konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • महिलांनी कायदेशीर हक्कांबाबत जागरूक व्हावे – जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे
महिलांनी कायदेशीर हक्कांबाबत जागरूक व्हावे – जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे

महिलांनी कायदेशीर हक्कांबाबत जागरूक व्हावे – जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : महिलांनी त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत जागरूक राहणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले.

तालुका विधी सेवा समिती व सह्याद्री तंत्रनिकेतन महाविद्यालय, सावर्डे (ता. चिपळूण) यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी प्राचार्य मंगेश भोसले, प्रा. लिना जावकर, अॅड. वृषाली सावंत तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या अनुजा भोसले उपस्थित होत्या.

डॉ. नेवसे यांनी विद्यार्थिनींना ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून का साजरा केला जातो याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. गेल्या १२० वर्षांच्या कालखंडात महिलांनी आपल्या हक्कांसाठी संघर्ष करत विविध स्तरांवर लढा दिला असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी महिलांना घटनेने दिलेले अधिकार तसेच महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांच्या तरतुदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. हुंडाबळी, छेडछाड, लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचार, स्त्रीधन, संपत्ती हक्क यांसारख्या विषयांवर माहिती देत महिलांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेले कायदे महत्त्वाचे मार्गदर्शक ठरतात, असे त्यांनी सांगितले.

हुंडा प्रतिबंधक कायदा, पोटगीच्या तरतुदी, मुस्लिम महिला संरक्षण कायदा, हिंदू वारसा कायदा, हिंदू दत्तक व भरणपोषण कायदा, गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा तसेच कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी त्यांनी सोप्या भाषेत स्पष्ट केल्या. समाजातील सर्व स्तरांतील महिलांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण झाल्यास संरक्षण यंत्रणांना त्यांना मदत करणे अधिक सोपे होईल, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात विद्यार्थिनींना प्रेरणा देण्यासाठी त्यांनी कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना समर्पित “पंख माया मुक्तीचे सावित्रीबाई फुले” ही कविता सादर केली.
कार्यक्रमाला तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे नियोजन तालुका विधी सेवा समितीचे कनिष्ठ लिपिक श्री. जुगधर तसेच शिपाई श्री. मरके व श्री. इंगळे यांनी केले.

Releated Posts

मुख्य पाईपलाईन फुटली, तरीही पाणीपुरवठा अखंडित! निहार कोवळे यांच्या झटपट कारवाईने १२ तासांत संकटावर मात

चिपळूण : पेठमाप परिसरात आज पहाटे साडे सहा वाजण्याच्या सुमारास पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने एकच खळबळ उडाली. अचानक…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधी निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावर 18 चाकी गाडी बेदरकारपणे चालवून अपघात केला. याप्रकरणी चालकाविरोधात जयगड…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

लांजा: भांडण सोडवण्यास गेलेल्या वृद्ध सासूवर सुनेचा कोयत्याने हल्ला; लांजा पोलिसांत गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधीमुलगा आणि सूनेचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या सासूला सुनेने शिवीगाळ व दमदाटी करत कपाळावर आणि हाताच्या…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथे शनिवारी (दि. ४ एप्रिल) मध्यरात्री सुमारे १२.१५…

ByByEditorial अप्रैल 4, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
लक्ष्मी ऑरगॅनिक आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची साथ
RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख
पीपास रसायनावरून लोटे MIDCत तणाव; ६ एप्रिलला लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा
पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल
साखरपा येथे आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप बचावले