konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • मंगेश पेढाबंकर यांना ‘आदर्श प्रशासकीय अधिकारी’ पुरस्कार जाहीर
मंगेश पेढाबंकर यांना ‘आदर्श प्रशासकीय अधिकारी’ पुरस्कार जाहीर

मंगेश पेढाबंकर यांना ‘आदर्श प्रशासकीय अधिकारी’ पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढाबंकर यांना त्यांच्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, लोकाभिमुख आणि संवेदनशील कार्याची दखल घेत नवभारत–नवराष्ट्र वृत्तपत्र समूहातर्फे ‘आदर्श प्रशासकीय अधिकारी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या या निवडीमुळे चिपळूण परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रशासनात काम करताना कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या समस्येकडे केवळ कागदोपत्री विषय म्हणून न पाहता, ती एक जबाबदारी म्हणून स्वीकारण्याची त्यांची कार्यशैली विशेष ठरली आहे. सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी तत्परतेने काम करणारा अधिकारी म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच चिपळूणकरांच्या मनात ते एक विश्वासार्ह आणि लोकाभिमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखले जातात.

मंगेश पेढाबंकर यांनी आपल्या सेवाकाळात चिपळूण नगर परिषद, रत्नागिरी नगर परिषद तसेच गुहागर नगर पंचायत येथे विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. बदल्या, पदोन्नती आणि विविध प्रशासकीय जबाबदाऱ्यांच्या प्रवासात त्यांनी नेहमीच कार्यतत्परता, शिस्त आणि जनहिताचा दृष्टिकोन कायम ठेवला. विशेष म्हणजे, संकटसमयी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करणे, नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देणे आणि प्रशासनाला मानवी चेहरा देण्याचा त्यांचा प्रयत्न कायम राहिला आहे.

प्रशासकीय सेवेसोबतच त्यांनी सामाजिक, सहकारी आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय योगदान दिले आहे. त्यामुळेच ते केवळ अधिकारी म्हणून नव्हे, तर समाजाशी जोडलेला, माणुसकी जपणारा चेहरा म्हणूनही परिचित आहेत.

त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून जाहीर झालेला ‘आदर्श प्रशासकीय अधिकारी’ हा सन्मान केवळ वैयक्तिक पुरस्कार नसून, प्रामाणिक आणि लोकांसाठी झटणाऱ्या प्रशासनाच्या विचाराला मिळालेली दाद असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Releated Posts

रत्नागिरी पोलीसांच्या RAIDS App मुळे नागपूरमध्ये अवघ्या २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या दूरदृष्टीतून आणि नाविन्यपूर्ण उपक्रमातून विकसित…

ByByEditorial अप्रैल 3, 2026

पीपास रसायनावरून लोटे एमआयडीसीत तणाव; ६ एप्रिलला खेडमध्ये लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसरात पीपास या घातक रसायनाच्या उत्पादनावरून वातावरण तापले असून या…

ByByEditorial अप्रैल 3, 2026

पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील पुष्कर कंपनीच्या आवारात टाकलेले भंगार गोळा करत असताना…

ByByEditorial अप्रैल 3, 2026

साखरपा येथे खासगी आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप

प्रतिनिधी : कोकणधारा संगमेश्वर : साखरपा येथील जाधववाडी जवळ, गद्रे पेट्रोल पंपासमोर आज पहाटे साडेतीनच्या सुमारास खासगी आराम…

ByByEditorial अप्रैल 3, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख
पीपास रसायनावरून लोटे MIDCत तणाव; ६ एप्रिलला लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा
पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल
साखरपा येथे आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप बचावले
सुभाषराव चव्हाण यांना ‘आदर्श जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर
रत्नागिरी नगर परिषदेची कारवाई; ११० मालमत्ता सील, ७० नळजोडण्या खंडित
चोरीची इको कार २४ तासांत शोधली; दापोली-शिरगाव पोलिसांची तत्पर कारवाई
खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांचा राजीनामा; राष्ट्रवादीसमोर संघटनात्मक आव्हान
पत्रकार दीपक भागवत हल्लाप्रकरणी अटकेची मागणी; १४ एप्रिलपासून उपोषणाचा इशारा