प्रतिनिधी : कोकणधारा
रत्नागिरी, दि. २० (जिमाका) : दै. लोकसत्ता यांच्या जिल्हा निर्देशांक उपक्रमांतर्गत करण्यात आलेल्या विश्लेषणात रत्नागिरी जिल्ह्याने विकास निर्देशांकात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे सांख्यिकी विभागाच्या तपशीलांच्या आधारे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले होते.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुंबईतील ‘द ताज बाय विवांता’, कफ परेड येथे आयोजित समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्याने सर्वांगीण विकासाच्या विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान मिळविल्याने जिल्ह्याच्या प्रगतीची नोंद राज्यस्तरावर झाली आहे.















