konkandhara.com

13 सितम्बर 2025

रत्नागिरीत बाप्पा रील स्पर्धा २०२५ पारितोषिक वितरण समारंभ; मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती

रत्नागिरी – कोकणची संस्कृती, गणपती सण आणि कलात्मक परंपरेला उभारी देणाऱ्या “बाप्पा रील स्पर्धा २०२५” या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला उद्योगमंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या निमित्तानं उदय सामंत यांनी सांगितलं की, महाराष्ट्र सरकारनं मराठी चित्रपटसृष्टीसाठी देशातील पहिलीच इन्सेंटिव्ह स्कीम आणली असून कोकण, विदर्भ, मराठवाडा येथील निर्माते, कलाकार आणि टेक्नीशियन यांना मोठं प्रोत्साहन मिळणार आहे. वैभव मांगले यांच्या संकल्पना व संघर्षाच्या प्रवासाचा गौरव करण्यात आला. यावेळी वीणाताई जामकर, माजी आमदार राजन साळवी, बंड्याशेठ साळवी, राजेंद्र महाडिक, सुदेश मयेकर, परशुराम कदम, विजय खेडेकर, शिल्पाताई यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त सर्व कलाकार व सहभागींचं मनःपूर्वक अभिनंदन करून मराठी कला आणि संस्कृतीचा गौरव वाढविण्यात आला.

रत्नागिरीत बाप्पा रील स्पर्धा २०२५ पारितोषिक वितरण समारंभ; मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती Read More »

रोहा शहरात डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाचं भव्य लोकार्पण!

रोह्याच्या सांस्कृतिक वैभवाला नवी ओळख मिळाली. डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीनं पार पडलं. कलाकार सयाजी शिंदे व भरत जाधव यांनी दिलेली भाषणं रंगतदार ठरली. रोहा | रोहा शहराच्या सांस्कृतिक इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाचं भव्य लोकार्पण शनिवारी अत्यंत उत्साहात पार पडलं. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या सोबत राज्याची मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे तसेच मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील मान्यवर अभिनेते सयाजी शिंदे आणि भरत जाधव यांनी हजेरी लावली. नव्या नाट्यगृहाच्या उद्घाटनावेळी रोहात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळालं. रोह्यातील नागरिक, स्थानिक कलाकार, सामाजिक संस्था, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपली मतं मांडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात मान्य करत सांगितलं, “होय, उशीर झाला… पण हा उशीर माझ्या जबाबदारीतलाच आहे. ही माझी चूक आहे. पण आज नाट्यगृह उभं राहिलं आहे, हेच खरं समाधान आहे.” त्यांच्या या स्पष्ट कबुलीनं टाळ्यांचा कडकडाट झाला. मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रकल्पाला मिळालेलं स्थानिक सहकार्य अधोरेखित केलं. त्यांनी सांगितलं की, रोहातील कला, साहित्य, रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी हे नाट्यगृह एक मोठं व्यासपीठ ठरेल. खासदार सुनील तटकरे म्हणाले, “ज्यांनी आधी टीका केली होती… तेच आता या नाट्यगृहाचे चाहते झाले आहेत. हीच खरी कामगिरी आहे.” कार्यक्रमात अभिनेते भरत जाधव यांनी भावनिक शब्दांत आपली कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी म्हटलं, “हे नाट्यगृह म्हणजे माझ्यासाठी सर्वात मोठं दान आहे. इथून अनेक कलाकार घडतील, हीच खरी पुण्याई.” त्यांच्या भावनिक वक्तव्याने सभागृहात दाद मिळाली. यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाट्यगृहात होणाऱ्या पहिल्या नाटकाची घोषणा करत सांगितलं की, “घाशीराम कोतवाल” या सुप्रसिद्ध नाटकाने रोहाच्या रंगमंचावर पहिली घंटा वाजेल. या घोषणेनं प्रेक्षकांत उत्सुकता निर्माण झाली. उद्घाटन समारंभात स्थानिक कलावंतांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण रंगतदार केलं. नाट्यगृहाच्या भव्य वास्तूचं कौतुक सर्वांनीच केलं. आधुनिक ध्वनीप्रणाली, प्रकाशयोजना आणि आसनव्यवस्था यामुळे हे नाट्यगृह कोकणातील एक आदर्श सांस्कृतिक केंद्र ठरेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात आज उत्साहाचं आणि भावनांचं वातावरण पाहायला मिळालं. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हे भव्य नाट्यगृह रोह्याच्या लोकांच्या स्वाधीन करण्यात आलं. या सोहळ्यात मंत्री अदिती तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, “हे नाट्यगृह उभं राहणं सोपं नव्हतं. प्रत्येक टप्प्यावर नवनव्या अडचणी, आपत्ती, संकटं समोर आली. पण आम्ही हार मानली नाही. सर्व अडथळ्यांचा सामना करत, टीका-टिप्पण्यांना उत्तर देत आज हे सभागृह पूर्णत्वास आलं आहे. ही फक्त माझीच नाही, तर रोह्याच्या जनतेची जिद्द आहे.” त्यांच्या या शब्दांनी उपस्थित प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. स्थानिक नागरिक, कलाकार आणि मान्यवर यांनी नाट्यगृहाचं महत्त्व अधोरेखित करत मंत्री तटकरे यांचे आभार मानले. रोहा शहराला या नाट्यगृहामुळे एक वेगळीच सांस्कृतिक ओळख मिळणार आहे. स्थानिक कलाकारांना स्वतःची कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. कला आणि संस्कृतीला चालना देणारी ही पायरी, रोहा शहराच्या सांस्कृतिक वैभवाचा नवा अध्याय लिहील, यात शंका नाही.

रोहा शहरात डॉ. चिंतामणीराव द्वा. देशमुख नाट्यगृहाचं भव्य लोकार्पण! Read More »

मुंबईतील पागडी प्रणालीतील जिर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी आमदार अनिल परब आणि आदित्य ठाकरे यांची mhadaofficial अधिकाऱ्यांसोबत बैठक

मुंबईतील पागडी प्रणाली अंतर्गत येणाऱ्या धोकादायक व जिर्ण इमारतींच्या पुनर्विकास या गंभीर प्रश्नावर आमदार अनिल परब, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे आणि पागडी एकता संघ पदाधिकाऱ्यांनी एमएचएडीएचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुभाष जाधव (IAS) यांची भेट घेतली. सध्या मुंबईत जवळपास 13,800 हून अधिक इमारतींमध्ये सुमारे 10 लाख कुटुंबं गेली 70 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. या इमारतींपैकी बहुतांश इमारती जिर्णावस्थेत असून राहण्यासाठी धोकादायक ठरल्या आहेत. मविआ सरकारच्या काळात भाडेकरूंना पुनर्विकासाचा अधिकार देण्यासाठी कायद्यात बदल करण्यात आले होते. म्हणजेच, जर मालकाने पुनर्विकासास नकार दिला, तरीही भाडेकरूंना तो करण्याचा अधिकार मिळणार होता. मात्र, सध्या ‘कायदेशीररित्या सक्षम प्राधिकरण/संस्था कोण?’ या कारणावरून ही अंमलबजावणी थांबविण्यात आली आहे. आजच्या बैठकीत दोन महत्त्वाच्या मागण्या पुढे मांडल्या गेल्या: या मागण्यांवर चर्चा करताना मान्यवरांनी तातडीच्या उपाययोजनांवर भर दिला. मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी आणि चांगल्या राहणीमानासाठी पुनर्विकासाची प्रक्रिया लवकर सुरू व्हावी, हीच वेळेची गरज असल्याचं एकमत बैठकीत व्यक्त झालं.

मुंबईतील पागडी प्रणालीतील जिर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी आमदार अनिल परब आणि आदित्य ठाकरे यांची mhadaofficial अधिकाऱ्यांसोबत बैठक Read More »

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता विजयी, राष्ट्रवादीचा पाठिंबा निर्णायक

पाली (10 सप्टेंबर) – अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पराग मेहता विजयी झाले आहेत. 15 पैकी 9 मते मिळवत त्यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार कल्याणी दबके यांचा पराभव केला. तर एक मत तटस्थ राहिले. सुरुवातीला तिरंगी लढतीचे चित्र होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नलिनी म्हात्रे यांनी आपला अर्ज मागे घेत मेहता यांना पाठिंबा दिला. अखेरच्या क्षणी झालेल्या या राजकीय हालचालींमुळे भाजप-राष्ट्रवादी आघाडीला बळ मिळाले. निवडणुकीच्या निकालानंतर ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत मोठा जल्लोष साजरा झाला. या विजयानंतर भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीला महत्त्वाचा राजकीय टप्पा गाठता आला असून आगामी काळात पाली नगरपंचायतीचे राजकारण याच निकालाच्या छायेत ठरणार आहे. खासदार धैर्यशील पाटील यांनी पालीच्या शाश्वत विकासाची ग्वाही दिली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे, भाजप नेते वैकुंठ पाटील, प्रकाशभाऊ देसाई यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते .

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता विजयी, राष्ट्रवादीचा पाठिंबा निर्णायक Read More »

म्हसळा नगराध्यक्षपदी फरीन बशारत, उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे – अधिकृत घोषणा

म्हसळा : म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी नगराध्यक्षपदी नगरसेविका फरीन अ. अजीज बशारत तर उपनगराध्यक्षपदी नगरसेवक अनिकेत पानसरे यांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसची म्हसळा नगरपंचायतीत एकहाती सत्ता असून मावळते नगराध्यक्ष संजय कर्णिक आणि उपनगराध्यक्ष संजय दिवेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत दोघांचेही अर्ज एकमेव दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार नगराध्यक्षपदी फरीन बशारत आणि उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे यांना संधी देण्यात आली. या निवडीच्या वेळी शहराध्यक्ष रियाज घराडे, मावळते नगराध्यक्ष संजय कर्णिक, माजी उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, तसेच नगरसेवक-नगरसेविका आणि पदाधिकारी उपस्थित होते.

म्हसळा नगराध्यक्षपदी फरीन बशारत, उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे – अधिकृत घोषणा Read More »

कर्णाची गाथा ज्याने मराठी साहित्य हादरले! – मृत्युंजय समीक्षा

लेखक: शिवाजी सावंतजॉनर: ऐतिहासिक कादंबरीप्रकाशन: कॉन्टिनेन्टल प्रकाशन “मृत्युंजय” ही शिवाजी सावंत यांची मराठी साहित्यातील एक अजरामर कृती आहे, जी महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित आहे. ही कादंबरी कर्णाच्या दृष्टिकोनातून त्याच्या संघर्ष, भावना आणि आदर्श यांची कहाणी सांगते. कर्ण हा एक असा नायक आहे जो अन्याय आणि अपमान यांच्याशी झगडत आपली ओळख निर्माण करतो. ही कथा तुम्हाला कर्णाच्या हृदयापर्यंत घेऊन जाईल! कथेचा थोडक्यात आढावा “मृत्युंजय” कर्णाच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंतचा प्रवास उलगडते. कुन्तीचा पुत्र असूनही त्याला सुतपुत्र म्हणून हिणवले जाते. त्याच्या मैत्री, प्रेम, युद्ध आणि आत्मसंघर्ष यांची कथा इतक्या प्रभावीपणे मांडली आहे की वाचक कर्णाच्या भावनांशी जोडला जातो. ही कादंबरी महाभारताला एक नवीन दृष्टिकोन देते, जिथे कर्ण हा खलनायक नसून एक ट्रॅजिक हिरो आहे. लेखनशैली शिवाजी सावंत यांची लेखनशैली इतकी प्रवाही आणि भावनिक आहे की तुम्ही कर्णाच्या प्रत्येक सुख-दु:खात हरवून जाल. त्यांनी कर्णाच्या मनातील द्वंद्व इतक्या बारकाईने टिपले आहेत की वाचकाला त्याच्या प्रत्येक निर्णयासोबत सहानुभूती वाटते. भाषा साहित्यिक असली तरी ती वाचकाला बांधून ठेवते. काही ठिकाणी कथा थोडी लांबल्यासारखी वाटू शकते, पण ती कर्णाच्या व्यक्तिरेखेच्या खोलीसाठी आवश्यक आहे. खुश्या आणि कमतरता खुश्या: कर्णाच्या व्यक्तिरेखेची अतुलनीय खोली आणि भावनिक चित्रण. महाभारताला नवीन दृष्टिकोन देणारी कथा. साहित्यिक भाषेचा प्रभावी आणि मनाला भिडणारा वापर. कमतरता: काही वाचकांना कथेचा वेग थोडा कमी वाटू शकतो. काही प्रसंग जरा जास्त तपशीलवार वाटतात, जे काही वाचकांना कंटाळवाणे वाटू शकतात. कोणासाठी योग्य? ही कादंबरी ऐतिहासिक आणि पौराणिक कथा आवडणाऱ्या वाचकांसाठी एक खजिना आहे. ज्यांना खोलवर भावनिक आणि साहित्यिक कथा वाचायला आवडतात, त्यांच्यासाठी “मृत्युंजय” एक अविस्मरणीय अनुभव आहे. महाभारतातील कर्णाच्या व्यक्तिरेखेवर नवीन दृष्टिकोन हवा असणाऱ्यांसाठी ही कादंबरी परफेक्ट आहे. वैयक्तिक मत आणि रेटिंग “मृत्युंजय” हे पुस्तक मला थक्क करून गेले! कर्णाच्या जीवनातील प्रत्येक टप्पा इतक्या बारकाईने मांडला आहे की वाचताना आपण त्याच्यासोबत त्या कथेत हरवून जातो. मी याला ४.५/५ स्टार्स देईन!

कर्णाची गाथा ज्याने मराठी साहित्य हादरले! – मृत्युंजय समीक्षा Read More »

कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा

कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे. याबाबत पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले असून 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान राज्य सरकारतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. कोल्हापूरच्या शाही दसऱ्याचं वैशिष्ट्यमैसूरच्या शाही दसऱ्याप्रमाणेच कोल्हापूरचा शाही दसरा हा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. संस्थानकाळापासून चालत आलेल्या या परंपरेत राजेशाही थाट कमी झाला असला तरी उत्साह आणि परंपरा आजही तितक्याच जोमात टिकून आहेत. जुना राजवाडा ते दसरा चौक या मार्गावर निघणारा छबिना, त्यातील लवाजमा आणि करवीरकरांची प्रचंड गर्दी हे या सोहळ्याचे खास आकर्षण आहे. पूर्वी हा सोहळा टेंबलाईवाडीच्या माळावर साजरा होत असे. नंतर तो दसरा चौकात होऊ लागला. शाहू महाराजांच्या काळात हा चौक गावाबाहेर होता. भवानी मंडपातून निघणारा लवाजमा, मार्गावरील प्रचंड गर्दी आणि दसरा चौकातील सोने लुटण्याचा सोहळा यामुळे हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला. राजेशाही परंपरेचं आजही पालनआजही दसऱ्याच्या आधीपासूनच दसरा चौकात शाही थाटाची तयारी सुरू होते. लाल-पांढरे शामियाने, जरी पटका, दगडी कमान, पानांची सजावट आणि सोने लुटण्याची खास व्यवस्था अशा परंपरांनी हा सोहळा अधिकच भव्य बनतो. सीमोल्लंघनाचा हा सोहळा दरवर्षी कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवतो.

कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा Read More »