konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • राष्ट्रवादी काँग्रेस परिवार एकसंध; विघ्नसंतोषी प्रवृत्तींना यश मिळणार नाही : आमदार शेखर निकमप्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध : आमदार शेखर निकम | विघ्नसंतोषींना यश नाही

राष्ट्रवादी काँग्रेस परिवार एकसंध; विघ्नसंतोषी प्रवृत्तींना यश मिळणार नाही : आमदार शेखर निकमप्रतिनिधी

प्रतिनिधी: योगेश बांडागळे

चिपळूण : आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराने सर्व आव्हानांचा एकजुटीने सामना केला असून, विभाजनानंतरही पक्ष पुन्हा एकदा ताकदीने उभा राहिल्याचा विश्वास चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावरून यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.

आमदार निकम यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या प्रवासात प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी परिवारातील सर्व सदस्यांनी अत्यंत खंबीर भूमिका बजावली. पक्षावर आलेल्या विविध राजकीय संकटांनाही कार्यकर्त्यांनी न डगमगता तोंड दिले आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केले.

ते पुढे म्हणाले की, आदरणीय अजितदादा पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी परिवाराच्या भावना लक्षात घेत आदरणीय श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी परिवार दुःखातून सावरत असतानाच काही विघ्नसंतोषी प्रवृत्तींनी या परिवारात मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र अशा प्रवृत्तींना कधीही यश मिळणार नसल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार निकम यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे स्पष्ट केले की, आदरणीय अजितदादांच्या आशीर्वादाने, सुनेत्रावहिनी पवार आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस परिवार आजही एकसंध आहे आणि यापुढेही तसाच राहणार आहे. पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकदिलाने पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी काम करत राहतील, असेही त्यांनी नमूद केले.

तसेच, आदरणीय अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी परिवार शेवटपर्यंत लढत राहील, असा निर्धारही आमदार शेखर निकम यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त केला आहे.

Releated Posts

निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधी निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावर 18 चाकी गाडी बेदरकारपणे चालवून अपघात केला. याप्रकरणी चालकाविरोधात जयगड…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

लांजा: भांडण सोडवण्यास गेलेल्या वृद्ध सासूवर सुनेचा कोयत्याने हल्ला; लांजा पोलिसांत गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधीमुलगा आणि सूनेचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या सासूला सुनेने शिवीगाळ व दमदाटी करत कपाळावर आणि हाताच्या…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथे शनिवारी (दि. ४ एप्रिल) मध्यरात्री सुमारे १२.१५…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधातील आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची आंदोलनकर्त्यांना साथ

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता महाराष्ट्र नवनिर्माण…

ByByEditorial अप्रैल 4, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
लक्ष्मी ऑरगॅनिक आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची साथ
RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख
पीपास रसायनावरून लोटे MIDCत तणाव; ६ एप्रिलला लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा
पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल
साखरपा येथे आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप बचावले
सुभाषराव चव्हाण यांना ‘आदर्श जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर