रत्नागिरी, दि. 23 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यातील 114 ग्रामपंचायतींमधील 174 रिक्त पदांसाठी 28 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार आहे.
या निवडणुकांमुळे संबंधित ग्रामपंचायतींतील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत संबंधित ग्रामपंचायत हद्दीत आचारसंहिता लागू राहणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे यांनी दिली.















