konkandhara.com

  • Home
  • उमेदवार कोण
  • पाग येथील उद्यानाच्या दुरवस्थेवर नगराध्यक्ष सकपाळ संतप्त; आठ दिवसांत सुधारणा करण्याचे आदेश
पाग उद्यानाच्या दुरवस्थेवर नगराध्यक्ष सकपाळ संतप्त; ८ दिवसांत सुधारणा आदेश

पाग येथील उद्यानाच्या दुरवस्थेवर नगराध्यक्ष सकपाळ संतप्त; आठ दिवसांत सुधारणा करण्याचे आदेश

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी बुधवारी सायंकाळी पाग येथील उद्यानाला भेट देत तेथील दुरवस्थेबाबत उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. उद्यानातील स्वच्छतेचा अभाव, बंद असलेले स्वच्छतागृह, वाढलेले गवत आणि अपुऱ्या सुविधांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या वेळी नगराध्यक्षांनी उद्यान परिसर स्वच्छ ठेवण्याच्या, नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या तसेच उद्यान सकाळी व सायंकाळी नियमित सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. “मी दिलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करा, आठ दिवसांनंतर पुन्हा पाहणी करणार,” असा इशाराही त्यांनी दिला.

भेटीदरम्यान उद्यानात स्वच्छता करण्यात आल्याचे दिसून आले. मात्र, स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी ही स्वच्छता नेहमीच असते का, असा प्रश्न विचारला असता नागरिकांनी नकारार्थी उत्तर दिले. त्यामुळे नगराध्यक्षांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच स्वच्छता करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

उद्यानात विजेची सुविधा नसल्याचे निदर्शनास आल्याने तातडीने वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी विद्युत विभागाला दिल्या. वीज उपलब्ध झाल्यानंतर सायंकाळी होणारे गैरप्रकार रोखता येतील, असेही त्यांनी सांगितले. तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पेव्हर ब्लॉक दुरुस्त करण्याचे, उद्यानाची दोन्ही गेट्स सुरू ठेवण्याचे व इतर अनधिकृत प्रवेश मार्ग बंद करण्याचे निर्देश दिले.

स्वच्छतागृहाची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देताना उद्यान विभागाचे प्रमुख बापू साडविलकर यांनाही दुरवस्थेबाबत सुनावले. आरोग्य सभापती शुभम पिसे यांनीही आरोग्य व उद्यान विभागाला आवश्यक त्या सूचना केल्या.

या पाहणीवेळी आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेविका शितल रानडे, शिवसेना उपशहर प्रमुख सुयोग चव्हाण, माजी नगरसेविका सई चव्हाण, तसेच विपुल कांबळी, नयन चव्हाण, संदेश गोरीवले, गणेश किंजळकर, प्रसाद शिंदे, सोहम चव्हाण, अमोल तटकरी, प्रितेश सुतार, हेमंत केळसकर, धिरज तांबडे, प्रथमेश कांबळी, अथर्व चव्हाण आदी उपस्थित होते.

Releated Posts

खेर्डीत भव्य कबड्डी स्पर्धेचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : दिशा फाऊंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, खेर्डी यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय भव्य…

ByByEditorial मार्च 31, 2026

अमरावती महापालिकेत त्रिशंकू निकाल; भाजप आघाडीवर

अमरावती | १६ जानेवारी २०२६ :अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, महापालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली…

ByByEditorial जनवरी 17, 2026

केडीएमसीत भाजपचे खाते उघडले: प्रभाग 18(अ) बिनविरोध

कल्याण–डोंबिवली | 24 डिसेंबर 2025:कल्याण–डोंबिवली महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस संपत असतानाच राजकीय वातावरणात…

ByByEditorial दिसम्बर 30, 2025

रायगड नगरपालिका मतमोजणी तहकूब; महायुतीतील संघर्ष उफाळला

रायगड नगरपालिका मतमोजणी तहकूब; महायुतीतील संघर्षाने रंग बदलला राजकीय माहोल अलिबाग | ३ डिसेंबर २०२५:रायगड जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या…

ByByEditorial दिसम्बर 3, 2025
Image Not Found
Image Not Found

Gallery

chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
लक्ष्मी ऑरगॅनिक आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची साथ
RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख
पीपास रसायनावरून लोटे MIDCत तणाव; ६ एप्रिलला लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा
पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल
साखरपा येथे आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप बचावले