प्रतिनिधी : कोकणधारा
चिपळूण : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६ मध्ये चिपळूण येथील वाघजाई कोळकेवाडी संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत नाशिक येथील ब्रह्मा स्पोर्ट्स संघावर मात करून स्व. राजाभाऊ देसाई स्मृती चषक २०२६ आपल्या नावावर केला.
अंतिम सामना अत्यंत रंगतदार आणि चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत प्रेक्षकांना थरारक सामना अनुभवायला दिला. मात्र निर्णायक क्षणी वाघजाई कोळकेवाडी संघाच्या खेळाडूंनी अचूक चढाया आणि भक्कम बचावाचे प्रदर्शन करत ब्रह्मा स्पोर्ट्स संघावर मात केली.
या विजयामुळे चिपळूण तालुक्यातील वाघजाई कोळकेवाडी संघाने राज्यस्तरावर आपली ताकद सिद्ध केली आहे. या यशानंतर क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्थानिक कबड्डीपटूंना या विजयामुळे नवी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
राजाभाऊ देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध भागांतील संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरीतील विजयासह वाघजाई कोळकेवाडी संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकावत मानाचा चषक पटकावला.



















