konkandhara.com

Image

ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप घोटाळ्यात १९ कोटींचा भांडाफोड

रायगड सायबर सेलची मोठी कारवाई; ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप घोटाळ्यात १९ कोटींचा भांडाफोड

रायगड : ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा रायगड सायबर सेलने मोठा भांडाफोड केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 44 म्यूल बँक खाती गोठवली असून, तब्बल 19 कोटी 44 लाख 34 हजार रुपये जप्त केले आहेत. या प्रकरणी राजस्थानमधील भारमल हनुमान मिना याला अटक करण्यात आली आहे.

अलिबागच्या चेंढरे येथे राहणारे अमित जाधव यांना एम-999, मधूर मार्केट, लकी स्पिन यांसह तब्बल 26 अ‍ॅप्समधून संदेश येत होते. गुगल प्ले स्टोअरवर हे अ‍ॅप्स उपलब्ध असल्याने ते कायदेशीर आहेत असा समज झाल्याने त्यांनी पैसे गुंतवले. मात्र काही दिवसांतच त्यांना परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

सायबर सेलच्या तपासात हा गुन्हा राजस्थानपर्यंत पोहोचला. भारमल मिना याने आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने खाती उघडून त्याद्वारे फसवणुकीचे पैसे जमा केले होते. दररोज लाखो रुपयांचे कमिशन या पद्धतीने मिळत असल्याचे उघड झाले.

पोलिसांच्या तपासात या रॅकेटमध्ये दोन मोठ्या बँकांचा सहभाग असल्याचेही समोर आले आहे. उदाहरणादाखल, एका मोबाईल शॉप मालकाच्या खात्यात 2 महिन्यांत तब्बल 56 कोटी रुपयांचा व्यवहार, तर एका गृहीणीच्या खात्यात 114 कोटींचा व्यवहार झाल्याचे आढळले. आणखी एका नागरिकाच्या खात्यात 186 कोटींचे व्यवहार झाले होते.

या प्रकरणातील प्रमुख Parimatch Gaming App चा तपास एन्फोर्समेंट डायरेक्टरेट (ED) करत असून, आतापर्यंत 55 म्यूल खात्यांतील 3 हजार कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत.

रायगड पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रिजवान नदाफ, सहायक पोलीस निरीक्षक अमोल जाधव, तसेच सहायक पोलीस अजय मोहिते व पथकातील अधिकारी यांच्यासह ही कारवाई करण्यात आली. पोलिसांकडून या प्रकरणातील आणखी किमान पाच जणांचा शोध घेतला जात आहे.

Releated Posts

“रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेससीसीटीव्ही, अधिक आसन क्षमता; प्रवास होणार आरामदायी”

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यभरातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

मोठ्या गाजावाजात सुरू झालेली मुंबई विजयदुर्ग रो रो बोट सेवा बंद

प्रतिनिधी : कोकणधारा कोकणासाठी मोठ्या आशेचा किरण ठरलेली मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा आता अचानक ठप्प झाली आहे.गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

संगमेश्वरात धक्कादायक प्रकार; विद्यार्थिनींचा पाठलाग करून अश्लील कृत्य; संशयित अटकेत

संगमेश्वर : तालुक्यातील मठधामापूर परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनींचा पाठलाग करून त्यांच्यासमोर अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

मुख्य पाईपलाईन फुटली, तरीही पाणीपुरवठा अखंडित! निहार कोवळे यांच्या झटपट कारवाईने १२ तासांत संकटावर मात

चिपळूण : पेठमाप परिसरात आज पहाटे साडे सहा वाजण्याच्या सुमारास पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने एकच खळबळ उडाली. अचानक…

ByByEditorial अप्रैल 4, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस; अधिक सुविधा, आरामदायी प्रवास
मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा बंद; कमी प्रतिसाद आणि महागडे दर कारणीभूत
sangmeshwar-student-harassment-case-accused-arrested-devrukh
chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
लक्ष्मी ऑरगॅनिक आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची साथ
RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख