konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • संगमेश्वर पंचायत समिती सभापतीपदी शर्वरी वेल्ये, उपसभापतीपदी प्रफुल्ल बाईत बिनविरोध अनेक वर्षांनंतर राष्ट्रवादीला उपसभापतीपदाचा मान; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
अनेक वर्षांनंतर राष्ट्रवादीला उपसभापतीपदाचा मान; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

संगमेश्वर पंचायत समिती सभापतीपदी शर्वरी वेल्ये, उपसभापतीपदी प्रफुल्ल बाईत बिनविरोध अनेक वर्षांनंतर राष्ट्रवादीला उपसभापतीपदाचा मान; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

प्रतिनिधी : कोकणधारा

देवरुख : संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेना (शिंदे गट)च्या शर्वरी वेल्ये तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रफुल्ल बाईत यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीची घोषणा होताच महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन दोघांचे अभिनंदन केले. या निवडीनंतर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संगमेश्वर पंचायत समितीवर महायुतीची एकहाती सत्ता आल्यानंतर सभापती व उपसभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि सभापतीपदासाठी शिवसेनेच्या शर्वरी वेल्ये तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल बाईत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सोमवारी पार पडलेल्या निवड प्रक्रियेदरम्यान या दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दुसरा कोणताही अर्ज दाखल न झाल्याने शर्वरी वेल्ये यांची सभापतीपदी तर प्रफुल्ल बाईत यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. पंचायत समितीच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली.

या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, राजेंद्र महाडिक, राजेश मुकादम, राजेश पत्याणे, प्रमोद पवार, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, रोहन बने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, भाजपचे तालुकाध्यक्ष रूपेश कदम, वैभव पवार, राजन कापडी, संजय कदम, राजेंद्र सुर्वे, हेमंत शिंदे, हनिफ हरचिरकर, बाळू ढवळे, दिलीप बोथले, नितीन भोसले, प्रफुल्ल भुवड, यशवंत गोपाळ, पंकज पुसाळकर, पप्पू नाखरेकर, बापू शिंदे, मंगेश दळवी, प्रसाद सावंत, सचिन मांगले, योगेश शिंदे आदींसह पंचायत समितीचे सदस्य, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राहुल पंडित, राजेंद्र महाडिक, प्रमोद अधटराव व पूजा निकम यांनी नूतन सभापती व उपसभापतींना शुभेच्छा देत संगमेश्वर तालुक्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तालुक्याचा सर्वांगीण विकास आणि जनतेच्या सेवेला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

नूतन सभापती शर्वरी वेल्ये आणि उपसभापती प्रफुल्ल बाईत यांनीही वरिष्ठांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून तालुक्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करू, अशी ग्वाही दिली. त्यानंतर दोघांनाही सभागृहात त्यांच्या पदाच्या खुर्चीवर विराजमान करण्यात आले.

Releated Posts

निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधी निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावर 18 चाकी गाडी बेदरकारपणे चालवून अपघात केला. याप्रकरणी चालकाविरोधात जयगड…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

लांजा: भांडण सोडवण्यास गेलेल्या वृद्ध सासूवर सुनेचा कोयत्याने हल्ला; लांजा पोलिसांत गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधीमुलगा आणि सूनेचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या सासूला सुनेने शिवीगाळ व दमदाटी करत कपाळावर आणि हाताच्या…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथे शनिवारी (दि. ४ एप्रिल) मध्यरात्री सुमारे १२.१५…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधातील आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची आंदोलनकर्त्यांना साथ

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता महाराष्ट्र नवनिर्माण…

ByByEditorial अप्रैल 4, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
लक्ष्मी ऑरगॅनिक आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची साथ
RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख
पीपास रसायनावरून लोटे MIDCत तणाव; ६ एप्रिलला लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा
पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल
साखरपा येथे आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप बचावले
सुभाषराव चव्हाण यांना ‘आदर्श जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर