प्रतिनिधी : कोकणधारा
चिपळूण : शहरातील क्रीडाप्रेमी युवकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पवन तलाव येथील खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी १ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीतून अनेक वर्षांपासून पडून असलेल्या इमारतीचे सुशोभीकरण करण्यात येणार असून मैदानाचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. तसेच येथे कॉमेंट्री बॉक्स आणि इनडोअर स्टेडियम उभारण्याचेही नियोजन आहे.
या कामामुळे चिपळूणमधील क्रीडापटूंना सराव व स्पर्धांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध होणार असून स्थानिक क्रीडा संस्कृतीला मोठी चालना मिळणार आहे. आमदार शेखर निकम यांच्या या प्रयत्नांमुळे चिपळूणच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल, अशी भावना क्रीडाप्रेमी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.















