प्रतिनिधी : कोकणधारा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ञ तसेच स्वस्तिक हॉस्पिटल व चिरायु हॉस्पिटलच्या संस्थापिका डॉ. सौ. सुनिता रमेश चव्हाण यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यात सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
डॉ. चव्हाण यांनी आपल्या सेवाभावी वृत्तीने आणि वैद्यकीय कौशल्याने असंख्य महिलांना आरोग्यसेवा दिली. स्त्रीरोग तज्ञ म्हणून त्यांनी जिल्ह्यात मोठे योगदान दिले असून त्यांच्या कार्याची दखल सर्व स्तरांतून घेतली जात होती.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी २ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत माळनाका येथील स्वस्तिक बंगला येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता त्यांच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा निघून चर्मालय स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात डॉ. नितीन रमेश चव्हाण यांच्यासह शोकाकुल परिवार आहे.















