प्रतिनिधी : कोकणधारा
सावर्डे, दि. २७ मार्च : भारत सरकारच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत विद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांचा जवाहर नवोदय विद्यालय, पडवे येथे प्रवेशासाठी मार्ग मोकळा झाला आहे.
या परीक्षेसाठी विद्यालयातील इयत्ता पाचवीचे एकूण ११ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
त्यापैकी स्वराज कर्डिले, समर्थ सोनवणे, ओम सावर्डेकर, शार्दुल गोरे, अथर्व बंडगर, दर्शन कदम, श्रीपाद धुरी आणि वसुंधरा पाटील या विद्यार्थ्यांनी यश मिळवून विद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ अंतर्गत नवोदय विद्यालयांची स्थापना करण्यात आली असून, नवोदय विद्यालय समिती (NVS) या स्वायत्त संस्थेमार्फत या शाळांचे संचालन केले जाते. येथे विद्यार्थ्यांना पूर्णतः निवासी व मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे विभागप्रमुख साजिद चिकटे यांच्यासह प्रशांत सपकाळ, सुधीर कदम, अमित साळवी, मंगेश दाते, दीपक भुवड, सौ. सिद्धी सावंत, सौ. शिल्पा राजेशिर्के आणि सौ. श्रुती जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार शेखरजी निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, उपाध्यक्ष युगंधराताई राजेशिर्के, प्रशांतजी निकम, डॉ. इसाक खतीब, सर्व संचालक, सेक्रेटरी महेश महाडिक, स्कूल कमिटी चेअरमन शांताराम खानविलकर, प्राचार्य राजेंद्र वारे आणि उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.















