konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • काविळतळी येथे नगरसेवक संदीप भिसे यांच्या पुढाकारातून पाणपोईचे उद्घाटन
Image

काविळतळी येथे नगरसेवक संदीप भिसे यांच्या पुढाकारातून पाणपोईचे उद्घाटन

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन नगरसेवक संदीप भिसे यांच्या पुढाकारातून शहरातील काविळतळी येथे पाणपोई सुरू करण्यात आली. या पाणपोईचे उद्घाटन नुकतेच पार पडले.

यावेळी दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, सर्वसामान्यांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देणे ही अत्यंत महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. संदीप भिसे यांनी घेतलेली ही पुढाकार अनुकरणीय असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सेवा, सहकार्य आणि आपुलकीची भावना अधिक दृढ होते. पाणपोईसारख्या उपक्रमातूनही मोठा सामाजिक संदेश दिला जातो, असेही त्यांनी नमूद केले.

पुढे बोलताना त्यांनी विश्वास व्यक्त केला की, नगरसेवक संदीप भिसे आगामी काळातही याच सामाजिक बांधिलकीतून काम करत राहतील.

या उद्घाटन प्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष शशिकांत मोदी, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, शहराध्यक्ष रसिका देवळेकर, नगरसेविका वैशाली निमकर, हर्षाली पवार, अर्बन बँक संचालक रत्नदीप देवळेकर, तसेच अभिनव भुरण, सपना भिसे, कुणाल आंबेकर, शक्तीकुमार चव्हाण, प्रवीण भिसे, सचिन शिंदे, अमोल भिसे, वेद सुर्वे, यश खंडजोडे, सुरेश भिसे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पाणपोईमुळे परिसरातील नागरिकांना उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे.

Releated Posts

“रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेससीसीटीव्ही, अधिक आसन क्षमता; प्रवास होणार आरामदायी”

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यभरातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

मोठ्या गाजावाजात सुरू झालेली मुंबई विजयदुर्ग रो रो बोट सेवा बंद

प्रतिनिधी : कोकणधारा कोकणासाठी मोठ्या आशेचा किरण ठरलेली मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा आता अचानक ठप्प झाली आहे.गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

संगमेश्वरात धक्कादायक प्रकार; विद्यार्थिनींचा पाठलाग करून अश्लील कृत्य; संशयित अटकेत

संगमेश्वर : तालुक्यातील मठधामापूर परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनींचा पाठलाग करून त्यांच्यासमोर अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

मुख्य पाईपलाईन फुटली, तरीही पाणीपुरवठा अखंडित! निहार कोवळे यांच्या झटपट कारवाईने १२ तासांत संकटावर मात

चिपळूण : पेठमाप परिसरात आज पहाटे साडे सहा वाजण्याच्या सुमारास पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने एकच खळबळ उडाली. अचानक…

ByByEditorial अप्रैल 4, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस; अधिक सुविधा, आरामदायी प्रवास
मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा बंद; कमी प्रतिसाद आणि महागडे दर कारणीभूत
sangmeshwar-student-harassment-case-accused-arrested-devrukh
chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
लक्ष्मी ऑरगॅनिक आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची साथ
RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख