konkandhara.com

  • Home
  • Uncategorized
  • पोलादपूर तालुक्यात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73 टक्के मतदान
पोलादपूरात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान

पोलादपूर तालुक्यात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73 टक्के मतदान

पोलादपूर | प्रतिनिधी – दिनेश चाफळकर:
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यात यंदा ‘दुबार मतदार’ हा कळीचा मुद्दा ठरला आहे. तालुक्यातील २५ ते ३० टक्के मतदार ग्रामीण भागात वास्तव्यास असताना सुमारे ७० टक्के मतदार हे चाकरमानी असल्याने, त्यांना मतदानासाठी गावाकडे आणण्यासाठी उमेदवारांना कोट्यवधी रुपयांचा खर्च सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले आहे. विशेष म्हणजे, एवढा खर्च करूनही मतांची खात्री नसल्याने अनेक उमेदवार संभ्रमात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बाहेरून येणाऱ्या मतदारांसाठी ने-आण, जेवण-खाणे, निवास आणि कथित आमिष स्वरूपातील खर्च जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या उमेदवारांना करावा लागत आहे. परिणामी, यंदा रायगड जिल्हा परिषदेच्या दोन गटांतील सहा उमेदवारांपैकी तुल्यबळ लढतीतील चार उमेदवारांना, तसेच पोलादपूर पंचायत समितीच्या चार गणांतील आठ उमेदवारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागल्याचे दिसून आले.

55.73 टक्के मतदान; शेवटच्या तासांत फारशी वाढ नाही

सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार पोलादपूर तालुक्यात 55.73 टक्के मतदान झाले. शेवटच्या दोन तासांत मतदानाच्या टक्केवारीत फारशी वाढ झाली नसल्याचे प्रशासनाच्या नोंदींवरून स्पष्ट झाले आहे.
दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 11,163 पुरुष आणि 10,705 महिला, असे एकूण 21,868 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला

कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटातील उमेदवार अजय सलागरे यांनी कापडे बुद्रुक शाळेत सपत्नीक मतदान केले. निलेश कुंभार यांनी वाकण शाळेत मतदान केले. तर लोहारे गटातील उमेदवार चंद्रकांत कळंबे यांनी उमरठ येथे आणि कृष्णा कदम यांनी ओंबळी येथील प्राथमिक शाळेत मतदान केले.

कुठल्या मतदान केंद्रांवर कुणाचे भवितव्य ठरणार?

कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गट अंतर्गत माटवण पंचायत समिती गणातील गोवेले, उमरठ, धारवली, कालवली, मोरसडे, बोरघर, आडावळे बुद्रुक, बोरावळे, माटवण, देवळे, वाकण, कापडे बुद्रुक, कापडे खुर्द, चांभारगणी बुद्रुक आणि बोरज येथील मतदार साक्षी कांबळेकर विरुद्ध हर्षदा वरवाटकर, तसेच अजय सलागरे विरुद्ध निलेश कुंभार यांचे भवितव्य ठरवणार आहेत.

कापडे बुद्रुक पंचायत समिती गणात देवळे, करंजे, दाभिळ, लहुळसे, केवनाळे, वाकण-१, वाकण-२, नानेघोळ, कापडे खुर्द, कापडे बुद्रुक (१ ते ३), रानकडसरी, रानबाजिरे, चांभारगणी बुद्रुक, निवे, किनेश्वर, साखर येथील मतदारांनी अनिल दळवी विरुद्ध अनिल मालुसरे यांच्यासाठी मतदान केले आहे.

लोहारे गटात चौरंगी लढत

लोहारे जिल्हा परिषद गटात कृष्णा कदम (कमळ), अ. रझाक करबेलकर (हात), चंद्रकांत कळंबे (शिवसेना) आणि कृष्णा कदम (ढोबळी मिरची) अशी चौरंगी लढत असून, कोतवाल गणातील सुरेंद्र चव्हाण विरुद्ध अविनाश शिंदे यांचेही भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
लोहारे पंचायत समिती गणात युगज्ञा दीपक उतेकर विरुद्ध अनिता अनिल भिलारे यांच्यासाठी विविध गावांतील मतदारांनी मतदान केले.

मतदान केंद्रांबाहेर वाहनांची गर्दी

तालुक्यातील बहुतांश मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिघाबाहेर लक्झरी बसेस, मोटारकार, जीप आणि खासगी आरामगाड्यांची मोठी गर्दी दिसून आली. सुमारे ७० टक्के मतदार पोलादपूरबाहेरील असल्याने हा खर्च सर्वसामान्य उमेदवारांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची चर्चा आहे.

‘दुबार मतदार’ प्रश्नावर तोडगा हवा

या पार्श्वभूमीवर भविष्यात ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमधील खर्च टाळण्यासाठी पोस्टल मतांचा पर्याय, किंवा आधारकार्डशी मतदार ओळखपत्र जोडून एकाच ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
पोलादपूर तालुक्यातील अनेक मतदार मुंबई व ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास असून, काहीजण तिकडील महापालिकांमध्ये नगरसेवकही झाले आहेत. त्यामुळे आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंग सक्तीचे केल्यास दुबार मतदारांचा प्रश्न स्पष्ट होऊ शकतो, अशी मागणी पुढे येत आहे.

निकाल सोमवारी

सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, मतमोजणी सोमवारी होणार आहे. पोलादपूर तालुक्यातील ‘दुबार मतदार’ प्रश्नाचा निकालांवर नेमका किती परिणाम होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

Releated Posts

LIVE : महाराष्ट्रातील 29 महापालिकांचे निकाल आज; सकाळी 10 पासून मतमोजणी

10.10 Mumbai Municipal Corporation results : एकूण १४ टेबलावर मतमोजणी पार पडणार एकूण १४ टेबलावर मतमोजणी पार पडणार…

ByByEditorial जनवरी 16, 2026

महाड तालुक्यात हृदयद्रावक अपघात; आठ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

दिनेश चाफळकर, प्रतिनिधी महाड महाड | १० जानेवारी २०२६ :महाड तालुक्यातील सव परिसरात शिरगांव पोलीस चेक पोस्ट ते…

ByByEditorial जनवरी 11, 2026

महाड नगरपरिषद निवडणूक राडा: आणखी एक आरोपी अटकेत

दिनेश चाफळकर, प्रतिनिधी महाड महाड | ११ जानेवारी २०२६ :महाड नगरपरिषद निवडणुकांच्या मतदान प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना…

ByByEditorial जनवरी 11, 2026

डहाणू 2025: ‘भाजप विरुद्ध सर्व’—नगराध्यक्षपद हातातून गेलं

डहाणू | 21 डिसेंबर 2025:डहाणू नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होताच कोकणातील या आदिवासीबहुल शहराच्या राजकारणात एक वेगळाच वळण…

ByBycare.eviano@gmail.com दिसम्बर 26, 2025
Image Not Found
Image Not Found

Gallery

'मोसाद' पॅटर्न, बदललेली पाण्याची बाटली आणि वैमानिकाचा ट्रॅक रेकॉर्ड; अजित पवारांच्या निधनाबाबत रोहित पवारांचे खळबळजनक दावे
राज्य मंत्रिमंडळ बैठक: 19 निर्णय; क्रीडा, सिंचन, आरोग्याला गती
mahad election
पोलादपूरात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान
श्रीराम महादेववाडीतील चिमुकल्यांनी भरवले अंडर-14 क्रिकेट सामने
महावितरणच्या कोलाड विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याची मुजोरी ! वैयक्तिक थकबाकी न भरल्यास कंपनीचा वीजपुरवठा तोडण्याची धमकी; नियमांची पायमल्ली?
पनवेल महापालिका: भाजपकडून महापौर–उपमहापौर उमेदवार जाहीर
महाड ZP–पं.स. निवडणूक: ७ फेब्रुवारीला कडक पोलीस बंदोबस्त
मुंबई–पुणे एक्स्प्रेसवे 32 तास ठप्प; मुख्यमंत्र्यांचे चौकशी आदेश