konkandhara.com

  • Home
  • राजकारण
  • विलीनीकरणाचा विषय आमच्याकडून संपलाय;सुनील तटकरेंकडून दुतोंडीपणा: विकास लवांडे
विलीनीकरणाचा विषय संपला : विकास लवांडे; सुनील तटकरेंवर दुतोंडीपणाचा आरोप

विलीनीकरणाचा विषय आमच्याकडून संपलाय;सुनील तटकरेंकडून दुतोंडीपणा: विकास लवांडे

प्रतिनिधी : कोकणधारा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत राज्यात सुरू असलेल्या चर्चांवर शरद पवार गटाने ठाम भूमिका घेत या विषयाला पूर्णविराम दिला आहे. पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी स्पष्ट केले की, विलीनीकरणाचा मुद्दा त्यांच्या पातळीवरून पूर्णपणे संपला असून आगामी निवडणुका पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहे.

गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे संभ्रम अधिक वाढला. 16 फेब्रुवारी रोजी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तटकरे यांनी विलीनीकरणाच्या चर्चेबाबत माहिती नसल्याचे सांगितले होते. मात्र, 31 मार्च रोजी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या चर्चेबाबत माहिती असल्याचे सांगत, विलीनीकरण झाल्यास त्याचे स्वागतच केले जाईल, असे मत व्यक्त केले.

या बदलत्या भूमिकेवर टीका करत लवांडे यांनी तटकरे यांच्यावर दुतोंडीपणाचा आरोप केला. “सुनील तटकरे हे खोटे बोलतात हे पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यांच्या वक्तव्यांमध्ये सातत्य नाही,” असे ते म्हणाले. “कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा,” अशी म्हण उद्धृत करत त्यांनी तटकरेंवर टोला लगावला.

लवांडे यांनी पुढे सांगितले की, पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी यापूर्वीच विलीनीकरणाच्या शक्यतांना नकार दिला आहे. त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत म्हटले की, कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये. “पक्ष स्वतंत्रपणे संघटन मजबूत करत पुढील निवडणुकांना सामोरे जाणार आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

यावेळी त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीही वेळोवेळी विलीनीकरणाच्या चर्चांना फेटाळल्याचे अधोरेखित केले. या चर्चांना काही जण स्वार्थी राजकारणाच्या हेतूने हवा देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, या घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील मतभेद अधोरेखित झाले आहेत. एकीकडे विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले असताना, दुसरीकडे शरद पवार गटाने स्वतंत्र राजकीय अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्धार पुन्हा स्पष्ट केल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Releated Posts

खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांचा राजीनामा; दापोलीत राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटनात्मक आव्हान

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : दापोली विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार…

ByByEditorial अप्रैल 3, 2026

रोह्यात शिवसेनेचा मोठा निर्णय; तालुका कार्यकारिणी बरखास्त,मनोजकुमार शिंदे यांची हकालपट्टी

प्रतिनिधी : कोकणधारा रोहा (प्रतिनिधी) : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे.…

ByByEditorial अप्रैल 2, 2026

रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार, सुनेत्रा पवार गायब; तटकरे कुटुंबीयांचेच फोटो

प्रतिनिधी : कोकणधारा रोहे: रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमाच्या बॅनरवरून पक्षातील प्रमुख नेते अजित पवार आणि सुनेत्रा…

ByByEditorial मार्च 30, 2026

संगमेश्वर पंचायत समिती सभापतीपदी शर्वरी वेल्ये, उपसभापतीपदी प्रफुल्ल बाईत बिनविरोध अनेक वर्षांनंतर राष्ट्रवादीला उपसभापतीपदाचा मान; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

प्रतिनिधी : कोकणधारा देवरुख : संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेना (शिंदे गट)च्या शर्वरी वेल्ये तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस…

ByByEditorial मार्च 9, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
लक्ष्मी ऑरगॅनिक आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची साथ
RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख
पीपास रसायनावरून लोटे MIDCत तणाव; ६ एप्रिलला लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा
पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल
साखरपा येथे आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप बचावले