konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • पत्रकार दीपक भागवत हल्लाप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; अन्यथा १४ एप्रिलपासून बेमुदत उपोषण, चिपळूणमधील पत्रकारांचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन
पत्रकार दीपक भागवत हल्लाप्रकरणी अटकेची मागणी; १४ एप्रिलपासून उपोषणाचा इशारा

पत्रकार दीपक भागवत हल्लाप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; अन्यथा १४ एप्रिलपासून बेमुदत उपोषण, चिपळूणमधील पत्रकारांचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा १४ एप्रिल २०२६ पासून चिपळूणमधील पत्रकार बेमुदत उपोषण आंदोलन छेडतील, असा इशारा देत पत्रकारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, २५ मार्च २०२६ रोजी शहरातील बहादूरशेख नाका येथे भरदिवसा वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकार दीपक भागवत यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी नियोजनपूर्वक जीवघेणा हल्ला केला. या घटनेची चित्रफीत उपलब्ध असून हल्लेखोर स्पष्टपणे ओळखू येत असतानाही, घटनेला आठ दिवस उलटूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. यामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे पत्रकारांनी नमूद केले आहे.

पत्रकारांवर होणारे हल्ले हे भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित वेगाने तपास व कारवाई होत नसल्यामुळे पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली.

यावेळी पत्रकारांनी मागणी केली की, या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून गुन्ह्यातील सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी. अन्यथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, १४ एप्रिल रोजी, चिपळूणमधील पत्रकार लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करतील.

हे उपोषण चिपळूण येथील मा. प्रांताधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

पत्रकारांनी निवेदनात म्हटले आहे की, संविधान रचणाऱ्या महामानवाच्या जयंतीदिनी न्यायासाठी उपोषण करण्याची वेळ पत्रकारांवर येणे हे अत्यंत दुर्दैवी असून, पोलीस प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी चिपळूणमधील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.

Releated Posts

लांजा: भांडण सोडवण्यास गेलेल्या वृद्ध सासूवर सुनेचा कोयत्याने हल्ला; लांजा पोलिसांत गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधीमुलगा आणि सूनेचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या सासूला सुनेने शिवीगाळ व दमदाटी करत कपाळावर आणि हाताच्या…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथे शनिवारी (दि. ४ एप्रिल) मध्यरात्री सुमारे १२.१५…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधातील आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची आंदोलनकर्त्यांना साथ

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता महाराष्ट्र नवनिर्माण…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

रत्नागिरी पोलीसांच्या RAIDS App मुळे नागपूरमध्ये अवघ्या २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या दूरदृष्टीतून आणि नाविन्यपूर्ण उपक्रमातून विकसित…

ByByEditorial अप्रैल 3, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
लक्ष्मी ऑरगॅनिक आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची साथ
RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख
पीपास रसायनावरून लोटे MIDCत तणाव; ६ एप्रिलला लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा
पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल
साखरपा येथे आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप बचावले
सुभाषराव चव्हाण यांना ‘आदर्श जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर
रत्नागिरी नगर परिषदेची कारवाई; ११० मालमत्ता सील, ७० नळजोडण्या खंडित