प्रतिनिधी : कोकणधारा
सावंतवाडी : मळेवाड-सावळवाडी येथे आज सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या एका अपघातात दुचाकीस्वार पिता-पुत्र गंभीर जखमी झाले आहेत.यात औदुंबर बाबुराव खोत (वय – ४६) आणि त्यांचा मुलगा अथर्व खोत (वय – १०, दोघेही रा.कोंडुरे) अशी जखमींची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की,आज सकाळच्या सुमारास कोंडूरे येथील औदुंबर खोत हे आपल्या मुलासह दुचाकीवरून मळवाड मार्गे शिरोडाच्या दिशेने जात होते यावेळी मळेवाड सावळवाडी येथील वळणावर आले असता अचानक ब्रेक लावल्याने त्यांची दुचाकी घसरली आणि समोरून येणाऱ्या डंपरला जाऊन धडकली.या अपघातात दोघेही पिता – पुत्र जखमी झाले.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी घटनास्थळी गाव घेतली आणि जखमींना मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अदिती ठाकूर व डॉक्टर विक्रम मस्के यांनी त्यांच्यावर तातडीने उपचार केले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबूळी येथील गोमेकॉ हॉस्पिटलमध्य दाखल करण्यात आले.















