यव्यापी बंद!

मुंबई-पुण्यात संमिश्र प्रतिसाद; कोल्हापुरात हजारो रिक्षाचालक सहभागी, ठाण्यात सेवा सुरळीत मुंबई : अॅपआधारित रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेमुळे पारंपरिक…

ByBycare.eviano@gmail.com नवम्बर 23, 2026

अलिबागमध्ये नार्वेकर बंधूंची जमीन खरेदी; आदिवासींची घरे पाडल्याचा आरोप!

संजय राऊतांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; म्हात्रोळीतील कातकरी कुटुंबांच्या विस्थापनाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग…

ByBycare.eviano@gmail.com नवम्बर 23, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

परंपरेचा वारसा, स्त्रीकर्तृत्वाचा गौरव!
देवगडच्या समुद्रात मध्यरात्री थरार! तासभर पाठलाग करून कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर जप्त
रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा राज्यव्यापी बंद!
अलिबागमध्ये नार्वेकर बंधूंची जमीन खरेदी; आदिवासींची घरे पाडल्याचा आरोप!
अखिलेश यादव यांचे फेसबुक पेज दीड तास गायब!
शिरसाटांच्या गौप्यस्फोटावर शिंदेंची सावध प्रतिक्रिया!
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक बदल होणार?
रोहित पवारांच्या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा!
एनव्हिडियाच्या नेतृत्वात पुन्हा जेनसन हुआंग!