konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • दिवा–वीर मेमू रेल्वे सुरू करण्याची मागणी; वाहतूक कोंडीतून सुटकेची अपेक्षा थांबा दिलेल्या गाड्यांना प्रवाशांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद
दिवा–वीर मेमू रेल्वे सुरू करण्याची मागणी; माणगावातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा

दिवा–वीर मेमू रेल्वे सुरू करण्याची मागणी; वाहतूक कोंडीतून सुटकेची अपेक्षा थांबा दिलेल्या गाड्यांना प्रवाशांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद

माणगाव | जहेंद्र हरिभाऊ मुंढे

माणगाव | रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव शहरात दररोज हजारो नागरिक, पर्यटक आणि प्रवासी ये-जा करत असल्यामुळे शहरात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून दिवा ते वीर मेमू रेल्वे सेवा सुरू करावी तसेच अधिकाधिक एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना माणगाव स्थानकात थांबे द्यावेत, अशी ठाम मागणी माणगाव रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव सुरेश जैन यांनी केली आहे.

माणगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई–गोवा महामार्गावर रोजच वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रखडलेल्या महामार्गाच्या कामांमुळे अनेक ठिकाणी अपघात होऊन निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रवासाचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे सेवा अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

माणगाव हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने दररोज हजारो पर्यटक आणि प्रवासी येथे येत असतात. त्यामुळे माणगाव रेल्वे स्थानकावर सर्व प्रकारच्या रेल्वे गाड्यांना थांबे देण्यात यावेत, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. दोन वर्षांपूर्वी खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून काही एक्स्प्रेस गाड्यांना थांबे मिळाले असले तरी अद्यापही अनेक महत्त्वाच्या गाड्या माणगाव स्थानकावर थांबत नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन आणि तळा या विधानसभा मतदारसंघातील प्रवाशांचा माणगाव स्थानकाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या थांबा असलेल्या रेल्वे गाड्यांना अक्षरशः हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत असून त्यामुळे रेल्वे प्रशासनालाही आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होत असल्याचे प्रवासी संघटनेने सांगितले आहे.

खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून रोहा येथे मडगाव, संपर्क क्रांती, इंदोर, कोईम्बतूर आणि तिरुनेलवेली या एक्स्प्रेस गाड्यांना थांबे मिळाले आहेत. त्याच धर्तीवर माणगाव येथेही जनशताब्दी, मंगला, नेत्रावती, मत्स्यगंधा, कोकणकन्या आणि ऋषिकेश यांसारख्या महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबे मिळाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो.

याशिवाय दिवा ते रोहा या मार्गावर ज्या पद्धतीने रेल्वे सेवा सुरू आहे, त्याचप्रमाणे दिवा ते वीर मेमू रेल्वे सेवा दिवसातून तीन ते चार वेळा सुरू केल्यास माणगावसह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असा दावा प्रवासी संघटनेने केला आहे.

माणगाव एसटी बस स्थानकातून दररोज शेकडो एसटी बस मुंबई व कोकणात धावत असल्या तरी दुपारच्या वेळेत रेल्वे उपलब्ध नसल्यामुळे अनेक प्रवाशांना खासगी बस किंवा वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी वाढण्यासोबतच शासनालाही अपेक्षित महसूल मिळत नाही.

दरम्यान, रोहा ते वीर या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाले असून वीर येथे रेल्वे गाड्या थांबविण्यासाठी आवश्यक ट्रॅक व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे दिवा ते वीर मेमू सेवा सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्याचे प्रवासी संघटनेचे मत आहे.

या पार्श्वभूमीवर कोकणातील प्रवाशांची हेळसांड थांबवून मुंबई–गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी दिवा–वीर मेमू रेल्वे सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

याबाबत बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, माणगाव येथे अधिकाधिक रेल्वे गाड्यांना थांबे मिळावेत यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत आणि लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Releated Posts

लांजा: भांडण सोडवण्यास गेलेल्या वृद्ध सासूवर सुनेचा कोयत्याने हल्ला; लांजा पोलिसांत गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधीमुलगा आणि सूनेचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या सासूला सुनेने शिवीगाळ व दमदाटी करत कपाळावर आणि हाताच्या…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथे शनिवारी (दि. ४ एप्रिल) मध्यरात्री सुमारे १२.१५…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधातील आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची आंदोलनकर्त्यांना साथ

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता महाराष्ट्र नवनिर्माण…

ByByEditorial अप्रैल 4, 2026

रत्नागिरी पोलीसांच्या RAIDS App मुळे नागपूरमध्ये अवघ्या २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या दूरदृष्टीतून आणि नाविन्यपूर्ण उपक्रमातून विकसित…

ByByEditorial अप्रैल 3, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
लक्ष्मी ऑरगॅनिक आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची साथ
RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख
पीपास रसायनावरून लोटे MIDCत तणाव; ६ एप्रिलला लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा
पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल
साखरपा येथे आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप बचावले
सुभाषराव चव्हाण यांना ‘आदर्श जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर
रत्नागिरी नगर परिषदेची कारवाई; ११० मालमत्ता सील, ७० नळजोडण्या खंडित