konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • अंजनवेल किनाऱ्यावर बेकायदेशीर मासेमारीवर कारवाई; दोन नौकांना लाखोंचा दंड
Image

अंजनवेल किनाऱ्यावर बेकायदेशीर मासेमारीवर कारवाई; दोन नौकांना लाखोंचा दंड

रत्नागिरी (प्रतिनिधी) – गुहागर तालुक्यातील अंजनवेल दीपस्तंभासमोर समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई करत लाखोंचा दंड ठोठावला आहे. ही कारवाई शुक्रवारी (१३ मार्च) रात्री सुमारे १० वाजता करण्यात आली.

सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या पथकाने नवदुर्गा गस्ती नौकेतून समुद्रात गस्त घालत असताना ही कारवाई केली. परवाना अधिकारी स्वप्निल चव्हाण, पर्यवेक्षक विनायक शिंदे, सुरक्षारक्षक अक्षय मयेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंजनवेल किनाऱ्यापासून सुमारे २० वाव अंतरावर संशयास्पद हालचाली करणाऱ्या नौकांची पाहणी केली.

यावेळी रत्नागिरीतील ए. आर. मयेकर यांच्या मालकीची ‘श्री सद्गुरू कृपा’ ही नौका एलईडी प्रकाशाचा वापर करून मासेमारी करताना आढळली. तसेच गुजरातमधील दीव येथील ट्रॉलिंग नौकाही बेकायदेशीररीत्या मासेमारी करताना सापडली.

दोन्ही नौकांना ताब्यात घेऊन दाभोळ बंदरात अटकावून ठेवण्यात आले. यानंतर परवाना अधिकाऱ्यांनी अभिनिर्णय अधिकारी तथा सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त सागर कुवेस्कर यांच्या न्यायालयात अहवाल सादर केला.

मंगळवारी झालेल्या सुनावणीत अभिनिर्णय अधिकारी सागर कुवेस्कर यांनी निर्णय देत एलईडी मासेमारी करणाऱ्या ‘श्री सद्गुरू कृपा’ नौकेचे मालक ए. आर. मयेकर यांना ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच गुजरातमधील ट्रॉलिंग नौकेचे मालक विनोद सोळंखी यांना ३ लाख २७ हजार ८०० रुपयांचा दंड भरण्याचे आदेश देण्यात आले.

या कारवाईमुळे बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून मत्स्यव्यवसाय विभागाने अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा दिला आहे.

Releated Posts

स्वप्ना यादव यांचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने सन्मान, कोल्हापूरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव; सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

प्रतिनिधी : कोकणधारा कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. आयोजित सहकारी पतसंस्थांचा महिला मेळावा शुक्रवारी (ता.…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ खेर्डी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

“रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेससीसीटीव्ही, अधिक आसन क्षमता; प्रवास होणार आरामदायी”

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यभरातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

मोठ्या गाजावाजात सुरू झालेली मुंबई विजयदुर्ग रो रो बोट सेवा बंद

प्रतिनिधी : कोकणधारा कोकणासाठी मोठ्या आशेचा किरण ठरलेली मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा आता अचानक ठप्प झाली आहे.गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर…

ByByEditorial अप्रैल 5, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

चिपळूणच्या स्वप्ना यादव यांना कोल्हापूरमध्ये ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार; सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव.
खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश; स्थानिक राजकारणात खळबळ
रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस; अधिक सुविधा, आरामदायी प्रवास
मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा बंद; कमी प्रतिसाद आणि महागडे दर कारणीभूत
sangmeshwar-student-harassment-case-accused-arrested-devrukh
chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी