konkandhara.com

Image

आपलं चिपळूण संस्थेची नवी कार्यकारिणी जाहीर

चिपळूण, ता. ११ : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी ओळखली जाणारी आपलं चिपळूण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेंड येथील स्प्रिंग क्लिनिकमधील संस्थेच्या कार्यालयात पार पडली. यावेळी पुढील पाच वर्षांसाठी नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

२०१२ पासून कार्यरत असलेल्या या संस्थेने प्रसिद्धीपासून दूर राहून निःस्वार्थ भावनेने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. शिक्षण, कला, क्रीडा, आरोग्य शिबिरे, निराधारांना मदत, निसर्ग संवर्धन, प्राणी-पक्षी संरक्षण, शहर सुशोभीकरण तसेच दुर्गम भागातील विद्यार्थी आणि निराधार वृद्धांना सहाय्य अशा अनेक क्षेत्रांत संस्थेचे योगदान राहिले आहे.

सभेत आगामी वर्षासाठी विविध उपक्रमांचा सविस्तर आराखडा निश्चित करण्यात आला. चिपळूण शहराच्या विकासासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी आणि नदी-नाले संवर्धन कार्यकर्त्यांसोबत चर्चासत्र आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच कोकणातील परंपरा आणि संस्कृतीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, पुस्तक रोटेशन योजना, गुणवंत विद्यार्थ्यांमार्फत मार्गदर्शन शिबिरे, गड-किल्ले भ्रमंती, पशु-पक्षी निरीक्षण, वृक्षलागवड, कार्बन क्रेडिट योजनेबाबत जनजागृती तसेच आरोग्य, ध्यान, मनःशांती आणि निसर्गोपचार विषयक उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला.

बैठकीच्या शेवटी गेल्या १४ वर्षांपासून कार्यभार सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. मावळते अध्यक्ष उदय ओतारी यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली.

नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी डॉ. यतिन जाधव, कार्याध्यक्षपदी संतोष देशमुख, उपाध्यक्षपदी प्रशांत पाटेकर व मनोज जाधव, सचिवपदी उदय ओतारी, सहसचिवपदी प्रशांत देवळेकर, खजिनदारपदी फैय्याज देसाई, सहखजिनदारपदी राजू दरेकर यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून जितेंद्र सुर्वे, निहार जोशी, मंगेश गोंधळेकर, प्रसन्न आवले आणि विशाल जानवलकर यांचा समावेश करण्यात आला.

ही संस्था महाराष्ट्र धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत असून लवकरच महिला व पुरुष सर्वसाधारण सभासदांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती विद्यमान सचिव उदय ओतारी यांनी दिली.

Releated Posts

परंपरेचा वारसा, स्त्रीकर्तृत्वाचा गौरव!

भोरगाव लेवा पाटीदार पंचायतच्या वतीने ‘नवदुर्गा सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात; विविध क्षेत्रांतील नऊ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान अंबरनाथ…

ByByEditorial नवम्बर 23, 2026

देवगडच्या समुद्रात मध्यरात्री थरार! तासभर पाठलाग करून कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर जप्त

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या परराज्यातील नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे.…

ByByEditorial नवम्बर 23, 2026

रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा राज्यव्यापी बंद!

मुंबई-पुण्यात संमिश्र प्रतिसाद; कोल्हापुरात हजारो रिक्षाचालक सहभागी, ठाण्यात सेवा सुरळीत मुंबई : अॅपआधारित रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेमुळे पारंपरिक…

ByBycare.eviano@gmail.com नवम्बर 23, 2026

अलिबागमध्ये नार्वेकर बंधूंची जमीन खरेदी; आदिवासींची घरे पाडल्याचा आरोप!

संजय राऊतांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; म्हात्रोळीतील कातकरी कुटुंबांच्या विस्थापनाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग…

ByBycare.eviano@gmail.com नवम्बर 23, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

परंपरेचा वारसा, स्त्रीकर्तृत्वाचा गौरव!
देवगडच्या समुद्रात मध्यरात्री थरार! तासभर पाठलाग करून कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर जप्त
रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा राज्यव्यापी बंद!
अलिबागमध्ये नार्वेकर बंधूंची जमीन खरेदी; आदिवासींची घरे पाडल्याचा आरोप!
अखिलेश यादव यांचे फेसबुक पेज दीड तास गायब!
शिरसाटांच्या गौप्यस्फोटावर शिंदेंची सावध प्रतिक्रिया!
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक बदल होणार?
रोहित पवारांच्या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा!
एनव्हिडियाच्या नेतृत्वात पुन्हा जेनसन हुआंग!