प्रतिनिधी : कोकणधारा
चिपळूण : शहरातील एका कपड्यांच्या दुकानात विक्रीस ठेवलेल्या ‘कराची पॅटर्न’ महिलांच्या ड्रेसवरून चिपळूणमध्ये वाद निर्माण झाला आहे. या ड्रेसच्या मार्केटिंगची रील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही नागरिकांनी संबंधित दुकानात जाऊन दुकानदाराला जाब विचारला.
यावेळी दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही नागरिकांनी या ड्रेसविरोधात आक्षेप घेत दुकानदाराशी चर्चा केली, मात्र परिस्थिती चिघळल्याचे सांगितले जाते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी चिपळूण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.















