konkandhara.com

  • Home
  • बातमी
  • आशिया कप भारत–पाक सामना : राज ठाकरेचं व्यंगचित्र आणि संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल
Image

आशिया कप भारत–पाक सामना : राज ठाकरेचं व्यंगचित्र आणि संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

आशिया चषक (Asia Cup 2025) मध्ये 14 सप्टेंबर रोजी खेळल्या गेलेल्या भारत–पाकिस्तान सामन्याने राजकीय वाद पेटवला आहे. भारताने पाकिस्तानवर 7 विकेट्सने सहज विजय मिळवला, मात्र सामन्याच्या निकालापेक्षा त्याभोवतीचा वाद अधिक चर्चेत आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत–पाक क्रिकेट होऊ नये, अशी देशभरात मागणी होत होती. तरीही सरकारकडून परवानगी मिळाल्याने टीम इंडिया मैदानात उतरली. यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढून बीसीसीआय आणि गृहमंत्रालयावर निशाणा साधला.

https://x.com/RajThackeray/status/1968156078887371163/photo/1

🎨 व्यंगचित्रात अमित शाह आणि जय शाह यांचं प्रतीकात्मक चित्रण आहे. “अरे बाबांनो उठा… आपण जिंकलो, पाकिस्तानी हरले,” असं म्हणत, खरं तर कोण जिंकलं आणि कोण हरलं, हा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. व्यंगचित्रात पहलगाम हल्ल्यातील शहीदांचाही संदर्भ आहे.

👉 दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनीही केंद्रावर हल्लाबोल केला. “टीम इंडियाने हस्तांदोलन केलं नाही म्हणून भाजपवाले कौतुक करत आहेत. पण मैदानात तुम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळलात ना? हे काही पहलगाम हल्ल्यावरील उत्तर होऊ शकत नाही,” असं राऊत म्हणाले. त्यांनी सुनील गावसकरांच्या विधानाचा दाखला देत, टीम इंडियाला सरकारनेच पाकिस्तानविरुद्ध खेळायला भाग पाडलं, असा आरोप केला.

या वादामुळे भारत–पाक क्रिकेट सामना पुन्हा एकदा राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आला आहे.

Releated Posts

मोदी सरकारचा महिला आरक्षणाचा बनाव उघडा; देशाचे तुकडे पाडण्याचे होते कारस्थान – खासदार संजय सिंह

नवी दिल्ली: “देशातील जनतेची दिशाभूल करणे थांबवा आणि गोदी मीडियाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवणे बंद करा,” अशा…

ByByEditorial अप्रैल 19, 2026

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे,

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई :दि .23 :महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून,…

ByByEditorial मार्च 23, 2026

अनिरुद्ध निकम सह्याद्री शिक्षण संस्थेचे नवे कार्याध्यक्ष

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदी अनिरुद्ध…

ByByEditorial मार्च 23, 2026

व्यावसायिक गॅस टंचाईमुळे हॉस्टेल-पीजी, हॉटेल व्यवसाय अडचणीत, अभिनेता हेमंत ढोमे यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : बाजारात व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे हॉस्टेल्स, पेइंग गेस्ट (PG) व्यवस्था आणि हॉटेल…

ByByEditorial मार्च 11, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान