konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • भास्कर जाधव यांच्या शिलेदाराने केले आमदार शेखर निकम यांचे कौतुक!
Image

भास्कर जाधव यांच्या शिलेदाराने केले आमदार शेखर निकम यांचे कौतुक!

पालिकेच्या कौन्सिल सभेत पवन तलावावर हेलिकॉप्टर न उतरवण्याची मागणी

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पवन तलाव मैदानाच्या संवर्धनाचा मुद्दा ऐरणीवर आला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते भास्कर जाधव यांचे शिलेदार विकी नरळकर यांनी आमदार शेखर निकम यांच्या पवान तलावासाठीच्या विकासासाठी केलेल्या कामाचे कौतुक करत मैदानावर हेलिकॉप्टर उतरवू नये, असा ठराव करण्याची मागणी केली.
चिपळूण नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथील तालीम हॉलमध्ये पार पडली. या सभेत विकी नरळकर यांनी पवन तलाव मैदानाच्या विकासाचा मुद्दा मांडत आमदार शेखर निकम यांच्या कार्याचे कौतुक केले.


त्यांनी सांगितले की, पवन तलाव मैदानाच्या विकासासाठी आमदार निकम यांनी मोठे योगदान दिले असून त्यांच्या माध्यमातून शासनाच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्रातील अधिसूचित विशिष्ठ नागरी सेवा व सुविधा पुरवणे योजनेअंतर्गत सुमारे 1 कोटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून मैदानावर विविध विकास कामे सुरू आहेत.
श्री. नरळकर यांनी पुढे सांगितले की, या मैदानावर टर्फ विकेट तयार करण्यात आली असून लेदर बॉलच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. तसेच येत्या काळात कॉमेंट्री बॉक्स उभारण्यात येणार असून त्यासाठीच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिटही पूर्ण झाले आहे. मैदानावर लाईट पोल उभारण्याचाही प्रस्ताव आमदार निकम यांनी दिला असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर, मैदानाचा दर्जा टिकवण्यासाठी येथे हेलिकॉप्टर उतरवू नयेत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. ‌‘हेलिकॉप्टर उतरल्यास मैदानाचे नुकसान होते, स्पर्धांमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे याठिकाणी हेलिपॅड न ठेवता अन्यत्र व्यवस्था करावी,‌’ असा आग्रह त्यांनी धरला.


यावर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सविस्तर भूमिका स्पष्ट करत सांगितले की, पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून त्यांनी पर्यायी जागा शोधण्याचे निर्देश दिले आहेत. गोवळकोट येथील मैदान, डीबीजे कॉलेज मैदान, तसेच शिवाजीनगर बस स्थानक परिसर अशा तीन जागांचा विचार सुरू असून येत्या महिन्याभरात हेलिपॅडसाठी जागा निश्चित केली जाईल. त्यानंतर पवन तलाव मैदानावर हेलिकॉप्टर न उतरवण्याचा ठराव करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


या चर्चेदरम्यान विकी नरळकर यांनीही समाधान व्यक्त करत तातडीने पर्यायी जागा निश्चित करण्याची मागणी केली. त्यांनी यापूर्वी पर्यटन महोत्सवाच्या वेळी पवन तलाव मैदानावर अनेक हेलिकॉप्टर उतरल्याची आठवण करून देत, ‌‘मैदानाचे नुकसान टाळण्यासाठी विलंब न करता तातडीने निर्णय घ्यावा,‌’ असे ठामपणे सांगितले. त्यांच्या या मागणीचे सर्वांनी कौतुक केले.

स्वागतार्ह निर्णय- दशरथ दाभोळकर


या संदर्भात चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विकी नरळकर यांनी सभेत मांडलेल्या मुद्द्याचे स्वागत केले. ‌‘मैदानावर हेलिकॉप्टर उतरल्यामुळे सामने रद्द करावे लागतात आणि मैदानाची हानी होते. त्यामुळे नगर पालिकेने तातडीने पर्यायी हेलिपॅडची व्यवस्था करावी,‌’ असे त्यांनी सांगितले. त्यांनी या निर्णयाबाबत समाधानही व्यक्त केले.

Releated Posts

२३ हजार कोटींची उलाढाल, तरीही कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा ‘सुपारी’ धोक्यात !

कोकणच्या लाल मातीतील आंबा आणि काजू हे पिक जगप्रसिद्ध आहे. या प्रसिद्धीच्या छायेत सुपारी हे पिक मात्र फारसे…

ByByEditorial अप्रैल 23, 2026

भास्कर जाधव यांच्या शिलेदाराने केले आमदार शेखर निकम यांचे कौतुक!पालिकेच्या कौन्सिल सभेत पवन तलावावर हेलिकॉप्टर न उतरवण्याची मागणी

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पवन तलाव मैदानाच्या संवर्धनाचा मुद्दा ऐरणीवर आला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना…

ByByEditorial अप्रैल 22, 2026

धक्कादायक! चिपळूण पालिकेच्या जागेतील खोक्यांचा गैरवापर उघड; मटका-जुगार, मद्यविक्रीने खळबळ

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथील तालीम हॉलमध्ये संपन्न झाली. सभेच्या…

ByByEditorial अप्रैल 22, 2026

भुयारी गटार योजनेच्या नव्या प्रस्तावावर तासभर खल, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट प्रक्रियेवर सर्वानुमते निर्णय चिपळूण नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गाजली

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी सकाळी 11 वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या तालीम हॉलमध्ये नगराध्यक्ष…

ByByEditorial अप्रैल 22, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

२३ हजार कोटींची उलाढाल, तरीही कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा ‘सुपारी’ धोक्यात !
पवन तलाव मैदानावर हेलिकॉप्टर उतरवू नये; शेखर निकम यांच्या कामाचे कौतुक
धक्कादायक! चिपळूण पालिकेच्या जागेतील खोक्यांचा गैरवापर उघड; मटका-जुगार, मद्यविक्रीने खळबळ
चिपळूणमध्ये भुयारी गटार योजनेवर तासभर चर्चा; EOI प्रक्रियेवर निर्णय
रत्नागिरीत शिक्षकांची कमतरता तर काही विषयांत अतिरिक्त; शिक्षणाचा तोल बिघडला
रत्नागिरीत ३९० रुग्णांना ₹3.07 कोटींची मदत; देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराचा लाभ
बिजघर लाववाडीतील १५ वर्षीय मुलीचे अपहरण; अज्ञातावर गुन्हा दाखल
खेडमधील शासकीय विश्रामगृह बंद; ₹2.80 कोटींचा प्रकल्प वापराविना
१३ वर्षीय रिया ठसाळेची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; जिमनॅस्टिक ट्रॅम्पोलिनमध्ये यश