प्रतिनिधी : कोकणधारा
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथे शनिवारी (दि. ४ एप्रिल) मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात रोहित संतोष भालेकर (वय २८, रा. नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले आहेत.
प्रतीक संजय भंडारी (रा. नाशिक) हा आपल्या मित्रांसह XUV300 (MH 15 JH 0516) या कारने गणपतीपुळे येथे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार पलटी झाली. अपघातात कृष्णा आव्हाड, संदीप डेरिंगे व चालक प्रतीक भंडारी हे जखमी झाले असून त्यांच्यावर चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र चिपळूणचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक इर्शाद बेग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मदतकार्य केले.















