konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा थरार!अडूर गावात शिमगोत्सव उत्साहात
पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा थरार! अडूर गावात शिमगोत्सव उत्साहात

पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा थरार!अडूर गावात शिमगोत्सव उत्साहात

गुहागर | योगेश बांडागळे (प्रतिनिधी):


गुहागर : कोकणातील पारंपरिक शिमगोत्सवानिमित्त गुहागर तालुक्यातील अडूर गावात ग्रामदेवता श्री सुंकाई देवी यांच्या होलिकोत्सवात पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा थरार यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

फाल्गुन पंचमीपासून सुरू झालेल्या या उत्सवात चतुःसीमेतील कोंडकारूळ, बोऱ्या, बुधल, पालशेत व नागझरी या गावांत देवीच्या खेळ्यांची भोवनी पार पडली. त्यानंतर भाटी मैदानावर रात्री आयोजित धार्मिक कार्यक्रमात संकासुराने पेटत्या होमाभोवती प्रदक्षिणा घालत भक्तांचा पाठलाग करण्याची पारंपरिक प्रथा सादर केली. होमाला अग्नी दिल्यानंतर संकासुराने ज्वलंत निखाऱ्यांतून धावत उपस्थितांमध्ये थरार निर्माण केला. ‘जय देवी सुंकाई’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

संकासुराला चिडवणाऱ्या भक्तांचा तो पेटत्या होमातून पाठलाग करतो आणि पकडल्यावर भक्त त्याचा नमस्कार करून आशीर्वाद घेतात, अशी आगळीवेगळी परंपरा पाहण्यासाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातून मोठी गर्दी उसळली होती. पिढ्यान् पिढ्या सुरू असलेल्या या परंपरेत आजवर कोणतीही अपघाताची घटना घडलेली नसल्याने ग्रामदेवतेवरील श्रद्धा अधिक दृढ होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

संकासुराचा पारंपरिक वेश, कंबरेतील घुंगरांचा नाद आणि मृदुंग-चकव्याच्या तालावर सादर होणारी लोककला यामुळे कार्यक्रमाला वेगळेच आकर्षण लाभले. यंदा या सोहळ्याची माहिती सोशल मीडियासह विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्याने विक्रमी गर्दी झाली. मुंबई, पुणे तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर ते मंडणगड या तालुक्यांतूनही अनेक भाविक व युट्यूबर्स विशेष उपस्थित राहिले होते.

मात्र प्रचंड गर्दीमुळे आणि नियोजनावर आलेल्या ताणामुळे काहींना प्रत्यक्ष संकासुराचा थरार अनुभवता आला नाही. वाढलेल्या वाहनसंख्येमुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली, तर मोबाईल नेटवर्कवर ताण आल्याने इंटरनेट सेवा काही काळासाठी ठप्प झाल्याचे दिसून आले.

श्रद्धा, धैर्य, लोकपरंपरा आणि सामुदायिक एकोप्याचे दर्शन घडविणारा पेटत्या होमातून धावणाऱ्या संकासुराचा हा अनोखा सोहळा यंदाही दिमाखात आणि भक्तिरंगात संपन्न झाला.

Releated Posts

बलशाली युवा हृदय मंचकडून मंगेश बांडागळे यांचा सत्कार

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा देवरुख: चिपळूण येथील बलशाली युवा हृदय मंचच्या वतीने हातिव पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित सदस्य मंगेश…

ByByEditorial मार्च 3, 2026

चिपळूणमध्ये नगरसेवकाच्या चालकावर हल्ला; चौघांकडून गाडीत कोंबून मारहाण

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा चिपळूण : शहरात एक धक्कादायक घटना घडली असून नगर परिषदेतील तरुण नगरसेवक साजिद सरगुरोह यांच्या…

ByByEditorial मार्च 3, 2026

शिरोडा वेळागर येथे स्वच्छता अभियान उत्साहात; विविध मान्यवरांची उपस्थिती

सिंधुदुर्ग | भूषण सावंत (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर येथे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने भव्य…

ByByEditorial मार्च 1, 2026

विकासाच्या राजकारणाला प्राधान्य; चिपळूणमध्ये परिमल भोसले यांचा शिवसेनेत प्रवेश

चिपळूण | योगेश बांडागळे (प्रतिनिधी): चिपळूणमध्ये माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. राधाताई लाड…

ByByEditorial मार्च 1, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

बलशाली युवा हृदय मंचकडून मंगेश बांडागळे यांचा सत्कार
डेरवण यूथ गेम्स 2026: अद्विका सोनीची 5 सुवर्णपदके
chiplun-nagarsevak-chalak-marhan
मध्यपूर्व तणाव : भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन व सूचना
शिरोडा वेळागर येथे भव्य स्वच्छता अभियान उत्साहात
चिपळूणमध्ये परिमल भोसले यांचा शिवसेनेत प्रवेश
श्री सदस्यांचे कार्य समाजासाठी आदर्श : उमेश सकपाळ
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील अनधिकृत धार्मिक फलक प्रशासनाने काढले; निवेदनानंतर तात्काळ कारवाई.
मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद