konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • सामाईक वाड्याच्या वादातून मायलेकावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा
Image

सामाईक वाड्याच्या वादातून मायलेकावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी : कोकणधारा

खेड : खेड तालुक्यातील हेदली बाजारवाडी येथे सामाईक वाड्यातील वादातून मायलेकासह सुनेवर लोखंडी पाईपने हल्ला केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अपर्णा जनार्दन शिंदे (वय ५२) या आपल्या मुलासह सामाईक वाड्यात राहत आहेत. ३० मार्च रोजी रात्री सुमारे १०:३० वाजता घरदुरुस्तीचे साहित्य ठेवण्याच्या कारणावरून त्यांचा मुलगा करण हा बोलण्यासाठी गेला असता, पुतण्या मयूर मनोहर शिंदे याने जागा देण्यास नकार देत शिवीगाळ सुरू केली.

वाद वाढताच अपर्णा शिंदे व त्यांची सून काव्या घटनास्थळी पोहोचल्या. यावेळी मयूरची पत्नी मयुरी शिंदे हिने सुनेला पकडून मारहाण केली. त्यानंतर मयूर शिंदे याने घरातून लोखंडी पाईप आणून अपर्णा शिंदे यांच्या हाताच्या मनगटावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या.

तक्रारीनुसार, मयुरी शिंदे, कलावती मनोहर शिंदे आणि सुप्रिया केतन शिंदे यांनीही फिर्यादींना पकडून ठेवत मारहाणीला साथ दिली.

घटनेनंतर जखमींना तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. खेड पोलिसांनी मयूर मनोहर शिंदे (३६), मयुरी मयूर शिंदे (२८), कलावती मनोहर शिंदे (५५) आणि सुप्रिया केतन शिंदे (२८) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार अस्मिता साळवी करत असून, पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. सामाईक मालमत्तेच्या वादातून झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Releated Posts

लांजा: भांडण सोडवण्यास गेलेल्या वृद्ध सासूवर सुनेचा कोयत्याने हल्ला; लांजा पोलिसांत गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधीमुलगा आणि सूनेचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या सासूला सुनेने शिवीगाळ व दमदाटी करत कपाळावर आणि हाताच्या…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथे शनिवारी (दि. ४ एप्रिल) मध्यरात्री सुमारे १२.१५…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधातील आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची आंदोलनकर्त्यांना साथ

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता महाराष्ट्र नवनिर्माण…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

रत्नागिरी पोलीसांच्या RAIDS App मुळे नागपूरमध्ये अवघ्या २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या दूरदृष्टीतून आणि नाविन्यपूर्ण उपक्रमातून विकसित…

ByByEditorial अप्रैल 3, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
लक्ष्मी ऑरगॅनिक आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची साथ
RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख
पीपास रसायनावरून लोटे MIDCत तणाव; ६ एप्रिलला लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा
पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल
साखरपा येथे आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप बचावले
सुभाषराव चव्हाण यांना ‘आदर्श जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर
रत्नागिरी नगर परिषदेची कारवाई; ११० मालमत्ता सील, ७० नळजोडण्या खंडित