रत्नागिरी : प्रतिनिधी
निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावर 18 चाकी गाडी बेदरकारपणे चालवून अपघात केला. याप्रकरणी चालकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना गुरुवार 2 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वा.सुमारास घडली.
सुधीर मुन्नालाल केवट (मुळ रा.अमिलीया सोनवर्षा ता.नयगडी मध्यप्रदेश सध्या रा.कळंबोली,नवी मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात प्रमोद गणपत यमगर (29,रा.चितली खटाव जि.सातारा) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी संशयित चालक सुधीर केवट हा आपल्या ताब्यातील 18 चाकी गाडी (एमएच-46-सीएल-5981) घेउन निवळी ते जयगड असा जात असताना रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे लक्ष न देता गाडी चालवल्याने अपघात झाला. या अपघातात गाडीचे आणि गाडीत असलेल्या फोर्थलिफ्ट (एमएच-43-बीवाय-5755) चेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.















