आशिया कप भारत–पाक सामना : राज ठाकरेचं व्यंगचित्र आणि संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल
आशिया चषक (Asia Cup 2025) मध्ये 14 सप्टेंबर रोजी खेळल्या गेलेल्या भारत–पाकिस्तान सामन्याने राजकीय वाद पेटवला आहे. भारताने पाकिस्तानवर 7 विकेट्सने सहज विजय मिळवला, मात्र सामन्याच्या निकालापेक्षा त्याभोवतीचा वाद अधिक चर्चेत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत–पाक क्रिकेट होऊ नये, अशी देशभरात मागणी होत होती. तरीही सरकारकडून परवानगी मिळाल्याने टीम इंडिया मैदानात उतरली. यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढून बीसीसीआय आणि गृहमंत्रालयावर निशाणा साधला. https://x.com/RajThackeray/status/1968156078887371163/photo/1 🎨 व्यंगचित्रात अमित शाह आणि जय शाह यांचं प्रतीकात्मक चित्रण आहे. “अरे बाबांनो उठा… आपण जिंकलो, पाकिस्तानी हरले,” असं म्हणत, खरं तर कोण जिंकलं आणि कोण हरलं, हा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. व्यंगचित्रात पहलगाम हल्ल्यातील शहीदांचाही संदर्भ आहे. 👉 दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनीही केंद्रावर हल्लाबोल केला. “टीम इंडियाने हस्तांदोलन केलं नाही म्हणून भाजपवाले कौतुक करत आहेत. पण मैदानात तुम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळलात ना? हे काही पहलगाम हल्ल्यावरील उत्तर होऊ शकत नाही,” असं राऊत म्हणाले. त्यांनी सुनील गावसकरांच्या विधानाचा दाखला देत, टीम इंडियाला सरकारनेच पाकिस्तानविरुद्ध खेळायला भाग पाडलं, असा आरोप केला. या वादामुळे भारत–पाक क्रिकेट सामना पुन्हा एकदा राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आला आहे.
आशिया कप भारत–पाक सामना : राज ठाकरेचं व्यंगचित्र आणि संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल Read More »