konkandhara.com

कोकणातील पहिल्या मानाया चिपळुणातील श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिमगोत्सवाला प्रारंभ

कोकणातील मानाचा शिमगोत्सव; गोवळकोट येथे भक्तीमय प्रारंभ

योगेश बंडागळे, चिपळूण |

कोंकणधारा डेस्क:

कोकणातील पहिला मानाचा शिमगोत्सव अशी ओळख असलेल्या चिपळूणमधील गोवळकोट येथील श्रीदेवी करंजेश्वरी मंदिर येथे शनिवारी सायंकाळी भक्तीमय वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. परंपरेनुसार देवी करंजेश्वरी आणि श्री देव सोमेश्वर यांच्या पालख्या मंदिरातून विधीवत बाहेर पडल्या.

ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तांच्या जयघोषात पालख्या ऐतिहासिक गोविंदगड किल्ला येथे रेडझाई मातेच्या दर्शनासाठी पोहोचल्या. पारंपरिक विधी आणि धार्मिक मंत्रोच्चारात हा सोहळा पार पडला.

 बाजार पुलावर जल्लोषात स्वागत

दर्शनानंतर रात्री सुमारे अकरा वाजता श्रीदेवी करंजेश्वरी आपल्या माहेरी, पेठमाप येथे आगमन झाले. बाजार पुलावर दोन्ही पालख्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. जुना कालभैरव देवस्थानासह विविध ढोल पथकांनी उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवली. संपूर्ण परिसर ढोल-ताशांच्या निनादाने दुमदुमून गेला होता.

पहाटे होम प्रज्वलित; सोमवारी ‘शेरणी’ सोहळा

पेठमाप येथे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास होम प्रज्वलित होणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला श्रीदेवीचा ‘शेरणी काढण्याचा’ सोहळा सोमवारी पार पडणार असून त्यानंतर या मानाच्या शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.

चिपळूण शहर भक्तीरंगात

गोवळकोटसह संपूर्ण चिपळूण शहर सध्या भक्ती, परंपरा आणि उत्साहाच्या रंगात न्हाऊन निघाले आहे. हजारो भाविक या शिमगोत्सवात सहभागी होत असून कोकणातील सांस्कृतिक वारसा आणि परंपरेची समृद्ध परंपरा पुन्हा एकदा उजळून निघाली आहे.

Releated Posts

पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा थरार!अडूर गावात शिमगोत्सव उत्साहात

गुहागर | योगेश बांडागळे (प्रतिनिधी): गुहागर : कोकणातील पारंपरिक शिमगोत्सवानिमित्त गुहागर तालुक्यातील अडूर गावात ग्रामदेवता श्री सुंकाई देवी…

ByByEditorial मार्च 3, 2026

बलशाली युवा हृदय मंचकडून मंगेश बांडागळे यांचा सत्कार

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा देवरुख: चिपळूण येथील बलशाली युवा हृदय मंचच्या वतीने हातिव पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित सदस्य मंगेश…

ByByEditorial मार्च 3, 2026

चिपळूणमध्ये नगरसेवकाच्या चालकावर हल्ला; चौघांकडून गाडीत कोंबून मारहाण

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा चिपळूण : शहरात एक धक्कादायक घटना घडली असून नगर परिषदेतील तरुण नगरसेवक साजिद सरगुरोह यांच्या…

ByByEditorial मार्च 3, 2026

मध्यपूर्व देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती; संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क जारी

मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार अशा…

ByByEditorial मार्च 3, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा थरार! अडूर गावात शिमगोत्सव उत्साहात
बलशाली युवा हृदय मंचकडून मंगेश बांडागळे यांचा सत्कार
डेरवण यूथ गेम्स 2026: अद्विका सोनीची 5 सुवर्णपदके
chiplun-nagarsevak-chalak-marhan
मध्यपूर्व तणाव : भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन व सूचना
शिरोडा वेळागर येथे भव्य स्वच्छता अभियान उत्साहात
चिपळूणमध्ये परिमल भोसले यांचा शिवसेनेत प्रवेश
श्री सदस्यांचे कार्य समाजासाठी आदर्श : उमेश सकपाळ
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील अनधिकृत धार्मिक फलक प्रशासनाने काढले; निवेदनानंतर तात्काळ कारवाई.